agriculture news in marathi value added products of turmeric | Page 2 ||| Agrowon

हळदीपासून मूल्यवर्धित पदार्थ उद्योगाच्या संधी

कृष्णा काळे
शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020

बहुतांश भारतीय भाज्यांमध्ये हळदीचा कमी अधिक वापर केला जातो. हळदीचा नैसर्गिक रंग अन्न, औषधी व सौदर्य प्रसाधन उद्योगात वापरतात. प्राचीन काळापासून भारतात हळदीचा आयुर्वेदात वापर केला जातो.  

बहुतांश भारतीय भाज्यांमध्ये हळदीचा कमी अधिक वापर केला जातो. हळदीचा नैसर्गिक रंग अन्न, औषधी व सौदर्य प्रसाधन उद्योगात वापरतात. प्राचीन काळापासून भारतात हळदीचा आयुर्वेदात वापर केला जातो. आहारामध्ये कडू व तुरट रसाची गरज हळदीतून भरून निघते.

भारत हा जगातील हळद पिकविणारा एक प्रमुख देश आहे. हळद हे एक मसाल्याच्या पिकातील प्रमुख नगदी पीक म्हणून प्रचलीत आहे. प्रतिवर्षी २५ लाख टन मसाले पिकांचे उत्पादन भारतात होते. महाराष्ट्रातही मसालेवर्गीय पिकांच्या लागवडीखालील क्षेत्रात लक्षणीय वाढ होत आहे. जगातील एकूण उत्पादनापैकी ७६ टक्के हळद भारतात होते.  महाराष्ट्रात हळद लागवड प्रामुख्याने सातारा, सांगली, कोल्हापूर, परभणी, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली, चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यात हळदीच्या क्षेत्रात कमालीची वाढ झाली आहे.

मसाल्याचा एक आवश्यक पदार्थ म्हणून हळदीला जगभर मागणी आहे. हळदीमुळे खाद्य पदार्थांना आकर्षक सोनेरी पिवळा रंग व कस्तुरी सारखा स्वाद येतो. बहुतांश भारतीय भाज्यांमध्ये हळदीचा कमी अधिक वापर केला जातो. हळदीचा नैसर्गिक रंग अन्न, औषधी व सौदर्य प्रसाधन उद्योगात वापरतात. प्राचीन काळापासून भारतात हळदीचा आयुर्वेदात वापर केला जातो. आहारामध्ये कडू व तुरट रसाची गरज हळदीतून भरून निघते. हळदीमधील अनेक औषधी गुणधर्म सातत्याने पुढे येत आहे.

  • अन्न पचनासाठी पित्तशामक व रक्तशुद्धी करणारी औषधी आहे.
  • जखमेवरील उपचारामध्ये हळदीचा पारंपरिकरीत्या उपयोग केला जातो.
  • -हळद मूळव्याध, मधुमेह, कॅन्सर या विकारावरही उत्तम औषध आहे.

हळदीपासून बनवलेले मूल्यवर्धित पदार्थ :
हळकुंडापासून हळद पावडर तयार करण्याची प्रक्रिया बहुतांश शेतकऱ्यांना माहिती आहे.

कुरकुमीन 
वाळलेल्या हळद पावडरपासून इथाईल अल्कोहोल हे द्रावक वापरून कुरकुमीन नावाचा घटक वेगळा काढता येतो. हळदीमध्ये कुरकुमीनचे प्रमाण जातीपरत्वे २ ते ६% इतके असते. कुरकुमीनचा वापर अनेक आयुर्वेदिक औषधे व सौंदर्य प्रसाधनांमध्ये केला जातो. वाळलेल्या हळदीचा पिवळेपणा कुरकुमीन या घटकामुळे असतो. अधिक कुरकुमीन असलेल्या हळदीस बाजारात चांगला बाजारभाव मिळतो. कुरकुमीनसाठी (४.५%) सेलम ही जात देखील उत्तम आहे.

कुंकू
हळदीचे गड्डे मुख्यत: कुंकू तयार करण्यासाठी वापरतात. त्यामध्ये टॅपिओका किंवा पांढऱ्या चिकणमातीचे खडे मिसळतात आणि त्यावर सल्फ्युरिक ॲसिड व बोरिक ॲसिडची प्रक्रिया करतात. हे मिश्रण वाळवून दळून काढले जाते. अशाप्रकारे हळदीपासून कुंकू तयार करण्याचे कारखाने अमरावती, पंढरपूर, तुळजापूर, पुणे, नाशिक येथे ठिकठिकाणी देवालयाच्या परिसरात आहेत.

