agriculture news in marathi value added products of toamto | Agrowon

टोमॅटोपासून केचअप, चटणी, वेफर्स

गणेश गायकवाड, डॉ. विजया पवार
सोमवार, 14 सप्टेंबर 2020

बाजारातील दर कमी झाल्यावर टोमॅटो फेकून दिले जातात. मात्र, टोमॅटोवर प्रक्रिया करून त्याचे मुल्यवर्धन केल्यास अधिक नफा मिळू शकतो. दिवसेंदिवस बाजारात प्रक्रियायुक्त पदार्थांची मागणी वाढत चालली आहे.

बाजारातील दर कमी झाल्यावर टोमॅटो फेकून दिले जातात. मात्र, टोमॅटोवर प्रक्रिया करून त्याचे मुल्यवर्धन केल्यास अधिक नफा मिळू शकतो. दिवसेंदिवस बाजारात प्रक्रियायुक्त पदार्थांची मागणी वाढत चालली आहे. टोमॅटो सॉस, प्युरी, पेस्ट, रस, चटणी यांसारख्या पदार्थांना चांगली मागणी आहे. पिकलेल्या लालसर टोमॅटोपासून सूप, लोणचे,  सॉस, जाम, ज्युस बनवता येतात. 

आरोग्यदायी फायदे 

  • पाठदुखी, सांधेदुखी आणि इतर स्नायूंच्या वेदनांवरही टोमॅटो फायदेशीर आहे.
  • टोमॅटोमधील क्रोमिअम हा घटक रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो.
  • डोळ्यांच्या संबंधी समस्यांवर टोमॅटो गुणकारी आहे. रोज टोमॅटोचे सेवन केल्याने नजर चांगली होण्यास मदत होते. टोमॅटोमधील जीवनसत्त्व-अ कमी दिसणे आणि रातांjuiceधळेपणावर फायदेशीर मानले जाते.
  •  उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी व्यक्तींनी आहारात टोमॅटोचा जास्तीत जास्त वापर करावा. आहारात पोटॅशिअम योग्य प्रमाणात नसल्यास उच्च रक्तदाबाचा धोका संभवतो. ताजे टोमॅटो खाल्ल्याने शरीराला आवश्‍यक असणारे पोटॅशिअम उपलब्ध होते.
  • जास्तीत जास्त टोमॅटो खाल्ल्याने उच्च रक्तदाबासह हृदयाशी संबंधित आजार कमी होण्यास मदत होते.
  • टोमॅटोमधील लायकोपेन हे कॅन्सरच्या पेशी कमी करते. तसेच कॅन्सरचा धोका कमी करते.
  • रोज टोमॅटोचे सेवन केल्यास वजन कमी होण्यास मदत होते. शरीर निरोगी व तंदुरुस्त राहते.

प्रक्रियायुक्त पदार्थं 
रस 
थंड प्रक्रिया 

टोमॅटोचे बारीक तुकडे करावेत. मिक्सरमधून टोमॅटोचा रस तयार करून त्यात साखर टाकावी. या पद्धतीद्वारे केलेला रस जास्त काळ टिकत नाही.

गरम प्रक्रिया 
स्वच्छ धुतलेले टोमॅटो ५ ते १० मिनिट पाण्यामध्ये चांगले शिजवून घ्यावेत. त्याचे बारीक तुकडे करून मिक्सरच्या साह्याने रस काढावा. तयार रसामध्ये साखर टाकावी. या पद्धतीद्वारे तयार केलेला रस जास्त काळ टिकतो.

सॉस 
साहित्य 

टोमॅटो गर किंवा पेस्ट १ किलो, साखर ७५ ग्रॅम, कांदा पेस्ट १५ ग्रॅम, लसूण २ ग्रॅम, दालचिनी, जायपत्री, विलायची, मिरे प्रत्येकी २-३ ग्रॅम, मिरची पूड २ ग्रॅम, मीठ १० ग्रॅम, सोडिअम बेन्झोएट ०.७५ ग्रॅम किंवा व्हिनेगार ४० मिलि

कृती 
सॉस बनवण्यासाठी लाल रंगाचे टोमॅटो निवडावे. टोमॅटो स्वच्छ धुऊन त्यातील खराब भाग काढून टाकावा. उकळत्या पाण्यात २-३ मिनिटांसाठी टोमॅटो टाकून लगेच थंड करावेत. या प्रक्रियेमुळे टोमॅटोची साल सैल होऊन लगेच निघते. साल काढून टोमॅटोचे काप करावेत. काप मिक्सरमध्ये टाकून गर तयार करावा. गर चाळण किंवा मलमलच्या कापडातून गाळून त्यातील बिया आणि साल वेगळे करावे. तयार गर स्टीलच्या पातेल्यात घेऊन गॅसवर जास्त तापमानावर उकळावा (गराची पातळी १ तृतीयांश ने कमी होईपर्यंत उष्णता द्यावी). उष्णता कमी करून मंद आचेवर गरामध्ये एकूण साखरेच्या १ तृतीयांश साखर टाकून मिश्रण चमच्याने ढवळावे. सामग्रीतील सर्व मसाले मिक्सरमधून बारीक करावे. मसाले कापडाच्या छोट्या पुरचुंडीत बांधून ती मिश्रणात फिरवावी. त्यानंतर उरलेली साखर, मीठ व सोडिअम बेन्झोएट किंवा व्हिनेगार मिश्रणात टाकावे. मिश्रणातील साखरेचे प्रमाण २८ ते ३० ब्रिक्स येईपर्यंत उष्णता देत राहावे. तयार सॉस थंड करून निर्जंतुक बाटल्यांमध्ये भरावा.

