agriculture news in Marathi variation on rain in state Maharashtra | Page 2 ||| Agrowon

राज्यात पावसाचा कमी अधिक जोर 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 11 जुलै 2020

राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. कोकणात पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. तर मराठवाड्यातील नांदेड, परभणीत मुसळधार पावसाने दणका दिला आहे. सातारा, पुणे जिल्ह्यात दुष्काळी भागात पावसाने दिलासा दिला आहे.

पुणे : राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. कोकणात पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. तर मराठवाड्यातील नांदेड, परभणीत मुसळधार पावसाने दणका दिला आहे. सातारा, पुणे जिल्ह्यात दुष्काळी भागात पावसाने दिलासा दिला आहे. धरणांच्या पाणलोटात झालेल्या पावसाने नदी, नाले वाहत असल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. शुक्रवारी (ता.१०) राज्यात अनेक ठिकाणी पावसाने उघडीप दिल्याचे दिसून आले. 

नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील १२७ मंडळांमध्ये शुक्रवारी (ता.१०) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील सहा आणि परभणी जिल्ह्यातील पाच मंडळांत अतिवृष्टी झाली. परभणी जिल्ह्यातील चिकलठाणा (ता.सेलू) आणि पूर्णा मंडळांमध्ये १०० मि.मी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. जोरदार पावसामुळे ओढे, नाल्यांना पूर लोटले. अनेक ठिकाणी जमिनी खरडून गेल्यामुळे उगवलेल्या पिकांचे नुकसान झाले. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याने पूरस्थिती नियंत्रणात आली आहे. गुरूवारी सावंतवाडी, कणकवली, वैभववाडी, दोडामार्ग तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. परंतु, सायंकाळी उशिरापासून पावसाचा जोर कमी कमी होत गेला. सातारा जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. गुरूवारी पावसाचा जोर वाढला आहे. पश्‍चिमेकडील तालुक्यासह दुष्काळी भागातील माण, खटाव, फलटण या तालुक्यात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पिकांच्या वाढीस हा पाऊस उपयुक्त ठरणार आहे.

पुणे जिल्ह्याच्या पश्चिम पट्यासह पूर्वेकडील दुष्काळी पट्यात पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसत आहेत. यामुळे खरीप पिकांना दिलासा मिळत आहे. इंदापूर येथे जोरदार पाऊस पडला. झालेल्या पावसामुळे ओढे, नाले दुथडी भरून वाहत होते. पश्चिम पट्ट्यातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा तालुक्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. 

शुक्रवारी (ता. १०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्त्रोत - हवामान विभाग) : 
कोकण : महाड ६७, माणगाव १०६, माथेरान ५३, म्हसळा ६८, पेण ४५, पोलादपूर १२८, रोहा ६६, तळा ७२, चिपळूण ५९, दापोली ७०, गुहागर ५५, खेड ९७, मंडणगड ९५, राजापूर ४४, संगमेश्वर ५१, देवगड ३४, दोडामार्ग ८६, कणकवली ६८, कुडाळ ३६, रामेश्वर ८९, सावंतवाडी ५३, वैभववाडी ७७, 

मध्य महाराष्ट्र : नेवासा ३६, गिधाडे ३०, चंदगड ५६, गगनबावडा ७८, राधानगरी ५८, शहादा ३५, इगतपुरी ५९, इंदापूर ६३, लोणावळा कृषी ५५, विटा ५२, महाबळेश्वर ३२, बार्शी ४०, जेऊर ३०, माढा ४०, माळशिरस ५४, सेालापूर ४६. 

मराठवाडा : कन्नड ३०,सोयगाव ३८, माजलगाव ४७, पाटोदा ३५, वाडवणी ५८, औंढा नागनाथ ५२, कळमनुरी ४३, जाफ्राबाद ४२, अर्धापूर ६२, हादगाव ३३, हिमायतनगर ५५, नांदेड ३०, भूम ६३, उस्मानाबाद ९३, परांडा ५५, जिंतूर ३०, पाथरी ७१, पुर्णा १११, सोनपेठ ५०. 

विदर्भ : बटकुली ६७, कोर्पणा ३२, सिरोंचा ४४, अर्जुनीमोरगाव ४०, रामटेक ३०, उमरेड ३९.


इतर अॅग्रो विशेष
आपत्कालीन परिस्थितीत राज्य सरकारांसोबत...मुंबई : आपत्कालीन परिस्थितीत केंद्र सरकार राज्य...
कीडनाशकांवर बंदीबाबत अभ्यासच झालेला नाहीपुणे: कृषी रसायन क्षेत्रात काही कीडनाशकांवर...
जालन्यात रेशीम कोषांची उलाढाल ६६...जालना: येथील रेशीम कोष खरेदी बाजारपेठेची यंदाच्या...
कलिंगड, भातशेतीसोबत ब्रॉयलर पक्षांची...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पेंडूर कनकवाडी येथील दीपक...
दूध आंदोलनाची पुढील दिशा आज ठरणारनगर ः दुधाला प्रतिलिटर तीस रुपये दर मिळावा आणि...
पॉवर टीलर आयातीवर निर्बंधपुणे: भारत-चीन वादाचा फटका आता पॉवर टीलर...
नगर जिल्ह्यात तेलकट डागांमुळे डाळिंब...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा छोटी तसेच तोडणीला...
शेळीपालन, श्‍वान, देशी कोंबडीपालनातून...शेळीपालन, मग श्‍वानपालन व आता देशी कोंबडीपालन अशी...
राज्यात ठिकठिकाणी पावसाच्या हलक्या सरीपुणे ः  कोकण, मध्य महाराष्ट्र, खानदेश,...
लक्ष वळविण्याची राजकीय खेळी!एखाद्या महासंकटाचा राजकीय लाभ कसा उठवायचा हे...
जो पारदर्शी तोच टिकेलकेंद्र सरकारने ‘एक देश एक बाजार’ योजनेची घोषणा...
आदिवासी महामंडळातर्फे ४९ लाख क्विंटल...नाशिक : कोरोनाच्या संकट काळात आदिवासी विकास...
संशोधनासाठी मोसंबी वाणांचे जतन फायदेशीर...बदनापूर, जि. जालना : मोसंबी फळपिकांच्या विविध...
परभणी जिल्ह्यात कापसाची ३६ लाख क्विंटल...परभणी ः कोरोना साथीमुळे लांबत गेलेला परभणी...
अल्पभुधारक शेतकऱ्यांच्या सबलीकरणावर भर नवी दिल्ली: शेती क्षेत्राला चालना देण्यासाठी...
रानभाज्या विक्रीतून रोजगार निर्मितीचा...नाशिक: राज्यातील आदिवासी भागात नैसर्गिक पद्धतीने...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा शिडकावा पुणे ः पावसाचा जोर कमी झाल्याने कोकण, मध्य...
चीनकडून बियाणे दहशतवादाचा धोका पुणेः देशातील बियाणे वारसा आणि बीजोत्पादन उद्योग...
बेकायदा ‘एचटीबीटी’मुळे तीनशे कोटींचा...पुणे : बेकायदेशीर तणनाशक सहणशील (एचटीबीटी) कापूस...
कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरला कोल्हापूर: जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे....