agriculture news in Marathi variation in cold in state Maharashtra | Page 2 ||| Agrowon

थंडीत चढ-उतार सुरुच 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 22 जानेवारी 2021

हिमालय आणि पश्चिम बंगालच्या परिसरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले. यामुळे या भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम राज्यातील वातावरणावर होणार आहे.

पुणे ः हिमालय आणि पश्चिम बंगालच्या परिसरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले. यामुळे या भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम राज्यातील वातावरणावर होणार आहे. सध्या राज्यात हवामान कोरडे असले तरी पुढील काही दिवस राज्यातील थंडीत चढ-उतार होईल. गुरूवारी (ता.२१) सकाळी आठ वाजेपर्यंत निफाड येथे नीचांकी १०.२ अंश सेल्सिअसची सर्वांत किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

मागील तीन ते चार दिवस उत्तर भारतातील काही राज्यात थंडीची लाट आली होती. यामुळे राज्यातील काही भागात थंडी वाढली आहे. मध्य महाराष्ट्रातही किंचित थंडी असून कोकण, मराठवाडा व विदर्भात थंडी कमी झाली आहे. यामुळे किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत जवळपास सहा अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे. सध्या आकाश निरभ्र झाल्याने राज्यातील काही भागात थंडी वाढली आहे. खानदेश व मध्य महाराष्ट्रात किमान तापमानाचा पारा दहा अंश सेल्सिअसपर्यंत 
खाली आला आहे. 

राज्यात पुणे, निफाड, नाशिक, नगर, जळगाव भागात थंडी अधिक आहे. त्यातुलनेत कोकणात किंचित थंडी असून किमान तापमानाचा पारा १८ ते २० अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. मुंबई परिसरात बऱ्यापैकी थंडी असल्याने किमान तापमान १८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. मराठवाड्यातही थंडी कमी झाली आहे. त्यामुळे किमान तापमानात चांगलीच वाढ झाली असून किमान तापमान १६ ते २० अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. विदर्भातील गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ, बुलडाणा, अकोला भागात थंडी आहे. यामुळे किमान तापमान १४ ते १७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. 

गुरूवारी (ता.२१) सकाळपर्यंत विविध शहरातील किमान तापमान, कंसात वाढ, घट झालेले तापमान, अंश सेल्सिअसमध्ये ः 

 • मुंबई (सांताक्रुझ) १८.२ (१) 
 • रत्नागिरी १९.३ (१) 
 • पुणे १३.९ (३) 
 • कोल्हापूर १९.० (४) 
 • महाबळेश्वर १३.४ 
 • मालेगाव १४.६ (४) 
 • नाशिक ११.४ (१) 
 • सांगली १८.४ (४) 
 • सातारा १६.० (४) 
 • सोलापूर १८.४ (२) 
 • औरंगाबाद १५.५ (३) 
 • बीड १७.३ (३) 
 • परभणी १७.५ (३) 
 • नांदेड २०.० (६) 
 • उस्मानाबाद १६.८ (२) 
 • अकोला १५.७ (१) 
 • अमरावती १७.५ (३) 
 • बुलडाणा १५.५ (१) 
 • चंद्रपूर १७.८ (३) 
 • गोंदिया १४.० (१) 
 • नागपूर १६.० (४) 
 • वर्धा १६.७ (३) 
 • यवतमाळ १६.५ (१) 
   

इतर अॅग्रो विशेष
इथेनॉलमुळे ऊस, साखरेला दर मिळेल : शेखर...शिराढोण, जि. उस्मानाबाद ः राज्यात यंदा ११० कोटी...
टेक्स्टाईल पार्ककडे लागले विदर्भातील...नागपूर ः केंद्रीय अर्थसंकल्पात देशात नव्याने सात...
बाजार समित्यांसाठी सौर ऊर्जा धोरण लवकरच पुणे ः नवीन पणन कायदा अद्याप लागू झाला नसला तरी...
चॉकी व्यवसायाला विदर्भात पसंतीनागपूर ः अंडीपुंज ते दुसऱ्या अवस्थेतील मोल्ड...
थंडीत किंचित वाढ पुणे ः गेल्या दोन दिवसांपासून राज्यात आकाश निरभ्र...
कृषिपंपाच्या बिल दुरुस्तीसाठी...नागपूर ः शेतकऱ्यांना चुकीच्या पद्धतीने बोगस...
राज्यात रब्बीच्या क्षेत्रात बारा...नगर : राज्यात यंदा रब्बीचे क्षेत्र सरासरीच्या...
सांगलीत बेदाण्याला उच्चांकी २७१ रुपये दरसांगली ः होळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर बेदाणा...
खानदेशात ज्वारी, गहू आडवा जळगाव ः खानदेशात शुक्रवारी (ता.१९) सलग दुसऱ्या...
शेती मशागतीचा खर्च २५ टक्क्यांनी वाढला सांगली ः गेल्या काही दिवसांपासून डिझेलच्या दरात...
माहितीस टाळाटाळ; ग्रामसेविकेला दंड पारनेर, जि. नगर ः सामाजिक कार्यकर्त्याने...
दोन दशकांपासून आंध्रा धरणग्रस्तांची...पुणे : देशाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याचे...
'अवकाळी'ने राज्यात काही प्रमाणात थंडीत...पुणे ः अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा तयार झाला...
पुन्हा जोडतोय शेतीशीपुणे शहराजवळील पडीक शेत जमिनीवर ‘अर्बन फार्मिंग'...
विषाणूजन्य रोग अन् ‘कीडमुक्त क्षेत्रा’...मागील वर्षी राज्यातील टोमॅटो पट्ट्यात कुकुंबर...
आंदोलनाची तीव्रता कमी होऊ देणार नाही : ...गाझियाबाद, उत्तर प्रदेश : शेतकरी एका पिकाचे...
सिंधुदुर्गात वादळीवाऱ्यांसह  पाऊस; काजू...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्याच्या काही भागात गुरुवारी...
प्रत्येकाच्या हृदयात शिवरायांचे स्थान...पुणे : ‘‘आपल्या प्रत्येकाच्या हृदयात छत्रपती...
राज्यात गारपीट, वादळाने नुकसान वाढले;...पुणे : तीन दिवसांपासून अवकाळी पावसाने राज्यातील...
ओल्या हळदीपासून २४ तासांत पावडरअकोला ः औरंगाबाद येथील सुशील सर्जेराव शेळके...