हळदीच्या मुल्यसाखळीचा अभ्यास करावा ः जंगम

हिंगोली ः ‘‘शेतकऱ्यांनी हळद पिकाच्या मुल्यसाखळीचा अभ्यास करावा. शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांनी हळद प्रक्रिया उद्योगासाठी व्यवसाय आराखडा तयार करावा,``असे प्रतिपादन नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक पी. ए. जंगम यांनी केले.
The value chain of turmeric should be studied: Jangam
The value chain of turmeric should be studied: Jangam

हिंगोली ः ‘‘शेतकऱ्यांनी हळद पिकाच्या मुल्यसाखळीचा अभ्यास करावा. शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांनी हळद प्रक्रिया उद्योगासाठी व्यवसाय आराखडा तयार करावा. आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत त्यासाठी विशेष प्राधान्य आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यांनी सभासद संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत,’’ असे प्रतिपादन नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक पी. ए. जंगम यांनी केले.

तोंडापूर (ता. कळमनुरी) येथील कृषी विज्ञान केंद्र आणि शिवार शेतकरी उत्पादक कंपनी, रिलायन्स फाउंडेशनतर्फे सोमवारी (ता.१०) ‘हळद लागवड तंत्रज्ञान’ यावर ऑनलाइन कार्यशाळा झाली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय लोखंडे,एमसीडीसीचेचे कृषी व्यवस्थापक व विपणन तज्ज्ञ गणेश जगदाळे, रिलायन्स फाउंडेशनचे दीपक केकान, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. पी.पी. शेळके, शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष शिवाजी निळकंठे, कृषीविद्या विशेषज्ञ राजेश भालेराव, उद्यानविद्या विशेषज्ञ अनिल ओळंबे, पीकसंरक्षक तज्ज्ञ अजयकुमार सुगावे आदी उपस्थित होते.

लोखंडे म्हणाले, ‘‘एक जिल्हा एक उत्पादन योजनेअंतर्गत जिल्ह्यात हळद प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे.’’  केकान म्हणाले, ‘‘शेतकरी उत्पादक कंपन्या सक्षम करण्यासाठी त्यांना निरंतर मार्गदर्शनाची गरज आहे.’’ डॉ. शेळके म्हणाले, ‘‘हळदीचे अधिक उत्पादन घेण्यासाठी माती परिक्षण, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, कीड, रोग व्यवस्थापन, ठिबक सिंचन या  बाबींचा अंगीकार शेतकऱ्यांनी करावा.’’ 

ओळंबे म्हणाले, ‘‘हळद उत्पादन वाढीसाठी जमिनीची निवड, बेणे निवड, बेणे प्रक्रिया हे घटक महत्त्वाचे आहेत.’’

जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक शशिकांत सावंत, जिल्हा उपनिबंधक  (सहकारी  संस्था) एस. एस. बोरडे, अमोल पाचडे, कृषी विज्ञान केंद्राचे सुनील पतंगे, शुभांगी अंभोरे, प्रल्हाद चव्हाण, शिवाजी अंभोरे, संपत पतंगे, शरद पतंगे, देवराव करे आदीसह सोडेगाव, वारंगा, हरवाडी, रेणापूर, नांदापूर, सालेगाव, टाकळगव्हाण गावातील शेतकरी सहभागी झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com