Agriculture news in Marathi Vardha district in 1500 farmers depression | Page 2 ||| Agrowon

वर्धा जिल्ह्यात १५०० शेतकरी कुटुंबप्रमुख तणावात

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 21 मे 2020

वर्धा ः बेभरवश्‍याच्या शेती व्यवसायाने अनेकांची चिंता वाढीस लागली आहे. खर्च, उत्पन्नाचा ताळेबंद जुळत नसल्याने अनेक शेतकरी कुटुंबीय कर्जबाजारी झाले आहेत. अशा परिस्थितीत कुटुंब प्रमुख तणावात जीवन जगत असून वर्धा जिल्ह्यात असे १ हजार ५१० कुटुंब प्रमुख असल्याचे वास्तव समोर आले आहे.

वर्धा ः बेभरवश्‍याच्या शेती व्यवसायाने अनेकांची चिंता वाढीस लागली आहे. खर्च, उत्पन्नाचा ताळेबंद जुळत नसल्याने अनेक शेतकरी कुटुंबीय कर्जबाजारी झाले आहेत. अशा परिस्थितीत कुटुंब प्रमुख तणावात जीवन जगत असून वर्धा जिल्ह्यात असे १ हजार ५१० कुटुंब प्रमुख असल्याचे वास्तव समोर आले आहे. 

प्रेरणा प्रकल्पाच्या माध्यमातून वर्धा जिल्ह्याच्या आठ तालुक्‍यांतील १ हजार ३५ आशा वर्करव्दारे शेतकरी कुटुंबाचे सर्व्हेक्षण करण्यात आले. तब्बल २ लाख ५ हजार कुटुंबीयांचा सर्व्हे या माध्यमातून करण्यात आला. त्यामध्ये दोन लाख २३ हजार ३६७ शेतकरी कुटुंबीयांकडून माहिती घेण्यात आली.

वर्धा तालुक्‍यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत या कुटुंब प्रमुखांचा शोध घेण्यासाठी आशा वर्करच्या माध्यमातून ७३ हजार ४११ कुटुंबीयांची भेट घेण्यात आली. ५३ हजार २५४ शेतकरी कुटुंबांचा यात समावेश आहे. यापैकी १६५ कुटुंब प्रमुख तणावात जीव जगत आहेत. ३४ सौम्य आणि १३१ तीव्र स्वरूपातील तणावात आहेत.

सेलू तालुक्‍यातील २९ हजार ५३७ कुटुंबीयांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. यामध्ये २४६ शेतकरी तणावात असल्याचे आढळून आले आहे. समुद्रपूर तालुक्‍यातील २९ हजार ३९९ कुटुंबापैकी ४३, कारंजा तालुक्‍यातील १८ हजार ९४८ पैकी ५४८, देवळी तालुक्‍यातील २६ हजार ६०८ पैकी ३३५, आर्वी तालुक्‍यातील २५ हजार ९७३ पैकी १२४, आष्टी तालुक्‍यातील १२ हजार ४२५ पैकी ३४ आणि हिंगणघाट तालुक्‍यातील २७ हजार २२३ पैकी १५ शेतकरी तणावात असल्याचे आढळून आले आहे.

शेतकऱ्यांमधील नैराश्‍याची कारणे 

 • हवामान बदलामुळे पाऊसमान अनिश्चित.
 • अनिश्चित हवामानामुळे कोरडवाहू पीक पद्धतीत उत्पादन बेभरवशाचे.
 • उत्पादकतेअभावी उत्पन्न व खर्चाचा ताळेबंद जुळत नाही.
 • खते, बियाणे, मजुरीसोबत शेतीमाल बाजारपेठेत आणण्यावर मोठा खर्च.
 • उत्पादकता खर्च वाढत असतानाच शेतीमालाला अपेक्षित दर न मिळणे.
 • हमीभाव किंवा अपेक्षित दराअभावी कर्जाची परतफेड अशक्‍य.
 • कुटुंबाच्या गरजांसाठी लागणाऱ्या पैशाची चणचण.
 • शेती व्यवस्थापनासाठी घेतलेल्या कर्जाचा बोजा.
 • शेतीमालाचा भाव ठरविण्याचा अधिकार नसल्याने व्यापाऱ्याने मागणी केलेल्या दरात नाइलाजास्तव विक्री.
 • सिंचन सुविधांअभावी एकाच पिकावर राहवे लागते अवलंबून.
   

