चिंचेपासून जॅम, जेली, स्क्वॅश

दैनंदिन आहारामध्ये चवीकरीता चिंचेचा वापर केला जातो. सांबर, चटणी, पाणीपुरी, भेळ यामध्ये चिंचेचा वापर होतो. चिंचेच्या बियांमध्ये कॅल्शिअमचे प्रमाण भरपूर असल्याने, कोंबडी खाद्यात याचा वापर करतात.
 tamarind
tamarind

महाराष्ट्रात चिंचेचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. दैनंदिन आहारामध्ये चवीकरीता चिंचेचा वापर केला जातो. सांबर, चटणी, पाणीपुरी, भेळ यामध्ये चिंचेचा वापर होतो. चिंचेच्या बियांमध्ये कॅल्शिअमचे प्रमाण भरपूर असल्याने, कोंबडी खाद्यात याचा वापर करतात. महाराष्ट्रात चिंचेचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. दैनंदिन आहारामध्ये चवीकरीता चिंचेचा वापर केला जातो. सांबर, चटणी, पाणीपुरी, भेळ यामध्ये चिंचेचा वापर होतो. चिंचेच्या बियांमध्ये कॅल्शिअमचे प्रमाण भरपूर असल्याने, कोंबडी खाद्यात याचा वापर करतात. तसेच घोंगडी उत्पादक घोंगडीला खळ देण्यासाठीदेखील वापर करतात. चिंचेवर प्रक्रिया करण्याअगोदर चिंचेची टरफले, शिरा व आतील चिंचोके काढून टाकावेत. त्यात थोडेसे बारीक मीठ टाकून त्याचे गोळे करावेत. चिंचेपासून गर, सरबत, सॉस, वडी, जाम-जेली, स्क्वॅश, टॉफी असे अनेक खाद्यपदार्थ बनविले जातात. या उत्पादनांना स्थानिक आणि परदेशी बाजारपेठेत चांगली मागणी आहे. प्रक्रियायुक्त पदार्थ  गर  प्रथम चिंचेची टरफले, बिया व शिरा काढून टाकाव्यात. एक किलो चिंचेकरिता दीड लिटर पाणी घेऊन त्यात चिंच १० ते १२ तास भिजत ठेवावी. चिंच पाण्यात पूर्ण बुडेल याची काळजी घ्यावी. चिंच भिजल्यानंतर पल्परमधून त्याचा गर काढावा. काढलेल्या गराचे वजन करावे. हा गर ८० ते ८५ अंश सेल्सिअस तापमानाला अर्धा तास गरम करून घ्यावा. गरम गरामध्ये ६५० मिलिग्रॅम सोडिअम बेन्झोएट प्रती किलो गर या प्रमाणात टाकून चांगले एकजीव करावे. गर निर्जंतुक केलेल्या बाटल्यात हवाबंद करावा. मागणीनुसार बाजारामध्ये विक्रीसाठी पाठवावा. सॉस  साहित्य  चिंच गर १० किलो, बारीक मीठ ७०० ते ८५० ग्रॅम, आले पेस्ट १५ ते २० ग्रॅम, मिरची पावडर १० ते १५ ग्रॅम, दालचिनी पावडर १० ते १५ ग्रॅम, काळेमिरे पावडर २.५ मिलिग्रॅम, पेक्टिन २५ मिलिग्रॅम, साखर ५०० ग्रॅम, चिरलेला कांदा १०० ग्रॅम, लसूण पेस्ट १० ग्रॅम, विलायची पावडर ३ ग्रॅम, लवंग पावडर ३ ग्रॅम, व्हिनेगर २५० ग्रॅम. कृती  एका मलमलच्या कापडामध्ये वरील मसाल्याचे पदार्थांच्या पावडरी बांधून त्याची पुरचुंडी करावी. मंद आचेवर स्टीलच्या पातेल्यात गर घेऊन त्यात २०० ग्रॅम साखर टाकावी. त्या मिश्रणामध्ये बांधलेली मसाल्याची पुरचुंडी सोडावी. मिश्रण शिजत असताना या पुरचुंडीला पळीने दाबावे. म्हणजे मसाल्याचा अर्क मिश्रणात उतरेल. उरलेली साखर, पेक्टिन व मीठ टाकून मिश्रणाचा ब्रिक्स ३० अंशापर्यंत आणावा. योग्य घट्टपणा आल्यानंतर त्यात व्हिनेगार मिसळावे. तयार मिश्रण निर्जंतुक केलेल्या बाटल्यांत हवाबंद करावा. योग्य ते लेबलिंग करून विक्रीस पाठवावे. तयार सॉस थंड कोरड्या जागी १० ते १२ महिने चांगला राहतो.  