agriculture news in Marathi variation in cold in state Maharashtra | Agrowon

थंडीत चढ-उतार

टीम अॅग्रोवन
बुधवार, 15 जानेवारी 2020

पुणे ः राज्यातील अनेक भागात थंडी किंचित कमी झाली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात चढ-उतार असून विदर्भातील काही भागात थंडी आहे. अनेक भागात काही प्रमाणात थंडी गायब झाली आहे. आज (ता. १५) राज्यातील काही भागात थंडी कमी अधिक स्वरूपात राहणार आहे. मंगळवारी (ता. १४) सकाळी विदर्भातील येथील नागपूर येथे सर्वात कमी ९.४ अंश सेल्सिअसची सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.  

पुणे ः राज्यातील अनेक भागात थंडी किंचित कमी झाली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात चढ-उतार असून विदर्भातील काही भागात थंडी आहे. अनेक भागात काही प्रमाणात थंडी गायब झाली आहे. आज (ता. १५) राज्यातील काही भागात थंडी कमी अधिक स्वरूपात राहणार आहे. मंगळवारी (ता. १४) सकाळी विदर्भातील येथील नागपूर येथे सर्वात कमी ९.४ अंश सेल्सिअसची सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.  

उत्तरेकडून वाहत असलेल्या थंड वाऱ्यांचा प्रवाह कमी होऊ लागला आहे. यामुळे राज्यातील थंडी कमी होऊ लागली आहे. विदर्भात थंडी असली तरी कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही भागात थंडी कमी झाली आहे. खान्देश, मध्य महाराष्ट्रातील काही भाग व मराठवाडा या भागात थंडीत चढउतार आहे. त्यामुळे काही भागात किमान तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत पाच ते सहा अंश सेल्सिअसने वाढला आहे.

विदर्भातील काही भागात किमान तापमान सरासरीच्या तुलनेत तीन ते चार अंश सेल्सिअसने कमी झाला आहे. त्यामुळे थंडी किंचित कमी झाल्याने किमान तापमान नऊ अंश सेल्सिअसपर्यंत होते. गेल्या चार ते पाच दिवसांपूर्वी हा किमान तापमान पाच अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले होते. मात्र, पुन्हा किमान तापमान वाढू लागले आहे.  

राजस्थानच्या परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. त्याचा परिणाम राज्यातील थंडीवर झाला आहे. बहुतांशी भागात हवामान कोरडे असले तरी थंडी कमी झाली आहे. त्यामुळे किमान तापमानात वाढ झाली आहे. कोकणातील मुंबई, सांताक्रुझ अलिबाग, रत्नागिरी, डहाणू या भागातही थंडी कमी झाल्याने किमान तापमान १९ ते २१ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते.

मध्य महाराष्ट्रातही थंडी कमी अधिक स्वरूपात आहे. त्यामुळे निफाड येथे १३.० अंश सेल्सिअस एवढे किमान तापमान होते. तर उर्वरित नाशिक, पुणे, मालेगाव, जळगाव, महाबळेश्वर, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, सांगली या भागातही थंडी कमी झाली आहे. 

मात्र, अधूनमधून या भागात हवामान ढगाळ, तर सकाळी धुके पडत आहे. मराठवाड्यात औरंगाबाद, परभणी, बीड, उस्मानाबाद, नांदेड या जिल्ह्याच्या बहुतांशी भागातही थंडी कमी झाली आहे. 

उस्मानाबाद येथे सर्वात कमी ११.४ अंश सेल्सिअसचे सर्वात कमी किमान तापमान नोंदविले गेले. उर्वरित भागात किमान तापमानाचा पारा १३ ते १४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होता. विदर्भातही गोदिया, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, अमरावती, अकोला या भागात कमीअधिक स्वरूपात थंडी होती. त्यामुळे किमान तापमान ९ ते १६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते.  

