agriculture news in marathi value added products of ginger | Agrowon

आल्यापासून कॅण्डी, लोणचे, मुरांबा

चंद्रकला सोनवणे
शनिवार, 5 सप्टेंबर 2020

अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये आल्याचा वापर केला जातो. यामधील अनेक औषधी गुणधर्म आरोग्यासाठी चांगले मानले जातात. थंडीच्या दिवसांत होणाऱ्या संक्रमणापासून बचावासाठी आले रस आणि आलेयुक्त चहा फायदेशीर ठरतो.
 

अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये आल्याचा वापर केला जातो. यामधील अनेक औषधी गुणधर्म आरोग्यासाठी चांगले मानले जातात. थंडीच्या दिवसांत होणाऱ्या संक्रमणापासून बचावासाठी आले रस आणि आलेयुक्त चहा फायदेशीर ठरतो.

आले सुकवून त्याचा सुंठ म्हणून वापर केला जातो. आयुर्वेदिक औषधांमध्ये सुंठेचा वापर केला जातो. ज्युस, मुरांबे, मसाले आणि विविध भाज्यामध्ये आले वापरले जाते.

औषधी गुणधर्म 

  • मळमळ, उलटीच्या त्रासावर गुणकारी मानले जाते.
  • भूक वाढवते. पचनासंबंधी पोटातील समस्या दूर करते.
  • आले रस मधुमेह नियंत्रित ठेवण्यास मदत करते. तसेच कोलेस्ट्रॉलची पातळी कमी ठेवण्यास फायदेशीर आहे.
  • पचनास त्रास, चेहऱ्यावरील मुरमांवर आले रस प्रभावी काम करते.
  • पावसाळ्यात आले रस नियमित घेतल्यास, कफ, सर्दी-खोकल्यापासून बचाव होतो.
  • आल्याचे लोणचे खाल्याने हाडे मजबूत होतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढते. सांधेदुखी, सर्दी, खोकला दूर राहण्यास मदत होते.
  • थंडीच्या दिवसांत रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी लोणचे खूप उपयुक्त ठरते.

मूल्यवर्धित पदार्थ
कॅन्डी

कॅण्डीसाठी तंतूविरहित आले निवडावे. त्याचे तुकडे करून ०.५ टक्के सायट्रिक आम्लात टाकून कुकरमध्ये ३० मिनिटे शिजवावे. कॅण्डी बनविण्यासाठी एक किलो आल्यासाठी एक किलो साखर लागते. लहान तुकड्यांना छिद्र करून त्यामध्ये साखर घालून हे मिश्रण चोवीस तास ठेवावे. मिश्रणात दुसऱ्या दिवशी २५ टक्के आणि उरलेली साखर तिसऱ्या दिवशी टाकावी. रिफ्रॅक्टो मीटरच्या साह्याने मिश्रण ८० ब्रिक्स आहे का तपासावे. तयार कॅण्डी वेगळी करून वाळवून घ्यावी. कॅण्डी हवाबंद करून कोरड्या जागी ठेवावी.

वडी 
आले स्वच्छ धुऊन साल काढून घ्यावे. छोटे एक इंच आकाराचे तुकडे करून त्यात पाणी किंवा दूध घालून त्याची पेस्ट करावी. पेस्टच्या तिप्पट प्रमाणात साखर घेऊन मिश्रण एकत्रित करावे. मंद आचेवर आले पेस्ट आणि साखर शिजवून घ्यावी. पसरट भांड्याला तूप लावून त्यामध्ये मिश्रण ओतून घ्यावे. थंड झाल्यावर त्याचे चौकोनी आकाराच्या काप करून वड्या कराव्यात.

पावडर 
चांगल्या वाळलेल्या आल्याची बारीक पावडर करावी. ही पावडर ५० ते ६० गेजच्या चाळणीतून काढावी. तयार पावडर हवाबंद पॅक करून ठेवावी. या पावडरचा विविध पदार्थ बनवण्यासाठी उपयोग केला जातो.

सरबत व स्क्वॅश
आले स्वच्छ धुऊन त्याच्या वरील साल काढून टाकावी. त्याचे लहान तुकडे करावेत. आवश्यकतेनुसार पाणी टाकून मिक्‍सरच्या साह्याने ज्यूस तयार करून घ्यावा. ज्यूस गाळून घ्यावा. तयार रसाचा वापर सरबत किंवा अन्य मिक्स पेय तयार करण्यासाठी होतो. आल्याच्या रसात ४० ते ४५ टक्के साखर टाकावी. सरबत करायचे असेल तर त्यामध्ये २५० मि.ली. रसात १.३० ग्रॅम साखर ३० गॅम सायट्रिक आम्ल आणि ८ लिटर पाणी टाकावे. अशा प्रकारे तयार झालेला स्क्वॅश आणि सरबत निर्जंतुक बाटल्यांमध्ये भरून हवाबंद करून कोरड्या जागी साठवावे.

आले पेस्ट 
घरगुती पदार्थ निर्मितीवेळी आले पेस्ट वापरली जाते. आल्याचे
बारीक तुकडे करून कुकरमध्ये १०-१५ मिनिटे शिजवून घ्यावे. तुकडे थंड करून त्यात पाणी टाकून पेस्ट तयार करावी. आम्लता नियंत्रित करण्यासाठी सायट्रिक आम्लाचा वापर करावा. तयार केलेली पेस्ट ८० अंश सेल्सिअस तापमानास गरम करून निर्जंतुक बाटल्यांमध्ये भरावे. पेस्टची गुणवत्ता आणि साठवणक्षमता वाढवण्यासाठी सोडिअम बेंजोएट या संरक्षण रसायनाचा वापर करावा.

