राज्यात पावसाचा कमी अधिक जोर 

राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. कोकणात पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. तर मराठवाड्यातील नांदेड, परभणीत मुसळधार पावसाने दणका दिला आहे. सातारा, पुणे जिल्ह्यात दुष्काळी भागात पावसाने दिलासा दिला आहे.
rain in state
rain in state

पुणे : राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. कोकणात पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. तर मराठवाड्यातील नांदेड, परभणीत मुसळधार पावसाने दणका दिला आहे. सातारा, पुणे जिल्ह्यात दुष्काळी भागात पावसाने दिलासा दिला आहे. धरणांच्या पाणलोटात झालेल्या पावसाने नदी, नाले वाहत असल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. शुक्रवारी (ता.१०) राज्यात अनेक ठिकाणी पावसाने उघडीप दिल्याचे दिसून आले. 

नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील १२७ मंडळांमध्ये शुक्रवारी (ता.१०) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील सहा आणि परभणी जिल्ह्यातील पाच मंडळांत अतिवृष्टी झाली. परभणी जिल्ह्यातील चिकलठाणा (ता.सेलू) आणि पूर्णा मंडळांमध्ये १०० मि.मी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. जोरदार पावसामुळे ओढे, नाल्यांना पूर लोटले. अनेक ठिकाणी जमिनी खरडून गेल्यामुळे उगवलेल्या पिकांचे नुकसान झाले. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याने पूरस्थिती नियंत्रणात आली आहे. गुरूवारी सावंतवाडी, कणकवली, वैभववाडी, दोडामार्ग तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. परंतु, सायंकाळी उशिरापासून पावसाचा जोर कमी कमी होत गेला. सातारा जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. गुरूवारी पावसाचा जोर वाढला आहे. पश्‍चिमेकडील तालुक्यासह दुष्काळी भागातील माण, खटाव, फलटण या तालुक्यात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पिकांच्या वाढीस हा पाऊस उपयुक्त ठरणार आहे. पुणे जिल्ह्याच्या पश्चिम पट्यासह पूर्वेकडील दुष्काळी पट्यात पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसत आहेत. यामुळे खरीप पिकांना दिलासा मिळत आहे. इंदापूर येथे जोरदार पाऊस पडला. झालेल्या पावसामुळे ओढे, नाले दुथडी भरून वाहत होते. पश्चिम पट्ट्यातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा तालुक्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. 

शुक्रवारी (ता. १०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्त्रोत - हवामान विभाग) :  कोकण : महाड ६७, माणगाव १०६, माथेरान ५३, म्हसळा ६८, पेण ४५, पोलादपूर १२८, रोहा ६६, तळा ७२, चिपळूण ५९, दापोली ७०, गुहागर ५५, खेड ९७, मंडणगड ९५, राजापूर ४४, संगमेश्वर ५१, देवगड ३४, दोडामार्ग ८६, कणकवली ६८, कुडाळ ३६, रामेश्वर ८९, सावंतवाडी ५३, वैभववाडी ७७, 

मध्य महाराष्ट्र : नेवासा ३६, गिधाडे ३०, चंदगड ५६, गगनबावडा ७८, राधानगरी ५८, शहादा ३५, इगतपुरी ५९, इंदापूर ६३, लोणावळा कृषी ५५, विटा ५२, महाबळेश्वर ३२, बार्शी ४०, जेऊर ३०, माढा ४०, माळशिरस ५४, सेालापूर ४६. 

मराठवाडा : कन्नड ३०,सोयगाव ३८, माजलगाव ४७, पाटोदा ३५, वाडवणी ५८, औंढा नागनाथ ५२, कळमनुरी ४३, जाफ्राबाद ४२, अर्धापूर ६२, हादगाव ३३, हिमायतनगर ५५, नांदेड ३०, भूम ६३, उस्मानाबाद ९३, परांडा ५५, जिंतूर ३०, पाथरी ७१, पुर्णा १११, सोनपेठ ५०. 

विदर्भ : बटकुली ६७, कोर्पणा ३२, सिरोंचा ४४, अर्जुनीमोरगाव ४०, रामटेक ३०, उमरेड ३९.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com