Agriculture news in marathi In Valwa taluka One doctor and 16 thousand animals? | Agrowon

१ डॉक्‍टर अन्‌ १६ हजार जनावरे !

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

जनावरांना खासगी डॉक्‍टरांकडून उपचार घ्यावे लागतात. शासकीय व खासगी उपचारांमध्ये मोठी तफावत आहे. याचा विचार करून रिक्त पदे भरावी, अथवा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना तत्काळ सेवा देण्याचे आदेश द्यावे. 
- पंडित विलास पाटील, शेतकरी, नेर्ले 

राज्य शासनाच्या पशुवैद्यकीय दवाखान्यातच उपचार जास्त प्रमाणात केले जातात. दूध संघ व इतर खासगी डॉक्‍टर गोठ्यात जाऊन उपचार देत असल्यामुळे शेतकऱ्यांचा त्यांच्याकडे जास्त कल आहे. 
- डॉ. नितीन कदम, तालुका सहायक आयुक्त, लघू पशुचिकित्सालय, इस्लामपूर

इस्लामपूर, जि. सांगली : वाळवा तालुक्‍यात राज्य शासनाच्या पशुवैद्यकीय सेवेचा बोजवारा उडला आहे. २०१४ च्या पशुगणनेनुसार १ लाख ६० हजार जनावरांचा भार केवळ १६ डॉक्‍टरांवर आहे. त्यामुळे प्रति डॉक्‍टर १६ हजार जनावरे वाटणीला येत असल्याने पशुवैद्यकीय डॉक्‍टरांचीही दमछाक होत आहे. काही कामानिमित्त किंवा वैयक्‍तिक अडचणीमुळे आठवड्यातून काहीवेळा डॉक्‍टर गैरहजर असतात. या वेळी उरलेल्या लोकांवर अतिरिक्‍त ताण पडतो. शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन पशुधन सुधारणा, वाढ व योग्य निदानासाठी रिक्त पदे भरावी, अशी मागणी होत आहे.

वाळवा तालुक्‍यात पशुधन वाचवण्यासाठी राज्य शासन व जिल्हा परिषदेतर्फे नियोजन राबवण्यात येते. यात राज्य शासनातर्फे तालुक्‍यातील १६ पशुवैद्यकीय दवाखान्यांत; तर पंचायत समितीमार्फत ८ गावांमध्ये पशुवैद्यकीय सुविधा उपलब्ध होती. तालुक्‍यात सध्या राज्य शासनाच्या फक्त ८ केंद्रांत पशुवैद्यकीय डॉक्‍टर उपलब्ध असून, बाकीच्या केंद्रांत पशुधन पर्यवेक्षक ही आठ पदे रिक्त आहेत. पंचायत समितीच्या ८ केंद्रांत ३ पशुधन विकास अधिकाऱ्याची पदे रिक्त आहेत. त्यांचे काम त्या ठिकाणचे पशुधन पर्यवेक्षक पाहतात. 

या डॉक्‍टरांवर कामाचा ताण येत असल्याने आवश्‍यक वेळी हे शासनाचे डॉक्‍टर उपलब्ध होऊ शकत नाहीत. यामध्ये सर्वसामान्य शेतकरी व पशुपालक भरडला जात आहे. उपचारासाठी शासकीय पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध न झाल्याने त्यांना खासगी डॉक्‍टरांचा आधार घ्यावा लागतो. काही ठिकाणी दोन वर्षे, काही ठिकाणी पाच वर्षे झाली; तरी शासकीय केंद्रात डॉक्‍टर उपलब्ध नाहीत. 

या बाबीकडे कोणीही गांभीर्याने पाहताना दिसत नाही. काही वेळेस जनावरांच्या गंभीर रोगाचे निदानच लागत नाही. यात शेतकऱ्याची आर्थिक लुबाडणूकही होते व पशूधनही हातचे निघून जाते. यावर हमखास व खात्रीशीर इलाज मिळण्यासाठी तालुक्‍यात रिक्त पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे तत्काळ भरावी, अशी मागणी होत आहे. 
 


इतर ताज्या घडामोडी
कृषी विधेयकांस विरोधासाठी इंडिया...नवी दिल्ली : बहुचर्चित कृषी विधेयकांवर राष्ट्रपती...
निकोप स्पर्धेसाठी मोदी सरकारचा प्रयत्नशेती उत्पादन व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन आणि...
नगरमधील ३५ हजार शेतकरी विमा भरपाईपासून...नगर  ः जिल्ह्यात गेल्यावर्षी परतीच्या...
पुण्यात भाजीपाल्याची आवक घटली; दरात वाढपुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
रत्नागिरी जिल्ह्यात हळव्या भात कापणीत...रत्नागिरी  : हळवे भात पीक कापणी योग्य झाले...
औरंगाबादमध्ये थेट शेतीमाल विक्रीची ...औरंगाबाद  : औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागात...
नांदेडमधील पीक नुकसानीची...नांदेड : नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून...
हिंगोली, परभणीतील पीक नुकसानीचे तत्काळ...हिंगोली  ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
पूरस्थितीचा गडचिरोली जिल्ह्यातील २०...गडचिरोली : जिल्ह्यात गोसेखुर्द धरणातून पाणी...
निर्यातीसाठी दर्जेदार हळद उत्पादन घ्याहिंगोली: हिंगोली जिल्ह्यात हळदीच्या क्षेत्रात...
लातूर, नांदेडमध्ये दमदार पाऊसपुणे ः राज्यातील अनेक भागांत पावसाचे वातावरण...
मराठवाड्यात सरासरीपेक्षा जास्त...मराठवाड्यातील बहुतांश क्षेत्र कोरडवाहू असून...
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
लातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...
औरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे :  नियमित कर्ज फेडणाऱ्या...
मूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर  : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...
खानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव  ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...
वाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम  : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...
खानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव  ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...