सोयाबीनचे मूल्यवर्धित पदार्थ

सोयाबीनपासून सोया-दूध, सोया पनीर, पीठ आणि टोफूसारखे सोया आधारित पदार्थ तयार केले जातात. मांस आणि दुग्धजन्य पदार्थाला पर्याय म्हणून सोयाबीनचे सेवन केले जाते. सोयाबीनपासून तेलही तयार केले जाते.
value added products of soyabean
value added products of soyabean

सोयाबीनपासून सोया-दूध, सोया पनीर, पीठ आणि टोफूसारखे सोया आधारित पदार्थ तयार केले जातात. मांस आणि दुग्धजन्य पदार्थाला पर्याय म्हणून सोयाबीनचे सेवन केले जाते. सोयाबीनपासून तेलही तयार केले जाते.  सोयाबीनला प्रथिनांचा उत्तम स्रोत मानला जातो. शाकाहारी लोकांसाठी  सोयाबीन मांसाइतकेच पोषण पुरवते. त्यामुळे शाकाहारी लोकांनी आहारात सोयाबीनचा समावेश करणे अतिशय चांगले आहे. यामध्ये विविध जीवनसत्त्वे, खनिजे आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. जे मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास, वजन कमी करण्यास आणि हृदयाचे आरोग्य राखण्यास मदत करतात. सोयाबीन झोपेचे विकार आणि पचन सुधारते. सोयाबीनपासून सोया-दूध, सोया पनीर, पीठ आणि टोफूसारखे सोया आधारित पदार्थ तयार केले जातात. मांस आणि दुग्धजन्य पदार्थाला पर्याय म्हणून सोयाबीनचे सेवन केले जाते. सोयाबीनपासून तेलही तयार केले जाते.  आरोग्यदायी फायदे 

  • सोयाबीन बियांची भाजी, तेल, सोयाबीन दूध आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. अशक्तपणा (लाल रक्त पेशींची कमतरता) आणि हाडे कमकुवत होणे इत्यादींवर फायदेशीर आहे.
  • हृदयाशी संबंधित आजारांवर सोयाबीनचे सेवन करणे फायदेशीर मानले जाते. 
  • स्त्रियांमध्ये मासिक क्रिया बंद झाल्यामुळे शरीरात इस्ट्रोजनची कमतरता दिसून येते. ज्यामुळे महिलांची हाडे वेगाने कमकुवत होऊन सांधे दुखीचा त्रास उद्भवतो. यासाठी सोयाबीनमधील फायटोएस्ट्रोजेन शरीरात इस्ट्रोजनची कमतरता पूर्ण करण्यात मदत करतात.  
  • यामध्ये कॅल्शिअम आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. ते हाडांच्या मजबूत करण्यास मदत करतात. 
  • सोयाबीनमधील आयसोफ्लाव्होन नावाचा घटक मधुमेह आणि हृदयरोगाचा धोका कमी करतो. कर्बोदके कमी असल्याने मधुमेहींसाठी उत्तम कडधान्य ठरते.
  • सोयाबीनचे सेवन करण्यामुळे कोलेस्टेरॉल आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. मधुमेहाच्या रुग्णांना सोयाबीनची भाकरी फायदेशीर ठरते. 
  • सोयाबीन शरीराच्या वाढीस मदत करते. हे त्वचा, स्नायू, नखे, केस वाढण्यास मदत करते. सोयाबीनच्या बिया खाल्ल्याने त्वचा निरोगी होते. सोयाबीनच्या सेवनामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो. 
  • विविध प्रक्रियायुक्त पदार्थ सोया दूध  सोयाबीन रात्रभर पाण्यात भिजत ठेवावे. भिजल्यानंतर त्यावरील आवरण काढून घ्यावे. आवरण काढलेले सोयाबीन मिक्सरमधून बारीक करून घ्यावे. बारीक केलेले मिश्रण स्वच्छ कापडामधून गाळून घ्यावे. तयार सोयाबीन दूध  मंद आचेवर २० मिनिटे चांगले शिजवून घ्यावे. सतत ढवळत राहावे. गरम सोयाबीन दूध थंड करून खाण्यासाठी वापरावे.  पीठ  सोयाबीन स्वच्छ करून चांगले धुऊन घ्यावे. धुतलेले सोयाबीन पाण्यात १२ तास भिजण्यास ठेवावे. चांगले भिजल्यानंतर मंद आचेवर २ मिनिटे उकळून घ्यावे. उकळल्यावर थंड पाण्यात टाकून त्याची साल काढावी. साल काढलेले सोयाबीन रात्रभर कोरडे होण्यास ठेवून द्यावे. दुसऱ्या दिवशी कोरडे झालेले सोयाबीन कडक  होईपर्यंत भाजून घ्यावे. थोडे थंड झाल्यानंतर त्याचे बारीक पीठ करून घ्यावे.   सोया पनीर  सोयाबीन दूध मंद आचेवर चांगले उकळून घ्यावे. दूध चांगले उकळल्यानंतर ते फोडण्यासाठी लिंबू किंवा दह्याचे विरजण टाकून चांगले मिसळून घ्यावे. मिश्रण जास्त ढवळू नये. तयार मिश्रण २०-२५ मिनिटे घट्ट होण्यासाठी ठेवून द्यावे. घट्ट झालेले मिश्रण स्वच्छ कापडामध्ये टाकून जास्त दाब न देता पिळून घ्यावे. पिळल्यानंतर २-३ तास टांगून ठेवावे. त्यानंतर कापडामधून सोया पनीर बाजूला काढून काप करावेत. या प्रक्रियेदरम्यान त्यावर जास्त दाब पडू देऊ नये. दाब पडल्यास पनीरमध्ये पाण्याचे प्रमाण फार कमी होते व खाण्यास मऊ लागत नाही.  प्रक्रिया करूनच वापरा सोयाबीन

  • सोयाबीनपासून पारंपरिक पद्धतीने घरगुती पदार्थ बनवता येतात. हे पदार्थ बनवत असताना काळजी घेणे आवश्यक आहे. जसे की, कच्चे सोयाबीन आहारात वापरू नये. 
  • सोयाबीनवर प्रक्रिया करूनच त्याचा वापर करावा. त्यातील विरोधी पोषण मूल्यांचे प्रमाण कमी होणे आवश्यक आहे. त्यासाठी सोयाबीन दाण्यावरील साल काढणे, आंबवणे, डाळ बनवून भाजून वापरणे अशा विविध प्रक्रिया कराव्या लागतात. त्यामुळे सोयाबीनमधील पोषणमुल्यांचे प्रमाण वाढते. 
  • संपर्क ः अमरसिंह सोळंके, ९९२१०९२२२२ (आदित्य अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, बीड)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com