agriculture news in marathi value added products of soyabean | Agrowon

सोयाबीनचे मूल्यवर्धित पदार्थ

पल्लवी कांबळे, अमरसिंह सोळंके
शनिवार, 24 ऑक्टोबर 2020

सोयाबीनपासून सोया-दूध, सोया पनीर, पीठ आणि टोफूसारखे सोया आधारित पदार्थ तयार केले जातात. मांस आणि दुग्धजन्य पदार्थाला पर्याय म्हणून सोयाबीनचे सेवन केले जाते. सोयाबीनपासून तेलही तयार केले जाते. 

सोयाबीनपासून सोया-दूध, सोया पनीर, पीठ आणि टोफूसारखे सोया आधारित पदार्थ तयार केले जातात. मांस आणि दुग्धजन्य पदार्थाला पर्याय म्हणून सोयाबीनचे सेवन केले जाते. सोयाबीनपासून तेलही तयार केले जाते. 

सोयाबीनला प्रथिनांचा उत्तम स्रोत मानला जातो. शाकाहारी लोकांसाठी  सोयाबीन मांसाइतकेच पोषण पुरवते. त्यामुळे शाकाहारी लोकांनी आहारात सोयाबीनचा समावेश करणे अतिशय चांगले आहे. यामध्ये विविध जीवनसत्त्वे, खनिजे आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. जे मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास, वजन कमी करण्यास आणि हृदयाचे आरोग्य राखण्यास मदत करतात. सोयाबीन झोपेचे विकार आणि पचन सुधारते.

सोयाबीनपासून सोया-दूध, सोया पनीर, पीठ आणि टोफूसारखे सोया आधारित पदार्थ तयार केले जातात. मांस आणि दुग्धजन्य पदार्थाला पर्याय म्हणून सोयाबीनचे सेवन केले जाते. सोयाबीनपासून तेलही तयार केले जाते. 

आरोग्यदायी फायदे 

  • सोयाबीन बियांची भाजी, तेल, सोयाबीन दूध आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. अशक्तपणा (लाल रक्त पेशींची कमतरता) आणि हाडे कमकुवत होणे इत्यादींवर फायदेशीर आहे.
  • हृदयाशी संबंधित आजारांवर सोयाबीनचे सेवन करणे फायदेशीर मानले जाते. 
  • स्त्रियांमध्ये मासिक क्रिया बंद झाल्यामुळे शरीरात इस्ट्रोजनची कमतरता दिसून येते. ज्यामुळे महिलांची हाडे वेगाने कमकुवत होऊन सांधे दुखीचा त्रास उद्भवतो. यासाठी सोयाबीनमधील फायटोएस्ट्रोजेन शरीरात इस्ट्रोजनची कमतरता पूर्ण करण्यात मदत करतात.  
  • यामध्ये कॅल्शिअम आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. ते हाडांच्या मजबूत करण्यास मदत करतात. 
  • सोयाबीनमधील आयसोफ्लाव्होन नावाचा घटक मधुमेह आणि हृदयरोगाचा धोका कमी करतो. कर्बोदके कमी असल्याने मधुमेहींसाठी उत्तम कडधान्य ठरते.
  • सोयाबीनचे सेवन करण्यामुळे कोलेस्टेरॉल आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. मधुमेहाच्या रुग्णांना सोयाबीनची भाकरी फायदेशीर ठरते. 
  • सोयाबीन शरीराच्या वाढीस मदत करते. हे त्वचा, स्नायू, नखे, केस वाढण्यास मदत करते. सोयाबीनच्या बिया खाल्ल्याने त्वचा निरोगी होते. सोयाबीनच्या सेवनामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो. 

विविध प्रक्रियायुक्त पदार्थ
सोया दूध 

सोयाबीन रात्रभर पाण्यात भिजत ठेवावे. भिजल्यानंतर त्यावरील आवरण काढून घ्यावे. आवरण काढलेले सोयाबीन मिक्सरमधून बारीक करून घ्यावे. बारीक केलेले मिश्रण स्वच्छ कापडामधून गाळून घ्यावे. तयार सोयाबीन दूध  मंद आचेवर २० मिनिटे चांगले शिजवून घ्यावे. सतत ढवळत राहावे. गरम सोयाबीन दूध थंड करून खाण्यासाठी वापरावे. 

पीठ 
सोयाबीन स्वच्छ करून चांगले धुऊन घ्यावे. धुतलेले सोयाबीन पाण्यात १२ तास भिजण्यास ठेवावे. चांगले भिजल्यानंतर मंद आचेवर २ मिनिटे उकळून घ्यावे. उकळल्यावर थंड पाण्यात टाकून त्याची साल काढावी. साल काढलेले सोयाबीन रात्रभर कोरडे होण्यास ठेवून द्यावे. दुसऱ्या दिवशी कोरडे झालेले सोयाबीन कडक  होईपर्यंत भाजून घ्यावे. थोडे थंड झाल्यानंतर त्याचे बारीक पीठ करून घ्यावे. 