मंगळवारी (ता. १४) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांतील विविध ठिकाणचे किमान तापमान, अंश सेल्सिअसमध्ये, कंसात वाढ, घट ः
नगर १२.२, अकोला १३.६ (-१), अलिबाग २०.९ (३), अमरावती १३.० (-२), औरंगाबाद १४.६(२), बीड १६.० (२), बुलढाणा १६.६ (२), चंद्रपूर १२.२(-३), डहाणू १९.३ (२), गोंदिया १०.५ (-३), जळगाव १५.२ (३), कोल्हापूर १८.० (३), महाबळेश्वर १२.९ (-१), मालेगाव १७.२ (६), मुंबई २०.० (३), नागपूर ९.४ (-४), नांदेड १३.५, नाशिक १५.० (५), निफाड १३.०, उस्मानाबाद ११.४ (-३), परभणी १३.२ (-१), लोहगाव १५.८ (४), पाषाण १५.८ (४), पुणे १४.८ (४), रत्नागिरी २१.० (२), सांगली १७.४ (३), सातारा १४.७ (२), सोलापूर १६.६, ठाणे २०.०, वर्धा १२.१ (-१), यवतमाळ १५.०.


इतर अॅग्रो विशेष
व्यवसाय स्वातंत्र्यावर गदा नकोचशेतकरीविरोधी कायदे रद्द करण्याबाबतची एक चळवळ...
क्रयशक्ती वाढविणारा हवा अर्थसंकल्पकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण १ फेब्रुवारी...
कमी फॅटचे दुध पिल्यास म्हतारपण कमी होतं...कमी फॅट(मेद)युक्त दुधाचा आहारामध्ये वापर केल्यास...
विदर्भ, कोकणात आज हलक्या पावसाचा अंदाज पुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांअभावी राज्यात थंडी...
नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष निर्यातीत ५७...नाशिक : राज्यातून होणाऱ्या द्राक्ष निर्यातीत...
दूध उत्पादक महत्त्वाचा दुवा: हरिभाऊ...औरंगाबाद : जिल्हा दूध संघाच्या एकूणच...
अर्जेंटिनाला होणार आंबा निर्यात पुणे : कोकणातील हापूस आणि मराठवाड्यातील केशर...
गावरान अळूची फायदेशीर व्यावसायिक शेतीसुमारे पंधरा गुंठ्यांत देशी गावरान अळूची शेती...
व्यवस्थापनाला मार्केटिंगची जोड देत...पॅालिहाउसमधील फूलशेतीसाठी एकेकाळी प्रसिद्ध असलेले...
‘पोकरा’ प्रकल्पात कृषी यांत्रिकीकरणाचे...अकोला  ः नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
पोपटराव पवार, राहिबाई पोपेरे यांना...नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून शनिवारी (ता. २५)...
कोयना धरणाच्या पोटात होणार आणखी एक धरणकोयनानगर, जि. सातारा ः येथील कोयना धरणाची...
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत केवळ १४...औरंगाबाद : संकटांशी दोन हात करून आपली शेती जिवंत...
खानदेशात रब्बीत अत्यल्प पीक कर्जवाटपजळगाव ः खानदेशात रब्बी हंगामातील पेरण्या जवळपास...
वटवाघळांचा मोर्चा आता द्राक्ष बागांकडेपुणे: वटवाघळांची वस्तीस्थाने आणि अधिवास...
गटाने तयार केला `कोकणरत्न' ब्रॅंडकुर्धे (जि. रत्नागिरी) गावातील श्री नवलाई देवी...
रासायनिक अवशेषमुक्त शेती हेच भवितव्य:...नाशिक : रासायनिक खते व कीटकनाशकांच्या...
विदर्भ, कोकणात उद्यापासून पावसाचा अंदाजपुणे : राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार सुरूच...
कौशल्य, कृषी, उद्योग विभाग देतील...परभणी: पंतप्रधान कौशल्य विकास योजना आणि...
शेतकरीविरोधी कायद्यांबाबत सहा महिन्यांत...पुणे : शेतकरी आत्महत्यांना पूरक ठरणारे कायदे रद्द...