थंडीत चढ-उतार 

अरबी समुद्राच्या वायव्य भागात चक्रीय वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती मागील पाच ते सहा दिवसांपासून कायम आहे. राज्यातील वातावरणात वेगाने बदल होत असून, थंडीत चांगलेच चढ-उतार होत आहेत.
Hawaman
Hawaman

पुणे ः अरबी समुद्राच्या वायव्य भागात चक्रीय वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती मागील पाच ते सहा दिवसांपासून कायम आहे. राज्यातील वातावरणात वेगाने बदल होत असून, थंडीत चांगलेच चढ-उतार होत आहेत. पुढील पाच ते सहा दिवस थंडी कमीअधिक स्वरूपात राहील. शनिवारी (ता. २७) सकाळी आठ वाजेपर्यंत निफाड येथील गहू संशोधन केंद्राच्या आवारात १०.६ अंश सेल्सिअसची किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

बंगाल उपसागराच्या नैऋत्य भागात आणि श्रीलंकेच्या उत्तर किनारपट्टीजवळ चक्रीय स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर आहे. तसेच अरबी समुद्राच्या परिसरातही समुद्रसपाटीपासून ३.१ आणि ४.५ किलोमीटर उंचीवर चक्रीय वाऱ्याची स्थिती कायम आहे. त्यातच राज्यातील हवेत असलेले बाष्प हे चक्रीवादळाने ओढून घेतल्याने राज्यात कोरडे हवामान झाले आहे. राज्यातील काही भागांत थंडी कायम असली तरी हळूहळू ती कमी होण्यास सुरुवात झाली आहे. त्यासोबत सकाळपासून उन्हाचा चटका काहीसा वाढू लागला आहे. 

राज्यातील काही भागांत उन्हाचा चटका वाढू लागल्याने किमान तापमानाबरोबर कमाल तापमानातही वाढ होऊ लागली आहे. अनेक ठिकाणी किमान तापमानात वाढ झाली असून, किमान तापमानाचा पारा निफाड वगळता १३ अंश सेल्सिअसच्या वर सरकला आहे. मार्च महिना सुरू होत असल्याने विदर्भात काही ठिकाणी किंचित थंडी आहे. अमरावती, बुलडाणा या ठिकाणचा पारा २० अंश सेल्सिअसच्या वर सरकला आहे. मराठवाड्यातही थंडी कमी होऊ लागल्याने किमान तापमानात वाढ होऊ लागली आहे. या भागात किमान तापमान १३ ते १९ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. मध्य महाराष्ट्रातही थंडी कमीअधिक स्वरूपात आहे. कोकणात थंडीचा पारा कमी होऊ लागला असून, किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत तीन अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे किमान तापमान या भागात २० ते २२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे.  शनिवारी (ता.२७) सकाळपर्यंत विविध शहरांतील किमान तापमान, कंसात वाढ, घट झालेले तापमान, अंश सेल्सिअसमध्ये ः 

  • मुंबई (सांताक्रूझ) २०.८ (२) 
  • ठाणे २१.२ 
  • अलिबाग २२.२ (३) 
  • रत्नागिरी २०.२ 
  • डहाणू २०.५ (१) 
  • पुणे १४.६ (१) 
  • नगर १७.५ (३) 
  • जळगाव १४.३ (-१) 
  • कोल्हापूर २१ (३) 
  • महाबळेश्‍वर १६.९ (१) 
  • मालेगाव १७.८ (४) 
  • नाशिक १४.२ (१) 
  • निफाड १०.६ 
  • सांगली १६.२ 
  • सातारा १७.६ (२) 
  • सोलापूर २० (१) 
  • औरंगाबाद १७.२ (१) 
  • बीड १९.३ (३) 
  • परभणी १९.६ (२) 
  • परभणी कृषी विद्यापीठ १३.६ 
  • नांदेड १५.५ (-१) 
  • उस्मानाबाद १८ (१) 
  • अकोला १७.४ 
  • अमरावती २२.२ (३) 
  • बुलडाणा २० (२) 
  • चंद्रपूर १६.६ (-२) 
  • गोंदिया १५ (-२) 
  • नागपूर १७.२ 
  • वर्धा १७.४   
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com