वडिलोपार्जित शेतीचे तुकडे होत गेले. दोन ते चार एकर जमीन असलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या वाढली. या जमिनीतील उत्पादकता आणि उत्पन्नातून कुटुंबीयांच्या गरजा भागत नसल्याने कर्ज काढण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय नसतो. पुढे या कर्जाची परतफेड शक्‍य होत नाही आणि त्यातूनच तणाव वाढतो. हे थांबवायचे असेल तर ‘फार्म टू प्लेट’ अशी संकल्पना राबवावी लागेल. गावात प्रक्रिया उद्योगांची उभारणी झाल्यास त्यातून देखील गाव स्वावलंबी होत तणावाचे मळभ दूर करता येणार आहेत.
- डॉ. शरद निंबाळकर, माजी कुलगूरू,
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

महात्मा गांधी याचे वास्तव्य
खेड्याकडे चला असा नारा देणाऱ्या महात्मा गांधी यांनी जीवनातील काही काळ वर्धा जिल्ह्यात घालविला. स्वावलंबी खेड्यांचा आदर्श त्यांनी घालून दिला होता. त्याच बापूंच्या जिल्ह्यात शेतकरी तणावात आहेत.

 


इतर अॅग्रो विशेष
विदर्भात टोळधाडीची दहशत कायम;...नागपूर ः अमरावती जिल्ह्यातील पुसला गावातून...
राजस्थानातील चुरूत ५० अंशांवर तापमान;...पुणे  : सूर्य अक्षरश: आग ओकत असल्याने...
मॉन्सून ४८ तासांमध्ये दक्षिण अरबी...पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
एसटीव्दारे शेतीमाल वाहतूक सुरु...पुणे  ः ‘कोरोना’मुळे महाराष्ट्र राज्य परिवहन...
तंत्रज्ञान आत्मसात करीत प्रयोगशील शेतीत...अकोला जिल्ह्यातील आस्टुल येथील संतोष घुगे यांनी...
मॉन्सूनची अंदमानात चाल;...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बुधवारी...
कापूस उत्पादनात २४ लाख गाठींनी घट शक्यजळगाव ः देशात कापसाच्या उत्पादनात सुमारे २४ लाख...
टोळधाडीकडून भाजीपाल्याचे सर्वाधिक...नागपूर : राजस्थान, मध्यप्रदेशनंतर टोळधाडीचा...
उन्हाच्या झळांनी काहीली वाढली पुणे : सुर्य चांगलाच तळपत असल्याने...
केळी ‘रायपनिंग चेंबर’ व्यवसाय झाला पूरक...सातारा जिल्ह्यातील अनवडी (ता. वाई) येथील प्रवीण...
अंदमानात उद्या मॉन्सूनची प्रगती शक्य पुणे: बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘अम्फान’...
राज्यात कापूस बियाणे विक्रीला प्रारंभ अकोला ः आगामी हंगामासाठी कापूस बियाणे...
मध्यम धाग्याच्या कापूस खरेदीची ...नागपूर ः एफएक्‍यु ग्रेडमधीलच तिसऱ्या दर्जाच्या...
मराठवाडा पाणी परिषदेचे शनिवारी ऑनलाइन...औरंगाबाद: लॉकडाउनमुळे मराठवाडा पाणी परिषदेची...
'ग्रामपंचायतीचा अखर्चित निधी शासनाला...अकोला ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरु...
टोळधाडीचा अमरावती, वर्ध्यात शिरकावअमरावती ः लॉकडाउनमुळे आधीच अडचणीत असलेल्या...
सव्वा एकरांत सेंद्रिय भाज्यांचा `जगदाळे...कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडी (ता.शिरोळ) येथील...
टोळधाडीचा आठ राज्यांमध्ये धुडगूसपुणेः देशात एरव्ही जून आणि जुलैमध्ये येणाऱ्या...