नागपूर ः रंगीत कापसाच्या उत्पादनाचे स्वप्न संशोधन संस्थांकडून रंगविण्यात आले असले, तरी सं
कृषी प्रक्रिया
काशीफळापासून रायता, सूप, हलवा
काशीफळामध्ये जीवनसत्त्व, खनिजे आणि तंतुमय पदार्थ मुबलक प्रमाणात असतात. तसेच बीटा-केरोटीन जास्त प्रमाणात असते. डोळ्याच्या आरोग्य सुधारण्यासाठी काशीफळाचे सेवन फायदेशीर ठरते.
काशीफळामध्ये जीवनसत्त्व, खनिजे आणि तंतुमय पदार्थ मुबलक प्रमाणात असतात. तसेच बीटा-केरोटीन जास्त प्रमाणात असते. डोळ्याच्या आरोग्य सुधारण्यासाठी काशीफळाचे सेवन फायदेशीर ठरते.
काशीफळ प्रामुख्याने देवडांगर किंवा डांगर या नावांनी ओळखले जाते. आकाराला अवाढव्य असल्यामुळे इतर भाजीपाल्यांच्या तुलनेत वेगळे दिसते. या फळाचा साठवण कालावधी जास्त आहे. हे फळ परिपक्व झाल्यानंतर पिवळ्या किंवा केशरी रंगाचे आणि चवीला गोड असते. काशीफळामध्ये जीवनसत्त्व, खनिजे आणि तंतुमय पदार्थ मुबलक प्रमाणात असतात. तसेच बीटा-केरोटीन जास्त प्रमाणात असते. डोळ्याच्या आरोग्य सुधारण्यासाठी काशीफळाचे सेवन फायदेशीर ठरते. यामध्ये उपलब्ध असलेल्या आम्लामुळे शरीरातील कोलेस्ट्रेरॉल नियंत्रित ठेवले जाते. तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते.
काशीफळापासून जॅम,जेली, मुरबा, कँडी, प्युरी, सॉस, चटणी, लोणचे, हलवा, रायता, सूप इत्यादी प्रक्रियायुक्त पदार्थ बनवले जातात. या फळाच्या बियांचा देखील मूल्यवर्धित उत्पादने बनवण्यास उपयोग केला जातो.
पौष्टिक गुणधर्म (प्रति १०० ग्रॅम )
ऊर्जा | २६ कि किलो कॅलरी |
कर्बोदके | ६.५ ग्रॅम |
तंतुमय पदार्थ | ०.५ ग्रॅम |
मेदपदार्थ | ०.१ ग्रॅम |
प्रथिने | १ ग्रॅम |
जीवनसत्त्व अ | ४२६ मिलिग्रॅम |
बिटा- केरोटीन | ३१०० मिलिग्रॅम |
प्रक्रियायुक्त पदार्थ
रायता
साहित्य
लाल रंगाचे डांगर फळ २५० ग्रॅम, साखर ५० ग्रॅम, जिरे १० ग्रॅम, हिरवी मिरची २० ग्रॅम, दही २० ग्रॅम, चवीनुसार मीठ,बारीक चिरलेली कोथिंबीर.
कृती
प्रथम सर्व भाज्या (डांगर फळ, हिरवी मिरची, कोथिंबीर) स्वच्छ धुऊन घ्याव्यात. काशीफळाचे व्यवस्थित तुकडे करून साल व बी वेगळे करावेत. एका भांड्यात फळाचे तुकडे घेऊन ५ ते १० मिनिटे चांगले वाफवून घ्यावे. त्यामध्ये जिरे व हिरवी मिरची चांगली परतून घ्यावी. साखर व मीठ घालून मिश्रण चांगले मिसळून आणि परतून घ्यावे. भांड्यावरती झाकण ठेऊन मंद आचेवर ५ ते ७ मिनिटे वाफवून घ्यावे. वाफवल्यानंतर मिश्रण थंड होण्यास ठेवून द्यावे. थंड झाल्यानंतर त्यामध्ये दही आणि कोथिंबीर चांगल्या प्रकारे मिसळून घ्यावी. तयार रायते सलाडमध्ये किंवा चटणी म्हणून छान लागते.
सूप
साहित्य
कापलेले काशीफळ, तेल २ चमचे, मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, ३ लवंग, लसूण, मीठ, जिरे आले, लाल मिरची.
कृती
पातेल्यामध्ये तेल टाकून गरम करण्यास ठेवावे. त्यात काशीफळाचे तुकडे टाकून मंद आचेवर शिजवावे. चांगले मऊ शिजवल्यानंतर काशीफळ कुस्करून घ्यावे. मंद आचेवर जाड बुडाचे पातेले ठेवून तेल गरम करावे. गरम तेलात जिरे, लवंग, चिरलेला कांदा, मिरची, आले, लसूण, मीठ आणि बारीक केलेले काशीफळ घालावे. पातेल्यातील मिश्रण सतत ढवळत राहावे. म्हणजे करपणार नाही. थोडे शिजवल्यानंतर त्यामध्ये गरजेनुसार पाणी टाकावे. पाणी टाकल्यानंतर मंद आचेवर मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यावे. सर्व्ह करतेवेळी त्यावर कोथिंबीर सजवावी
हलवा
साहित्य
किसलेले काशीफळ २५० ग्रॅम, तूप ५ ग्रॅम, दूध १०० मिलि, साखर १०० ग्रॅम, वेलची पूड २ ग्रॅम आणि केसर १/२ ग्रॅम.
कृती
प्रथम काशीफळ सोलून घ्यावे. त्यातील बिया बाजूला काढून किसून घ्यावे. मध्यम आचेवर कढईमध्ये तूप किंवा लोणी वितळून त्यात काशीफळ टाकावे. मध्यम आचेवर मऊ होईपर्यंत चांगले शिजवून घ्यावे. मिश्रण करपू नये, यासाठी सतत ढवळत राहावे. मिश्रणामध्ये दूध, साखर आणि वेलची पूड टाकून घट्ट होईपर्यंत ढवळून घ्यावे. चांगले शिजल्यानंतर केसर टाकून सर्व्ह करावे.
संपर्क ः अमरसिंह सोळंके, ९९२१०९२२२२
(आदित्य अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, बीड)
- 1 of 15
- ››