टॉफी  साहित्य  चिंच गर १ किलो, साखर १ किलो, दूध पावडर २०० ग्रॅम, गावरान तूप १०० ग्रॅम, मीठ ५ ग्रॅम. कृती  जाडबुडाच्या पातेल्यात तूप गरम करून वितळून घ्यावे. त्यात चिंचेचा गर व दूध पावडर टाकून मिश्रण एकजीव करून घ्यावे. मिश्रण करपू नये, यासाठी सतत हलवत राहावे. मिश्रण चांगले घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यावे. हे मिश्रण तूप लावलेल्या ट्रे मध्ये पसरावे. मिश्रण थंड झाल्यानंतर त्याचे काप करावेत. तयार चिंचवडी प्लास्टिकच्या लॅमिनेशन केलेल्या आकर्षक कागदात पॅक करावी. तयार टॉफी ५ ते ६ महिने चांगली राहते. जॅम  स्टीलच्या पातेल्यात एक किलो चिंचेचा गर घ्यावा. पातेल्यात १ किलो चिंच गरासाठी पाऊण किलो साखर व ५ ग्रॅम पेक्टिन टाकून मंद आचेवर ठेवावे. साखर पूर्ण विरघळेपर्यंत पळीने सतत ढवळत राहावे. थोडे पाणी घेऊन त्यामध्ये सोडीयम हायड्रॉक्साईड ६ ग्रॅम मिसळून ते पाणी गरामध्ये टाकावे. गराचा ब्रिक्स ७० अंश येईपर्यंत मिश्रण ढवळत राहावे. गरम मिश्रण निर्जंतुक बाटल्यांमध्ये भरून हवाबंद करावे. लेबलिंग करून मागणीनुसार पाठवून द्यावे. जेली  चिंच गर स्टीलच्या पातेल्यात घेऊन मंद आचेवर अर्धा ते पाऊण तास उकळून घ्यावा. गर चांगला उकळल्यानंतर गॅस बंद करून मिश्रण थंड होण्यास ठेवून द्यावे. थंड झालेले मिश्रण पातळ कापडातून गाळून घ्यावे. उरलेला चिंचेचा चोथा टाकून द्यावा. गाळलेले मिश्रण एका भांड्यात घेऊन ते १० ते १२ तास स्थिर ठिकाणी ठेवून द्यावे. त्यानंतर भांडे हळूवार तिरके करून वरील बाजूचे स्वच्छ मिश्रण दुसऱ्या भांड्यात काढून घ्यावे. खालचा गाळ येणार नाही याची काळजी घ्यावी. पातेल्यात घेतलेल्या स्वच्छ मिश्रणाइतकीच साखर जेलीसाठी वापरावी. मिश्रणात १० ग्रॅम पेक्टीन व १ किलो साखर टाकून पळीने ढवळावे. नंतर थोड्याशा पाण्यात ६ ग्रॅम सोडीयम हायड्रॉक्साईड विरघळून घ्यावे. मिश्रण मंद आचेवर ७० ब्रिक्स येईपर्यंत गरम करावे. त्यावर आलेली मळी झऱ्याने काढून टाकावी. तयार जेली निर्जंतुक केलेल्या बाटल्यांमध्ये भरून हवाबंद करावी. बाटल्यांवर योग्य ते लेबलिंग करून विक्रीस पाठवून द्याव्यात. स्क्वॅश  साहित्य चिंच गर १ लिटर, साखर १.५ किलो, पाणी १.५ लिटर, सोडियम बेन्झोएट १ ग्रॅम. कृती  जाड बुडाच्या पातेल्यामध्ये चिंच गर, साखर व पाणी टाकून मंद आचेवर ठेवावे. मिश्रण सतत ढवळत राहावे, म्हणजे करपणार नाही. मिश्रण गरम झाल्यानंतर एका ग्लासात थोडासा गर घेऊन त्यात सोडिअम बेन्झोएट मिसळावे. गॅस बंद करावा. पातेल्यामध्ये ग्लासातील मिश्रण टाकून पळीने चांगले एकजीव करावे. तयार स्क्वॅश निर्जंतुक केलेल्या बाटल्यांमध्ये भरून हवाबंद करावा. स्क्वॅश थंड व कोरड्या जागेत १० ते १२ महिने चांगला राहतो. सरबत  साहित्य  चिंच गर १ लिटर, साखर १.५० किलो, जिरे पावडर १० ग्रॅम, सोडियम बेन्झोएट १ ग्रॅम, गरजेनुसार खाद्य रंग. कृती  सरबत तयार करण्यासाठी ॲल्युमिनिअमच्या जाडबुडाच्या पातेल्याचा वापर करावा. पातेल्यामध्ये गर, साखर व पाणी टाकून मंद आचेवर ठेवावे. मिश्रण सतत ढवळत राहावे, म्हणजे करपणार नाही. मिश्रण गरम झाल्यानंतर एका ग्लासात थोडा गर घेऊन त्यात सोडियम बेन्झोएट व रंग मिसळून एकजीव करावे. पातेले खाली उतरून पातळ फडक्याने रस गाळून घ्यावा. गाळलेल्या रसामध्ये ग्लासातील मिश्रण टाकून पळीने एकजीव करावे. तयार सरबत निर्जंतुक बाटल्यात भरून हवाबंद करावा. हे सरबत थंड जागेत ६ ते ७ महिने चांगला राहते. संपर्क ः के. एम.चक्रे, ९८२२७७५२५५ (सौ. के.एस.के. (काकू) अन्नतंत्र महाविद्यालय, बीड)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com