agriculture news in marathi value added products of phalsa | Agrowon

फालसापासून जाम, जेली, चटणी

पल्लवी कांबळे, अमरसिंह सोळंके
शनिवार, 19 सप्टेंबर 2020

फालसा हा एक रानमेवा आहे. फालसा फळामध्ये प्रथिने, कर्बोदके, तंतुमय पदार्थ, जीवनसत्त्व अ आणि क, कॅल्शिअम, लोह, पोटॅशिअम, सोडिअम मुबलक प्रमाणात असतात. या फळामध्ये विविध औषधी गुणधर्म असतात. 

फालसा हा एक रानमेवा आहे. फालसा फळामध्ये प्रथिने, कर्बोदके, तंतुमय पदार्थ, जीवनसत्त्व अ आणि क, कॅल्शिअम, लोह, पोटॅशिअम, सोडिअम मुबलक प्रमाणात असतात. या फळामध्ये विविध औषधी गुणधर्म असतात. फालसापासून सरबत, जाम, जेली, चटणी असे विविध मूल्यवर्धित पदार्थ केले जातात.

मूल्यवर्धित पदार्थ

सरबत 
साहित्य 
फालसा अर्धा किलो, साखर २०० ग्रॅम, पाणी ३५० मिलि, सोडा-पाणी, बर्फाचे तुकडे.

कृती

  • प्रथम साखर आणि पाणी एकत्र करून मंद आचेवर उकळून घेऊन सिरप तयार करावे. तयार सिरपमध्ये फालसा फळे टाकावीत. हे मिश्रण रात्रभर तसेच ठेवावे. दुसऱ्या दिवशी हे मिश्रण गाळून घ्यावे. तयार सरबतामध्ये सोडा पाणी आणि बर्फाचे तुकडे टाकून सेवन करावे.
  • फालसा फळ मिक्सरमध्ये बारीक करून गाळून घ्यावा. त्यामध्ये ५ मिनिटे उकळलेला सिरप टाकावा. त्यात सोडा-पाणी आणि बर्फाचे तुकडे टाकून सरबत तयार करावा.

चटणी 
फालसा फळे स्वच्छ धुऊन घ्यावीत. पॅनमध्ये पाणी टाकून फळे ४-५ मिनिटांपर्यंत मंद आचेवर शिजवून घ्यावीत. शिजल्यानंतर मिश्रण थंड होण्यास ठेवावे. थंड झाल्यावर मिश्रण गाळून घ्यावे (गाळलेले पाणी कोणत्याही फळाच्या रसामध्ये वापरता येते). फालसा फळे मिक्सरमध्ये टाकून बारीक पेस्ट करावी. पेस्टमध्ये आधी गाळून बाजूला ठेवलेले पाणी घालावे. पुन्हा हे मिश्रण चाळणीतून गाळून घ्यावे. गाळलेले मिश्रण मंद आचेवर भांड्यामध्ये ठेवावे. त्यामध्ये साखर, गूळ, काळे मीठ, जिरे पावडर, व्हिनेगार घालून मंद आचेवर सतत ढवळत राहावे. मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवून घेऊन गॅस बंद करावा. तयार चटणी थंड करून फ्रीजमध्ये हवाबंद डब्यात १४ ते १५ दिवस ठेवावी.

जेली 
फालसा फळे हलके बारीक करून मंद आचेवर २० मिनिटे शिजवावीत. मंद आचेवर भांड्यात रस आणि पेक्टीन टाकून सतत ढवळत राहावे. मिश्रण थोडे उकळल्यावर त्यात साखर घालावी. मिश्रणाचा फेस जाईपर्यंत चांगले शिजवून घ्यावे. शेवटी ड्रॉप टेस्ट घेऊन गॅस बंद करावा. तयार जेली भरणीमध्ये हवाबंद करून ठेवावी.

