वऱ्हाडात विद्यमान खासदारांनाच पुन्हा संधी

वऱ्हाडात विद्यमान खासदारांनाच पुन्हा संधी
वऱ्हाडात विद्यमान खासदारांनाच पुन्हा संधी

अकोला ः लोकसभा निवडणुकीच्या निकालात गुरुवारी (ता.२३) वऱ्हाडातील तीनही जिल्ह्यात भाजप-शिवसेना युतीचे विद्यमान खासदार विजयी झाले. अकोल्यात संजय धोत्रे(भाजप), बुलडाण्यामध्ये प्रतापराव जाधव (शिवसेना) आणि वाशीम-यवतमाळ मतदार संघात भावना गवळी (शिवसेना)विजयी झाल्या. विशेष म्हणजे तिनही खासदारांनी लाखावर मताधिक्य मिळवीत हे विजय साकारले.  भावना गवळी पाचव्यांदा लोकसभेत   वाशीम  :  वाशीम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या भावना गवळी यांनी सलग पाचवा विजय मिळवला. कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना त्यांनी धोबीपछाड दिली. ही लोकसभा निवडणूक या मतदारसंघात शिवसेना व काँग्रेस या दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेची केली होती. सुरवातीपासून मतदारांच्या मनात नेमके काय दडले आहे याचा अंदाज घेताना राजकीय विश्‍लेषकांची दमछाक झाली. विजयाचा गुलाल कोण उधळणार याची मतदानापासून उत्सुकता लागलेली होती. गुरुवारी मतमोजणीला सुरवात झाल्यापासून शिवसेना उमेदवार सातत्याने आघाडीवर राहिल्या. रात्री उशिरा ही मतमोजणी संपली. मोजणी अखेर भावना गवळी यांना पाच लाख ४२ हजार ९८ मते मिळाल्याचे जाहीर करीत विजयाचे प्रमाणपत्र देण्यात आले. तर माणिकराव ठाकरे यांना चार लाख २४ हजार १५९ मते मिळाली. दोन्ही उमेदवारांमध्ये तब्बल एक लाख १७ हजार ९३९ मतांचा फरक होता. गवळी यांना हे मताधिक्य पाचव्यांदा लोकसभेत घेऊन गेले. संजय धोत्रे यांचा चौकार अकोला ः या लोकसभा मतदारसंघात अपेक्षित असलेला निकाल गुरुवारी आला. सुरवातीपासून येथे धोत्रे यांच्या विजयाची खात्री व्यक्त केली जात होती. जातीय समिकरणे, त्यांच्या विरोधात उभे असलेले उमेदवार यामुळे विजय निश्चित मानला जात होता. उत्सुकता होती ती केवळ किती मताधिक्य संजय धोत्रे मिळवतात याची. गुरुवारी झालेल्या मतमोजणीत अखेर धोत्रे यांना पाच लाख ५४ हजार ४४४ मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी कॉंग्रेसचे हिदायत पटेल यांना दोन लाख ५४ हजार ३७०, बहुजन वंचित आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांना दोन लाख ७८ हजार ८४८ मते मिळाली. धोत्रे यांनी सुमारे पावणे तीन लाख मतांनी विजय मिळवला.  प्रतापराव जाधवांची बुलडाण्यात हॅटट्रिक बुलडाणा : बुलडाणा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेना पक्षाचे उमेदवार प्रतापराव जाधव यांनी ५,२१,९७७ मते मिळवून एकहाती विजय संपादन केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांना ३,८८,६९० मते प्राप्त झाली. प्रतापराव जाधव यांना त्यांच्यापेक्षा १ लाख ३३ हजार २८७ अधिक मते मिळाल्याने विजयी घोषित करण्यात आले.   ही निवडणूक १८ एप्रिलला पार पडली. त्यात जिल्ह्यातील  १७ लाख ५८ हजार ९४३ मतदारांपैकी ११ लाख १७  हजार ४८६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. या मतदारसंघात सुरवातीपासून विविध तर्कवितर्क लावले जात होते. विजयाबाबत दावे-प्रतिदावे करण्यात आल्याने निकालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. अखेरीस प्रतापराव जाधव यांनी पुन्हा एकदा विजयावर शिक्कामोर्तब केले. सलग तिसऱ्यांदा ते लोकसभेत पोचले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com