वारणाकाठी गंभीर पूरस्थिती; शिराळा तालुक्यातील काही गावात पुराचे पाणी

मांगले ता. शिराळा येथे वस्तीकडे जाणारे रस्ते पाण्याखाली गेल्याने जनावरांच्यासाठी चारा घालण्यासाठी व धारा काढण्यासाठी लोक बोटीतून असे जात आहेत.
मांगले ता. शिराळा येथे वस्तीकडे जाणारे रस्ते पाण्याखाली गेल्याने जनावरांच्यासाठी चारा घालण्यासाठी व धारा काढण्यासाठी लोक बोटीतून असे जात आहेत.

शिराळा, जि. सांगली : वारणा काठी गंभीर पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने पुराच्या धास्तीने बाधित गावांनी रात्र जागून काढली असून खंडित विद्युत पुरवठ्यामुळे मोबाईल चार्जिंग नसल्याने नातेवाईकांच्या संपर्का अभावी सर्वांची घालमेल सुरू आहे. त्यामुळे वारणा काठी पुराची तर पठारावर वाऱ्याची धास्ती आहे. शिराळा तालुक्यातील सोनवडे,आरळा, काळुंद्रे,चरण,मोहरे,पुनवत,सागाव,मांगले,देववाडी , कोकरूड या दहा गावात पुराचे पाणी शिरले आहे. पणुंब्रे उपकेंद्र अंतर्गत खुंदलापुर, मणदूर धनगरवाडा, मणदुर,  मिरुखेवाडी,विनोबा ग्राम, जाधववाडी, बेरडेवाडी, खोतवाडी भास्टेवाडी, सोनवडे, काळोखेवाडी,आरळा, चांदोलीवडी,सिद्धार्थ नगर,इनामवाडी, करुंगली,मराठेवाडी, काळुंद्रे, पणुंब्रेवारूण, कुसळेवाडी, किनरेवाडी, ,बोरगेवाडी वाकाईवाडी,ढाणकेवाडी ,खराळे ,चिंचेवाडी  चरण,गुढे,पाचगणी ,मानेवाडी,बांबरवाडी,येसलेवाडी,भाडूगळेवाडी या परिसरात गेले तीन दिवस विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.त्यामुळे गावे अंधारात आहेत. मोबाईल चार्जिंग नसल्याने संपर्क यंत्रणा कोलमडली आहे. त्यामुळे वारणा काठी पुराची व पाठरावरील वाऱ्याची माहिती मिळत नाही. तुम्हाला तरी गावाकडच कळल का? शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील बहुतांशी लोक उदरनिर्वाहासाठी मुंबईला आहेत. तर अनेकजण इतरत्र बाहेर गावी आहेत. आराळा, सोनवडे, इनामवाडी, काळुंद्रे, चरण, मोहरे या गावात पुराचे पाणी घुसले आहे. खंडित विद्युत पुरावठ्यामुळे मोबाईल चार्ज नाही.त्यामुळे संपर्क होत नाही.प्रत्येकजण आपल्या जवळच्या नातेवाईक यांना संपर्क करून गावाकडच तुम्हाला तरी काय कळलं का म्हणून नेहमी विचारणा करत आहेत. त्यामुळे संपर्का अभावी सर्वांचा जीव टांगणीला लागला आहे.

गाडीत चार्जिंग वरील गावात  आपत्ती व्यवस्थापनचे कर्मचारी व अधिकारी विद्युत पुरवठा खंडित आल्याने चार चाकी वाहन सुरू करून मोबाईल चार्जिंग करत करून प्रशासनाशी संपर्क साधता आहेत. शेडगेवाडी ते चांदोली मार्ग बंद असल्याने गाड्यांसाठी डिझेल टंचाई भासत आहे.

चांदोलीला एकच मार्ग शिराळा-चांदोली हा तालुक्यातील एकच मोठा मार्ग आहे.मार्गावर चरण,आरळा, सोनवडे येथे पाणी आल्याने हा मार्ग बंद आहे.चांदोली येथे धरण आल्याने त्या ठिकाणी शासकीय यंत्रणेला ये-जा करणे महत्वाचे आहे. त्यामुळे त्या ठिकाणी जाण्यासाठी शिराळा,वाकुर्डे,येळापूर,मेणी, गुढे पाचगणी,येसलेवाडी,आरळा व तिथून वारणा कालव्याच्या रस्त्यावरून चांदोलीला जाण्याचा एकमेव मार्ग आहे.

तिथे पुराची नाही; वाऱ्याची धास्ती शिराळा पश्चिम भागातील खुंदलापूर ते पाचगणी या पठारावरील लोकांना उंचावर आल्याने  पुराची पण वाऱ्याची धास्ती लागली आहे.संततधार पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी घरांची पडझड सुरू आहे. पठारावर वाहणारा सोसाट्याचा वारा यामुळे  कौलारू घर कधी दगा देईल याचा नेम नाही. त्यामुळे वाऱ्याच्या धास्तीने रात्र वैऱ्याची म्हणून रोज दिवस ढकलावे लागत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com