रंगनिर्मिती 
लोकरी, रेशमी, सुती कपड्याला पिवळा रंग देण्यासाठी हळदीचा उपयोग करतात. सध्या काही प्रमाणात सुती कपड्यांना हळदीचा रंग देतात. औषधे, कन्फेक्शनरी उद्योगात हळदीचा रंगासाठी उपयोग होतो. वॉर्निश उद्योगातही हळदीचा उपयोग होतो.

सुगंधी तेल 
हळदीचे तेल नारंगी पिवळ्या रंगाचे व हळदीसारखा सुवास असणारे असते. हळदीच्या ताज्या गड्ड्यापासून ५ ते ६% तेल मिळते.

ओलीओरिझीन निर्मिती 
हळदीच्या भुकटीपासून ओलेओरीझीन काढण्याची पद्धत म्हैसूरच्या केंद्रीय अन्नतंत्र संशोधन संस्थेने (CFTRI) प्रमाणित केली आहे. रंग व स्वादाकरिता त्याचा उपयोग औषधे व खाद्य पदार्थांमध्ये करतात, म्हणून त्याला चांगली मागणी आहे. याचे शेकडा प्रमाण ५ ते ७% असून, त्यातील व्होलाटाईल तेलाचे प्रमाण १८ ते २०% आहे.

संपर्क- कृष्णा काळे, ८८०५९६८५३६
(अन्नप्रक्रिया अभियांत्रिकी विभाग, सॅम हिग्गीनबॉटम कृषी प्रौद्योगिकी व विज्ञान विश्व विद्यालय प्रयागराज, उत्तर प्रदेश.)


इतर कृषी प्रक्रिया
अळिंबीचे पौष्टिक, औषधी गुणधर्म अन्...लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनी अळिंबी (मशरूम)...
पपईपासून बनवा मूल्यवर्धित पदार्थपपई ही आरोग्यास पोषक असून, त्यापासून जाम, जेली,...
आवळा प्रक्रिया उद्योगातील संधीआवळा फळांमध्ये असणारे औषधी गुणधर्म व भरपूर...
गुलाबापासून गुलकंद, जॅम,जेलीगुलाबाच्या पाकळ्यापासून गुलकंद, जॅम, जेली इत्यादी...
फळे, भाजीपाल्याचे पूर्व शीतकरणपूर्व-शीतकरणाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे पीक...
मसाल्यातील भेसळ ओळखण्याच्या पद्धती बाजारामध्ये उपलब्ध असलेल्‍या अनेक मसाल्यांमध्ये...
संत्र्याचे काढणीपश्‍चात तंत्रज्ञानसंत्रावर्गीय फळांचा आकर्षक रंग,स्वाद, चव टिकून...
ऑलिव्ह तेलापासून बनवले वनस्पतिजन्य मांसप्राणीज मांसाचा वापर केलेल्या अनेक पदार्थातून...
सोयाबीनचे मूल्यवर्धित पदार्थसोयाबीनपासून सोया-दूध, सोया पनीर, पीठ आणि...
उद्योजकतेमध्ये कुटुंब, समाजाचा हिस्साउद्योग म्हणजे जोखीम. त्याच्याच यश व अपयश या दोन...
बटाट्यापासून वेफर्स, पावडर, फ्रेंच...मानवी आहारामध्ये बटाट्याचा वापर मोठ्या प्रमाणावर...
सब्जा बियांचे आरोग्यदायी फायदे सब्जामध्ये प्रथिने तसेच आरोग्याच्या दृष्टीने...
लघु उद्योग आजारी का पडतात?लघुउद्योगांना दीर्घकाळ नफ्यात चालण्यासाठी अनेक...
भाजीपाल्यावरील प्राथमिक प्रक्रियासौर ऊर्जेवरील ड्रायर, इलेक्ट्रिक ड्रायरच्या...
बीटपासून बनवा पराठा, पावडर, सूपबीट ही भाजी तशी फार लोकांना आवडत नाही. मात्र,...
ग्रामीण सेवा क्षेत्रातील उद्योगांचा...ग्रामीण भागामध्ये सेवा उद्योगाच्या विस्ताराला...
सीताफळापासून बनवा आइस्क्रीम, रबडी,...सीताफळाचा गर वेगळा काढून केलेले पदार्थ आवडीने...
बहुगुणी आवळ्याचे मूल्यवर्धित पदार्थआवळा हे तुरट व आंबट चवीचे हिवाळ्यात येणारे...
उत्पादन क्षेत्रातील ग्रामीण उद्योगांचे...ग्रामीण भागातील निर्मिती करणाऱ्या एका छोट्या...
छोट्या उपायांद्वारे टाळता येईल अन्न...मागील भागामध्ये कृषी उत्पादनाच्या व वाहतुकीच्या...