जाम
फालसा फळे चांगली धुऊन गरम पाण्यात ५ मिनिटे उकडून घ्यावीत. उकडल्यानंतर मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करून गाळून घ्यावे. गाळलेले मिश्रण भांड्यात घेऊन मंद आचेवर सतत ढवळत राहावे. थोडे उकळल्यानंतर त्यात साखर घालावी. थोडे शिजल्यावर त्यात लिंबाचा रस टाकावा. जाम तयार होण्यासाठी मिश्रण चांगले शिजवून घ्यावे. मिश्रणाचा १ थेंब थंड पाण्यात टाकावा, गुठळी झाल्यास गॅस त्वरित बंद करावा. तयार फालसा जाम निर्जंतुक कोरड्या भरणीमध्ये भरून ठेवावा.

काळजी 
फालसाचे फळ जास्त प्रमाणात सेवन केल्याने पित्त किंवा पोटफुगी त्रास जाणवतो.

संपर्क - अमरसिंह सोळंके, ९९२१०९२२२२
(आदित्य अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, बीड)


इतर कृषी प्रक्रिया
बटाट्यापासून वेफर्स, पावडर, फ्रेंच...मानवी आहारामध्ये बटाट्याचा वापर मोठ्या प्रमाणावर...
सब्जा बियांचे आरोग्यदायी फायदे सब्जामध्ये प्रथिने तसेच आरोग्याच्या दृष्टीने...
लघु उद्योग आजारी का पडतात?लघुउद्योगांना दीर्घकाळ नफ्यात चालण्यासाठी अनेक...
भाजीपाल्यावरील प्राथमिक प्रक्रियासौर ऊर्जेवरील ड्रायर, इलेक्ट्रिक ड्रायरच्या...
बीटपासून बनवा पराठा, पावडर, सूपबीट ही भाजी तशी फार लोकांना आवडत नाही. मात्र,...
ग्रामीण सेवा क्षेत्रातील उद्योगांचा...ग्रामीण भागामध्ये सेवा उद्योगाच्या विस्ताराला...
सीताफळापासून बनवा आइस्क्रीम, रबडी,...सीताफळाचा गर वेगळा काढून केलेले पदार्थ आवडीने...
बहुगुणी आवळ्याचे मूल्यवर्धित पदार्थआवळा हे तुरट व आंबट चवीचे हिवाळ्यात येणारे...
उत्पादन क्षेत्रातील ग्रामीण उद्योगांचे...ग्रामीण भागातील निर्मिती करणाऱ्या एका छोट्या...
छोट्या उपायांद्वारे टाळता येईल अन्न...मागील भागामध्ये कृषी उत्पादनाच्या व वाहतुकीच्या...
लघुउद्योग चालू करण्यापूर्वीची तयारीमागील दोन लेखांमध्ये आपण छोट्या उद्योगात नफ्याचे...
तंत्रज्ञान वापरातून टाळा अन्नाची नासाडीकार्लो पेट्रिनी यांच्या मते, प्रत्येकासाठी अन्न...
डाळिंब फळांची प्रतवारी, साठवणूकमहाराष्ट्रामध्ये गेल्या दोन दशकांपासून डाळिंब एक...
चिंचेपासून मूल्यवर्धित पदार्थचिंचेपासून मूल्यवर्धित पदार्थांच्या निर्मितीला...
फालसापासून जाम, जेली, चटणीफालसा हा एक रानमेवा आहे. फालसा फळामध्ये प्रथिने,...
छोट्या उद्योगात नफा कसा वाढवावा?नवीन लघुउद्योग सुरू केल्यानंतर उद्योजकांना अनेक...
हळदीपासून मूल्यवर्धित पदार्थ...बहुतांश भारतीय भाज्यांमध्ये हळदीचा कमी अधिक वापर...
दुधीभोपळ्यापासून टुटीफुटी, पावडर, वडीबऱ्याच लोकांना दुधी भोपळ्याची भाजी आवडत नाही....
सुरणपासून रुचकर पदार्थसुरण या कंदपिकापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ...
टोमॅटोपासून केचअप, चटणी, वेफर्सबाजारातील दर कमी झाल्यावर टोमॅटो फेकून दिले जातात...