agriculture news in marathi value added products Rose | Page 2 ||| Agrowon

गुलाबापासून गुलकंद, जॅम,जेली

कीर्ती देशमुख, डॉ. उमेश ठाकरे
गुरुवार, 5 नोव्हेंबर 2020

गुलाबाच्या पाकळ्यापासून गुलकंद, जॅम, जेली इत्यादी प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करतात.यासाठी गुणवत्तापूर्ण जाती गुलाबाची फुले वापरावीत. गुलाब प्रक्रिया उद्योगात चांगल्या संधी आहेत.
 

गुलाबाच्या पाकळ्यापासून गुलकंद, जॅम, जेली इत्यादी प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करतात.यासाठी गुणवत्तापूर्ण जाती गुलाबाची फुले वापरावीत. गुलाब प्रक्रिया उद्योगात चांगल्या संधी आहेत.

आज जगात वापरात असणाऱ्या सर्व अत्तरांपैकी गुलाब अत्तर सर्वात महाग अत्तर आहे. प्राचीन काळापासून गुलाबाच्या फुलांचा उपयोग सुगंधी द्रव्य तयार करण्यासाठी केला जातो. या सुगंधी द्रव्यापासून गुलाब अत्तर आणि गुलाब पाणी तयार करतात. या व्यतिरिक्त गुलाबाच्या पाकळ्यापासून गुलकंद, जॅम, जेली इत्यादी प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करतात.

गुलाब पाकळ्यांचा गुलकंद 
वाळलेल्या गुलाबाच्या पाकळ्यांचा भुगा मिठाई, गुलकंद, सरबत आणि इतर प्रकारे खाण्यासाठी व पिण्यासाठी वापरतात. गुलाब पासून तयार केलेला गुलकंद हा सर्वात लोकप्रिय प्रकार आहे. गुलाबाच्या पाकळ्या साखरेमध्ये मुरल्यावर गुलकंद तयार होतो. गुलकंद तयार करण्यासाठी गुलाबाच्या नूरजहाँ, एडवर्ड, एव्हान, क्रिमझन, ग्लोरी, ब्लू-मून, मॉटेझुमा, हैदराबादी या जाती वापरतात.

गुलकंद तयार करण्याची पद्धत 

साहित्य:
गुलाबाची फुले, खडीसाखर किंवा जाड साखर, गरम पाण्याने स्वच्छ धुतलेली काचेची बरणी.

कृती:

 • गुलाबाची ताजी व पूर्ण उमललेली फुले घ्यावीत. पाकळ्या व्यवस्थित तोडून पाण्याने स्वच्छ करून घ्याव्यात. त्या पाकळ्या नंतर कोरड्या होऊ द्याव्यात.
 •  पाकळ्यांचे स्टीलच्या कात्रीने बारीक तुकडे करावेत. पाकळ्यांचे तुकडे व साखर १:१ या प्रमाणात घेऊन त्यांचे मिश्रण करावे. हे मिश्रण काचेच्या बरणीत भरावे किंवा बरणीत गुलाबाच्या पाकळ्या व साखर भरताना त्यांचे एकावर एक थर द्यावेत. नंतर बरणीचे तोंड स्वच्छ, कोरड्या व पांढऱ्या फडक्याने बांधावे. ही बरणी सकाळच्या किंवा संध्याकाळच्या कोवळ्या उन्हात ठेवावी.
 •  बरणी दुपारच्या कडक उन्हामध्ये ठेवू नये कारण बरणी जर कडक उन्हात ठेवली तर गुलकंदाचा सुगंध कमी होईल. त्याचा रंगही काळपट होण्याची शक्यता असते. बरणी कोवळ्या उन्हात ठेवल्यानंतर रोज किंवा एक दिवसाआड हलवावी.
 • साधारणतः: एका आठवड्याने उन्हामुळे साखरेचा पाक होईल. त्यात गुलाबाच्या पाकळ्या मुरून गुलकंद तयार होईल.

गुलकंद खाण्याचे फायदे 

 • अन्नाच्या नैसर्गिक पचनास मदत करते.
 • शरीरातील रक्त शुद्ध करण्यास मदत.
 •  आम्लपित्तावर नियंत्रण ठेवण्यास मदत.
 •  गुलकंद कफनाशक, तृष्णानाशक, रक्तवर्धक आहे.
 •  गुलकंदाच्या सेवनाने भरपूर प्रमाणात नैसर्गिक कॅल्शिअम मिळते.
 •  गुलकंद ॲन्टिऑक्साईडन्ट म्हणून कार्य करते.
 •  उन्हाळ्यात येणारा थकवा, आळस, सांधेदुखी, जळजळ यावर गुणकारी.
 •  नजर चांगली ठेवण्यास मदत करते.
 •  ताप, रक्तपित्त, कांजिण्या यावर चांगला उपयोग होतो.

