हळदीपासून मूल्यवर्धित पदार्थ उद्योगाच्या संधी

बहुतांश भारतीय भाज्यांमध्ये हळदीचा कमी अधिक वापर केला जातो. हळदीचा नैसर्गिक रंग अन्न, औषधी व सौदर्य प्रसाधन उद्योगात वापरतात. प्राचीन काळापासून भारतात हळदीचा आयुर्वेदात वापर केला जातो.
value added products of turmeric
value added products of turmeric

बहुतांश भारतीय भाज्यांमध्ये हळदीचा कमी अधिक वापर केला जातो. हळदीचा नैसर्गिक रंग अन्न, औषधी व सौदर्य प्रसाधन उद्योगात वापरतात. प्राचीन काळापासून भारतात हळदीचा आयुर्वेदात वापर केला जातो. आहारामध्ये कडू व तुरट रसाची गरज हळदीतून भरून निघते. भारत हा जगातील हळद पिकविणारा एक प्रमुख देश आहे. हळद हे एक मसाल्याच्या पिकातील प्रमुख नगदी पीक म्हणून प्रचलीत आहे. प्रतिवर्षी २५ लाख टन मसाले पिकांचे उत्पादन भारतात होते. महाराष्ट्रातही मसालेवर्गीय पिकांच्या लागवडीखालील क्षेत्रात लक्षणीय वाढ होत आहे. जगातील एकूण उत्पादनापैकी ७६ टक्के हळद भारतात होते.  महाराष्ट्रात हळद लागवड प्रामुख्याने सातारा, सांगली, कोल्हापूर, परभणी, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली, चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यात हळदीच्या क्षेत्रात कमालीची वाढ झाली आहे. मसाल्याचा एक आवश्यक पदार्थ म्हणून हळदीला जगभर मागणी आहे. हळदीमुळे खाद्य पदार्थांना आकर्षक सोनेरी पिवळा रंग व कस्तुरी सारखा स्वाद येतो. बहुतांश भारतीय भाज्यांमध्ये हळदीचा कमी अधिक वापर केला जातो. हळदीचा नैसर्गिक रंग अन्न, औषधी व सौदर्य प्रसाधन उद्योगात वापरतात. प्राचीन काळापासून भारतात हळदीचा आयुर्वेदात वापर केला जातो. आहारामध्ये कडू व तुरट रसाची गरज हळदीतून भरून निघते. हळदीमधील अनेक औषधी गुणधर्म सातत्याने पुढे येत आहे.

  • अन्न पचनासाठी पित्तशामक व रक्तशुद्धी करणारी औषधी आहे.
  • जखमेवरील उपचारामध्ये हळदीचा पारंपरिकरीत्या उपयोग केला जातो.
  • -हळद मूळव्याध, मधुमेह, कॅन्सर या विकारावरही उत्तम औषध आहे.
  • हळदीपासून बनवलेले मूल्यवर्धित पदार्थ : हळकुंडापासून हळद पावडर तयार करण्याची प्रक्रिया बहुतांश शेतकऱ्यांना माहिती आहे. कुरकुमीन  वाळलेल्या हळद पावडरपासून इथाईल अल्कोहोल हे द्रावक वापरून कुरकुमीन नावाचा घटक वेगळा काढता येतो. हळदीमध्ये कुरकुमीनचे प्रमाण जातीपरत्वे २ ते ६% इतके असते. कुरकुमीनचा वापर अनेक आयुर्वेदिक औषधे व सौंदर्य प्रसाधनांमध्ये केला जातो. वाळलेल्या हळदीचा पिवळेपणा कुरकुमीन या घटकामुळे असतो. अधिक कुरकुमीन असलेल्या हळदीस बाजारात चांगला बाजारभाव मिळतो. कुरकुमीनसाठी (४.५%) सेलम ही जात देखील उत्तम आहे. कुंकू हळदीचे गड्डे मुख्यत: कुंकू तयार करण्यासाठी वापरतात. त्यामध्ये टॅपिओका किंवा पांढऱ्या चिकणमातीचे खडे मिसळतात आणि त्यावर सल्फ्युरिक ॲसिड व बोरिक ॲसिडची प्रक्रिया करतात. हे मिश्रण वाळवून दळून काढले जाते. अशाप्रकारे हळदीपासून कुंकू तयार करण्याचे कारखाने अमरावती, पंढरपूर, तुळजापूर, पुणे, नाशिक येथे ठिकठिकाणी देवालयाच्या परिसरात आहेत. रंगनिर्मिती  लोकरी, रेशमी, सुती कपड्याला पिवळा रंग देण्यासाठी हळदीचा उपयोग करतात. सध्या काही प्रमाणात सुती कपड्यांना हळदीचा रंग देतात. औषधे, कन्फेक्शनरी उद्योगात हळदीचा रंगासाठी उपयोग होतो. वॉर्निश उद्योगातही हळदीचा उपयोग होतो. सुगंधी तेल  हळदीचे तेल नारंगी पिवळ्या रंगाचे व हळदीसारखा सुवास असणारे असते. हळदीच्या ताज्या गड्ड्यापासून ५ ते ६% तेल मिळते. ओलीओरिझीन निर्मिती  हळदीच्या भुकटीपासून ओलेओरीझीन काढण्याची पद्धत म्हैसूरच्या केंद्रीय अन्नतंत्र संशोधन संस्थेने (CFTRI) प्रमाणित केली आहे. रंग व स्वादाकरिता त्याचा उपयोग औषधे व खाद्य पदार्थांमध्ये करतात, म्हणून त्याला चांगली मागणी आहे. याचे शेकडा प्रमाण ५ ते ७% असून, त्यातील व्होलाटाईल तेलाचे प्रमाण १८ ते २०% आहे. संपर्क- कृष्णा काळे, ८८०५९६८५३६ (अन्नप्रक्रिया अभियांत्रिकी विभाग, सॅम हिग्गीनबॉटम कृषी प्रौद्योगिकी व विज्ञान विश्व विद्यालय प्रयागराज, उत्तर प्रदेश.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com