चटणी 
साहित्य 

टोमॅटो १ किलो, कापलेले कांदे १०० ग्रॅम, साखर ५०० ग्रॅम, मीठ २५ ग्रॅम, आले ८ ग्रॅम, लाल मिरची पावडर १० ग्रॅम, बारीक केलेली दालचिनी, काळी मिरी, मोठी विलायची, जिरे प्रत्येकी १० ग्रॅम, व्हिनेगार १०० मिलि

कृती 
प्रथम पूर्ण पिकेलेले टोमॅटो स्वच्छ धुऊन घ्यावेत. टोमॅटो उकळत्या पाण्यात २-३ मिनिटे बुडवून लगेच थंड पाण्यात टाकावेत. यामुळे साल सैल होऊन लगेच निघते. साल काढलेले टोमॅटो कुसकरून किंवा पल्परच्या साह्याने त्यांचा गर काढावा. मीठ व व्हिनेगार सोडून वरील सर्व साहित्य भांड्यामध्ये घेऊन घट्ट होईपर्यंत शिजवावेत. त्यानंतर शेवटी मीठ व व्हिनेगार घालून मिश्रण पुन्हा १० मिनिटे शिजवावे. तयार चटणी गरम असतानाच निर्जंतुक बाटल्यांमध्ये भरून हवाबंद करावी. बाजारपेठेत विक्रीसाठी चटणी करायची असल्यास, ती दीर्घकाळ टिकणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रति १ किलो चटणीच्या ०.५ ग्रॅम सोडिअम बेन्झोएट सर्वांत शेवटी मिसळावे. 

वेफर्स 
प्रथम टोमॅटोच्या बारीक पातळ चकत्या कराव्यात. चकत्या कडक होईपर्यंत सावलीमध्ये वाळवाव्यात. वाळलेल्या चकत्या गरम तेलात तळून घ्याव्यात. तयार वेफर्सवर आवश्‍यकतेनुसार तिखट, मीठ व जिरे टाकावे.

पेस्ट 
पेस्ट तयार करण्यासाठी टोमॅटोचा रस आटवून त्यातील घन घटकाचे प्रमाण २५% आणावे. तयार पेस्ट थंड करून पॅक करावी.

प्युरी 
टोमॅटोचा रस मीठ टाकून आटवावा. त्यातील घन घटकाचे प्रमाण ९-१२ % आणावे. तयार प्युरी थंड करून पॅक करावी.

संपर्क- गणेश गायकवाड, ९८५०२३६३८०
(पीएच. डी. स्कॉलर, अन्नतंत्र महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)


इतर कृषी प्रक्रिया
चिंचेपासून मूल्यवर्धित पदार्थचिंचेपासून मूल्यवर्धित पदार्थांच्या निर्मितीला...
फालसापासून जाम, जेली, चटणीफालसा हा एक रानमेवा आहे. फालसा फळामध्ये प्रथिने,...
छोट्या उद्योगात नफा कसा वाढवावा?नवीन लघुउद्योग सुरू केल्यानंतर उद्योजकांना अनेक...
हळदीपासून मूल्यवर्धित पदार्थ...बहुतांश भारतीय भाज्यांमध्ये हळदीचा कमी अधिक वापर...
दुधीभोपळ्यापासून टुटीफुटी, पावडर, वडीबऱ्याच लोकांना दुधी भोपळ्याची भाजी आवडत नाही....
सुरणपासून रुचकर पदार्थसुरण या कंदपिकापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ...
टोमॅटोपासून केचअप, चटणी, वेफर्सबाजारातील दर कमी झाल्यावर टोमॅटो फेकून दिले जातात...
उद्योजकतेतून ग्रामीण विकासाकडे...ग्रामीण भागासह सर्वत्र व्यवसाय, उद्योग याविषयी...
टोमॅटो निर्यात, प्रक्रिया उद्योगात संधीयेत्या काळात टोमॅटो उत्पादक प्रदेशांमध्ये सहकारी...
पनीर निर्मितीसह वाढवा टिकवणक्षमतापनीर हा भारतीय उपखंडामध्ये आहारामध्ये मोठ्या...
आल्यापासून कॅण्डी, लोणचे, मुरांबाअनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये आल्याचा वापर केला जातो...
डाळिंबापासून जॅम, जेली, स्क्वॅश ​डाळिंबापासून इतर फळाप्रमाणेच उत्तम प्रकारचे सिरप...
कृषी व्यवसायात भरपूर संधी, गरज योग्य...कृषी क्षेत्रात व्यवसायाला मोठा वाव आहे. कृषी...
पेरूपासून बनवा लोणचे, चीज, जेलीपेरूमधील जीवनसत्त्व क रोगप्रतिकारक शक्ती...
चिंच प्रक्रियेतून उद्योगाच्या संधीचिंचेच्या आंबट-मधुर व आम्लकारक चवीमुळे याचा वापर...
डाळिंबाचे औषधी गुणधर्म डाळिंबाची मधुर चव, बियांचा आकर्षक नैसर्गिक लाल...
केळीमधील सूत्रकृमीचे नियंत्रणकेळी पिकामध्ये पाच प्रकारचे सूत्रकृमी जास्त...
आरोग्यदायी तुतीची फळेतामिळनाडू राज्यातील रेशीम संशोधन व जर्मप्लाझम...
ग्लूटेनमुक्त आहार फायदेशीरग्लूटेन हा गहू, राई आणि बार्ली यांसारख्या ठरावीक...
डाळिंबासाठी पायाभूत सुविधांच्या...येत्या काळात डाळिंब फळांच्या बरोबरीने रस, पावडर,...