गुलाबाच्या पाकळ्यांचा जॅम

 • लाल गुलाबाची सुवासिक फुले घेऊन पाकळ्या वेगळ्या करून घ्याव्यात. त्या सध्या पाण्याने धुवून घ्याव्यात त्यानंतर त्याचे वजन करून घ्यावे. साधारणतः ९ किलो पाकळ्यांसाठी दीड लिटर पाणी वापरावे.
 • पाणी आणि पाकळ्यांचे मिश्रण अर्धा तास उकळत ठेवावे. फुलांचा रंग पूर्णपणे उतरल्यानंतर व पाकळ्यांचा मऊ लगदा तयार झाल्यानंतर मिश्रण स्वच्छ फडक्याने गाळून घ्यावे. हा सफेद मऊ लगदा कोमट राहील अशा रीतीने ठेवावा. ४ किलो साखर गाळून घेतलेल्या मिश्रणात टाकून मिश्रण चांगल्या प्रकारे ढवळावे.
 • पाक तयार होण्यासाठी मिश्रण शिजवत ठेवावे. गोळीबंद पाक तयार झाल्यानंतर त्यात कोमट लगदा घालून मिश्रण चांगले ढवळावे. पुन्हा सर्व मिश्रण शिजवून योग्य प्रकारे तयार झाल्यावर, थंड करून बाटल्यात भरावे.

गुलाबाच्या पाकळ्यांची जेली 

 • पूर्ण पक्व झालेले कवठ घेऊन त्याचा गर काढून घ्यावा. त्यानंतर गर कुस्करावा. गर काढल्यानंतर त्याच्या वजना इतक्या लाल किंवा गुलाबी गुलाबाच्या पाकळ्या घ्याव्यात. पाकळ्या आणि कवठाचा गर एकत्र त्यात दुप्पट पाणी घालावे. नंतर हे गर आणि पाकळ्यांचे मिश्रण ३० मिनिटे उकळावे. उकळल्यानंतर स्वच्छ कापडातून मिश्रण गाळून घ्यावे.
 • गाळून घेतलेल्या पाण्यात गर आणि पाकळ्यांचा वजनाइतकी किंवा बरोबरीने साखर घालावी. साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत मिश्रण ढवळावे. मधून मधून पाणी चाखून पाहावे. गोडी कमी असेल तर पुन्हा साखर घालावी. साखरेचे प्रमाण योग्य असल्यास पाक तयार करण्यासाठी मिश्रण उकळावे. घट्ट पाक झाल्यानंतर डब्यात भरून ठेवावा.मिश्रण थंड झाल्यावर त्याच्या वड्या तयार करता येतात.

संपर्क ः कीर्ती देशमुख, ८२७५४१२०६३
(विषय विशेषज्ञ (गृहविज्ञान) कृषी विज्ञान केंद्र,अकोला)


इतर कृषी प्रक्रिया
गुणकारी अन् औषधी हरभरासाधारणपणे हिवाळ्यात कोवळा हरभरा येतो. हरभऱ्याचे...
वातदोषावर उपाय ः हादग्याची फुले, शेंगाआयुर्वेदानुसार त्रिदोषांपैकी वातदोष कमी...
आरोग्यवर्धक तांदूळअन्नपदार्थात ‘तांदूळ’ सर्वांना सुपरिचित आहेच. या...
‘कल्पतरू’ चिक्कीची टेस्ट एकदम बेस्ट!औरंगाबाद जिल्ह्यात भटजी (ता. खुलताबाद) येथील राणी...
जवस : एक सुपर फूडजवस  पिकाचा प्रत्येक भाग हा...
आरोग्यदायी गुलकंदगुलकंद हा गुलाब फुलाच्या पाकळ्यापासून बनविलेला...
अंबाडीपासून प्रक्रियायुक्त पदार्थअंबाडी ही भाजी म्हणून काही प्रमाणात खाल्ली जाते....
प्रक्रियायुक्त आहारासाठी भरडधान्य...भरड धान्यामध्ये एकूणच प्रथिनांचे प्रमाण जास्त आहे...
आरोग्यदायी आले आल्यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्वे आणि खनिजे...
करार शेती यशस्वी होण्यासाठी पारदर्शकता...बाजारपेठेच्या मागणीनुसार बदलण्यामध्ये आपल्या...
संतुलीत आहार स्रोत ः सीताफळसीताफळाची लोकप्रियता कोरडवाहू लागवडयोग्य, कीड...
आहार अन्‌ प्रक्रिया उद्योगासाठी...भरड धान्ये इतर धान्यांच्या तुलनेने स्वस्त असतात....
काशीफळापासून रायता, सूप, हलवाकाशीफळामध्ये जीवनसत्त्व, खनिजे आणि तंतुमय पदार्थ...
अळिंबीचे पौष्टिक, औषधी गुणधर्म अन्...लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनी अळिंबी (मशरूम)...
पपईपासून बनवा मूल्यवर्धित पदार्थपपई ही आरोग्यास पोषक असून, त्यापासून जाम, जेली,...
आवळा प्रक्रिया उद्योगातील संधीआवळा फळांमध्ये असणारे औषधी गुणधर्म व भरपूर...
गुलाबापासून गुलकंद, जॅम,जेलीगुलाबाच्या पाकळ्यापासून गुलकंद, जॅम, जेली इत्यादी...
फळे, भाजीपाल्याचे पूर्व शीतकरणपूर्व-शीतकरणाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे पीक...
मसाल्यातील भेसळ ओळखण्याच्या पद्धती बाजारामध्ये उपलब्ध असलेल्‍या अनेक मसाल्यांमध्ये...
संत्र्याचे काढणीपश्‍चात तंत्रज्ञानसंत्रावर्गीय फळांचा आकर्षक रंग,स्वाद, चव टिकून...