 सोया पनीर 
सोयाबीन दूध मंद आचेवर चांगले उकळून घ्यावे. दूध चांगले उकळल्यानंतर ते फोडण्यासाठी लिंबू किंवा दह्याचे विरजण टाकून चांगले मिसळून घ्यावे. मिश्रण जास्त ढवळू नये. तयार मिश्रण २०-२५ मिनिटे घट्ट होण्यासाठी ठेवून द्यावे. घट्ट झालेले मिश्रण स्वच्छ कापडामध्ये टाकून जास्त दाब न देता पिळून घ्यावे. पिळल्यानंतर २-३ तास टांगून ठेवावे. त्यानंतर कापडामधून सोया पनीर बाजूला काढून काप करावेत. या प्रक्रियेदरम्यान त्यावर जास्त दाब पडू देऊ नये. दाब पडल्यास पनीरमध्ये पाण्याचे प्रमाण फार कमी होते व खाण्यास मऊ लागत नाही. 

प्रक्रिया करूनच वापरा सोयाबीन

  • सोयाबीनपासून पारंपरिक पद्धतीने घरगुती पदार्थ बनवता येतात. हे पदार्थ बनवत असताना काळजी घेणे आवश्यक आहे. जसे की, कच्चे सोयाबीन आहारात वापरू नये. 
  • सोयाबीनवर प्रक्रिया करूनच त्याचा वापर करावा. त्यातील विरोधी पोषण मूल्यांचे प्रमाण कमी होणे आवश्यक आहे. त्यासाठी सोयाबीन दाण्यावरील साल काढणे, आंबवणे, डाळ बनवून भाजून वापरणे अशा विविध प्रक्रिया कराव्या लागतात. त्यामुळे सोयाबीनमधील पोषणमुल्यांचे प्रमाण वाढते. 

संपर्क ः अमरसिंह सोळंके, ९९२१०९२२२२
(आदित्य अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, बीड)


इतर कृषी प्रक्रिया
आहारात समाविष्ट करा पौष्टिक पदार्थरोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारात पौष्टिक...
ड्रॅगन फ्रूट प्रक्रियेतील संधीशरीरातील कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यासाठी आणि...
प्रक्रियेद्वारे आल्याचे मूल्यवर्धनआले हे महत्त्वाच्या मसाला पिकांपैकी एक आहे....
टोमॅटोपासून केचअप, सूप, प्यूरीटोमॅटो अत्यंत नाशवंत फळभाजी असून काढणीनंतर लगेच...
आरोग्यदायी व्हर्जीन कोकोनट ऑइलव्हर्जीन कोकोनट ऑइल तेल उत्कृष्ट पौष्टिक पदार्थ...
अंड्यापासून जॅम, पनीर निर्मितीसर्वांत स्वस्त, उत्तम पोषणतत्त्वे असणारा पदार्थ...
बहुगुणी राळाराळा साधारणपणे हलक्या पिवळसर रंगाचे आणि मोहरीच्या...
लसणापासून लोणचे, जेली, चटणीलसूण हा आपल्या सर्वांना परिचित आहे. लसणाचा उपयोग...
लिंबू प्रक्रियेतील संधी लिंबाच्या रसात जंतुनाशकता व रोगप्रतिकारकता...
अळिंबी स्पॉन निर्मिती तंत्रज्ञानअळिंबी लागवडीसाठी योग्य प्रकारचे स्पॉन आणि त्याची...
जवस एक सुपरफूडअलीकडच्या काळात जवस एक सुपरफूड म्हणून उदयास येत...
खरबुजापासून पावडर, सरबतखरबुजाचे  मूल्यवर्धन वेगवेगळ्या स्वरूपात...
आरोग्यवर्धक लसूण लसणाचा उपयोग स्वयंपाकात अन्न स्वादिष्ट होण्यासाठी...
अळिंबीची मूल्यवर्धित उत्पादनेपारंपरिक पदार्थांमध्ये वाळलेल्या आणि पावडर धिंगरी...
शास्त्रोक्त पद्धतीने हळद बियाण्याची...निर्यातक्षम व गुणवत्तापूर्ण हळदीच्या उत्पादनासाठी...
चिंचेपासून प्रक्रिया केलेले पदार्थचिंच चवीला आंबट, तुरट व थोडीशी गोडसर असते. विविध...
आरोग्यदायी किवी फळकिवी  हे हिरवट चॉकलेटी रंगाचे केसाळ आंबट-गोड...
बेलफळाच्या प्रक्रिया उद्योगाला संधीबेलापासून जेली, जॅम, सरबत निर्मिती करता येते. या...
अळिंबीपासून केचअप, कॅण्डी, मुरंबाअळिंबीमध्ये जास्त आर्द्रता असल्यामुळे अळिंबीचा...
आरोग्यदायी हळद मिश्रित दूधहळदीचा वापर औषधोपचारामध्ये चांगल्या प्रकारे होते...