आले लसूण लोणचे
साहित्य

अर्धा किलो आले, लसूण १५० ग्रॅम, हळद १० ग्रॅम, लाल तिखट १० ग्रॅम, हिंग १० ग्रॅम, मीठ ७० ग्रॅम, गरजेनुसार तेल.

कृती
प्रथम आले स्वच्छ धुऊन कोरडे करून घ्यावे. सोललेल्या लसणाची बारीक पेस्ट तयार करून घ्यावी. बेडगी मिरची आणि वरील सर्व सामग्री एकत्रित करून कढईमध्ये तेलात शिजवून घ्यावे. थंड झाल्यावर तयार लोणचे निर्जंतुक बाटलीमध्ये भरावे.

सुंठ निर्मिती 
सुंठ निर्मितीसाठी उत्तम प्रतीचे आले निवडावे. आले स्वच्छ करून ८-१० तास पाण्यात भिजत ठेवावे. भिजलेल्या आल्याची साल काढून २ टक्के चुन्याच्या द्रावणात ६-७ तास भिजत ठेवावे. नंतर एका छोट्या बंद खोलीत आले कंद पसरून १२ तास गंधकाची (प्रमाणः १० ग्रॅम) धुरी द्यावी. कंद बाहेर काढून पुन्हा २ टक्के चुन्याच्या द्रावणात ६-७ तास भिजत ठेवून १२ तास गंधकाची धुरी द्यावी. अशाप्रकारे ही प्रक्रिया तीन वेळा करावी. त्यामुळे आल्याच्या कंदास पांढरा शुभ्र रंग येतो. प्रक्रिया केलेले आले सूर्यप्रकाशात १० टक्के पाण्याचा अंश राहीपर्यंत वाळवावे. तयार सुंठ स्वच्छ करून विक्री करावी.

मुरांबा
पूर्व प्रक्रिया केलेले आल्याचे तुकडे कुकरमध्ये १०-१५ मिनिट शिजवून घ्यावे. समप्रमाणात साखर आणि पाणी घेऊन पाक (७० डिग्री ब्रिक्स) करावा. एक किलो आल्यासाठी दीड किलो साखर वापरावी. शिजवलेले आले पाकात २ तास ठेवावे. थंड झाल्यावर निर्जंतुक बाटलीमध्ये मुरंबा भरून कोरड्या जागी साठवून ठेवावे.

संपर्क- सोनवणे चंद्रकला, ७९७२९९९४६४
(के.एस.के. अन्नतंत्र महाविद्यालय, बीड)


इतर कृषी प्रक्रिया
चिंचेपासून मूल्यवर्धित पदार्थचिंचेपासून मूल्यवर्धित पदार्थांच्या निर्मितीला...
फालसापासून जाम, जेली, चटणीफालसा हा एक रानमेवा आहे. फालसा फळामध्ये प्रथिने,...
छोट्या उद्योगात नफा कसा वाढवावा?नवीन लघुउद्योग सुरू केल्यानंतर उद्योजकांना अनेक...
हळदीपासून मूल्यवर्धित पदार्थ...बहुतांश भारतीय भाज्यांमध्ये हळदीचा कमी अधिक वापर...
दुधीभोपळ्यापासून टुटीफुटी, पावडर, वडीबऱ्याच लोकांना दुधी भोपळ्याची भाजी आवडत नाही....
सुरणपासून रुचकर पदार्थसुरण या कंदपिकापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ...
टोमॅटोपासून केचअप, चटणी, वेफर्सबाजारातील दर कमी झाल्यावर टोमॅटो फेकून दिले जातात...
उद्योजकतेतून ग्रामीण विकासाकडे...ग्रामीण भागासह सर्वत्र व्यवसाय, उद्योग याविषयी...
टोमॅटो निर्यात, प्रक्रिया उद्योगात संधीयेत्या काळात टोमॅटो उत्पादक प्रदेशांमध्ये सहकारी...
पनीर निर्मितीसह वाढवा टिकवणक्षमतापनीर हा भारतीय उपखंडामध्ये आहारामध्ये मोठ्या...
आल्यापासून कॅण्डी, लोणचे, मुरांबाअनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये आल्याचा वापर केला जातो...
डाळिंबापासून जॅम, जेली, स्क्वॅश ​डाळिंबापासून इतर फळाप्रमाणेच उत्तम प्रकारचे सिरप...
कृषी व्यवसायात भरपूर संधी, गरज योग्य...कृषी क्षेत्रात व्यवसायाला मोठा वाव आहे. कृषी...
पेरूपासून बनवा लोणचे, चीज, जेलीपेरूमधील जीवनसत्त्व क रोगप्रतिकारक शक्ती...
चिंच प्रक्रियेतून उद्योगाच्या संधीचिंचेच्या आंबट-मधुर व आम्लकारक चवीमुळे याचा वापर...
डाळिंबाचे औषधी गुणधर्म डाळिंबाची मधुर चव, बियांचा आकर्षक नैसर्गिक लाल...
केळीमधील सूत्रकृमीचे नियंत्रणकेळी पिकामध्ये पाच प्रकारचे सूत्रकृमी जास्त...
आरोग्यदायी तुतीची फळेतामिळनाडू राज्यातील रेशीम संशोधन व जर्मप्लाझम...
ग्लूटेनमुक्त आहार फायदेशीरग्लूटेन हा गहू, राई आणि बार्ली यांसारख्या ठरावीक...
डाळिंबासाठी पायाभूत सुविधांच्या...येत्या काळात डाळिंब फळांच्या बरोबरीने रस, पावडर,...