गुलाबापासून गुलकंद, जॅम,जेली

गुलाबाच्या पाकळ्यापासून गुलकंद, जॅम, जेली इत्यादी प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करतात.यासाठी गुणवत्तापूर्ण जाती गुलाबाची फुले वापरावीत. गुलाब प्रक्रिया उद्योगात चांगल्या संधी आहेत.
value added products Rose
value added products Rose

गुलाबाच्या पाकळ्यापासून गुलकंद, जॅम, जेली इत्यादी प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करतात.यासाठी गुणवत्तापूर्ण जाती गुलाबाची फुले वापरावीत. गुलाब प्रक्रिया उद्योगात चांगल्या संधी आहेत. आज जगात वापरात असणाऱ्या सर्व अत्तरांपैकी गुलाब अत्तर सर्वात महाग अत्तर आहे. प्राचीन काळापासून गुलाबाच्या फुलांचा उपयोग सुगंधी द्रव्य तयार करण्यासाठी केला जातो. या सुगंधी द्रव्यापासून गुलाब अत्तर आणि गुलाब पाणी तयार करतात. या व्यतिरिक्त गुलाबाच्या पाकळ्यापासून गुलकंद, जॅम, जेली इत्यादी प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करतात. गुलाब पाकळ्यांचा गुलकंद  वाळलेल्या गुलाबाच्या पाकळ्यांचा भुगा मिठाई, गुलकंद, सरबत आणि इतर प्रकारे खाण्यासाठी व पिण्यासाठी वापरतात. गुलाब पासून तयार केलेला गुलकंद हा सर्वात लोकप्रिय प्रकार आहे. गुलाबाच्या पाकळ्या साखरेमध्ये मुरल्यावर गुलकंद तयार होतो. गुलकंद तयार करण्यासाठी गुलाबाच्या नूरजहाँ, एडवर्ड, एव्हान, क्रिमझन, ग्लोरी, ब्लू-मून, मॉटेझुमा, हैदराबादी या जाती वापरतात. गुलकंद तयार करण्याची पद्धत  साहित्य: गुलाबाची फुले, खडीसाखर किंवा जाड साखर, गरम पाण्याने स्वच्छ धुतलेली काचेची बरणी. कृती:

  • गुलाबाची ताजी व पूर्ण उमललेली फुले घ्यावीत. पाकळ्या व्यवस्थित तोडून पाण्याने स्वच्छ करून घ्याव्यात. त्या पाकळ्या नंतर कोरड्या होऊ द्याव्यात.
  •  पाकळ्यांचे स्टीलच्या कात्रीने बारीक तुकडे करावेत. पाकळ्यांचे तुकडे व साखर १:१ या प्रमाणात घेऊन त्यांचे मिश्रण करावे. हे मिश्रण काचेच्या बरणीत भरावे किंवा बरणीत गुलाबाच्या पाकळ्या व साखर भरताना त्यांचे एकावर एक थर द्यावेत. नंतर बरणीचे तोंड स्वच्छ, कोरड्या व पांढऱ्या फडक्याने बांधावे. ही बरणी सकाळच्या किंवा संध्याकाळच्या कोवळ्या उन्हात ठेवावी.
  •  बरणी दुपारच्या कडक उन्हामध्ये ठेवू नये कारण बरणी जर कडक उन्हात ठेवली तर गुलकंदाचा सुगंध कमी होईल. त्याचा रंगही काळपट होण्याची शक्यता असते. बरणी कोवळ्या उन्हात ठेवल्यानंतर रोज किंवा एक दिवसाआड हलवावी.
  • साधारणतः: एका आठवड्याने उन्हामुळे साखरेचा पाक होईल. त्यात गुलाबाच्या पाकळ्या मुरून गुलकंद तयार होईल.
  • गुलकंद खाण्याचे फायदे 

  • अन्नाच्या नैसर्गिक पचनास मदत करते.
  • शरीरातील रक्त शुद्ध करण्यास मदत.
  •  आम्लपित्तावर नियंत्रण ठेवण्यास मदत.
  •  गुलकंद कफनाशक, तृष्णानाशक, रक्तवर्धक आहे.
  •  गुलकंदाच्या सेवनाने भरपूर प्रमाणात नैसर्गिक कॅल्शिअम मिळते.
  •  गुलकंद ॲन्टिऑक्साईडन्ट म्हणून कार्य करते.
  •  उन्हाळ्यात येणारा थकवा, आळस, सांधेदुखी, जळजळ यावर गुणकारी.
  •  नजर चांगली ठेवण्यास मदत करते.
  •  ताप, रक्तपित्त, कांजिण्या यावर चांगला उपयोग होतो.
  • गुलाबाच्या पाकळ्यांचा जॅम

  • लाल गुलाबाची सुवासिक फुले घेऊन पाकळ्या वेगळ्या करून घ्याव्यात. त्या सध्या पाण्याने धुवून घ्याव्यात त्यानंतर त्याचे वजन करून घ्यावे. साधारणतः ९ किलो पाकळ्यांसाठी दीड लिटर पाणी वापरावे.
  • पाणी आणि पाकळ्यांचे मिश्रण अर्धा तास उकळत ठेवावे. फुलांचा रंग पूर्णपणे उतरल्यानंतर व पाकळ्यांचा मऊ लगदा तयार झाल्यानंतर मिश्रण स्वच्छ फडक्याने गाळून घ्यावे. हा सफेद मऊ लगदा कोमट राहील अशा रीतीने ठेवावा. ४ किलो साखर गाळून घेतलेल्या मिश्रणात टाकून मिश्रण चांगल्या प्रकारे ढवळावे.
  • पाक तयार होण्यासाठी मिश्रण शिजवत ठेवावे. गोळीबंद पाक तयार झाल्यानंतर त्यात कोमट लगदा घालून मिश्रण चांगले ढवळावे. पुन्हा सर्व मिश्रण शिजवून योग्य प्रकारे तयार झाल्यावर, थंड करून बाटल्यात भरावे.
  • गुलाबाच्या पाकळ्यांची जेली 

  • पूर्ण पक्व झालेले कवठ घेऊन त्याचा गर काढून घ्यावा. त्यानंतर गर कुस्करावा. गर काढल्यानंतर त्याच्या वजना इतक्या लाल किंवा गुलाबी गुलाबाच्या पाकळ्या घ्याव्यात. पाकळ्या आणि कवठाचा गर एकत्र त्यात दुप्पट पाणी घालावे. नंतर हे गर आणि पाकळ्यांचे मिश्रण ३० मिनिटे उकळावे. उकळल्यानंतर स्वच्छ कापडातून मिश्रण गाळून घ्यावे.
  • गाळून घेतलेल्या पाण्यात गर आणि पाकळ्यांचा वजनाइतकी किंवा बरोबरीने साखर घालावी. साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत मिश्रण ढवळावे. मधून मधून पाणी चाखून पाहावे. गोडी कमी असेल तर पुन्हा साखर घालावी. साखरेचे प्रमाण योग्य असल्यास पाक तयार करण्यासाठी मिश्रण उकळावे. घट्ट पाक झाल्यानंतर डब्यात भरून ठेवावा.मिश्रण थंड झाल्यावर त्याच्या वड्या तयार करता येतात.
  • संपर्क ः कीर्ती देशमुख, ८२७५४१२०६३ (विषय विशेषज्ञ (गृहविज्ञान) कृषी विज्ञान केंद्र,अकोला)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com