तापमानात चढ-उतार

cold
cold

पुणे ः अरबी समुद्राच्या आग्नेय भागात असलेले कमी दाबाचे क्षेत्र वायव्येच्या दिशेने सरकत आहे. त्याचा परिणाम पुन्हा राज्यातील वातावरणावर होत आहे. यामुळे राज्यातील तापमानात चढ-उतार सुरू आहे. सोमवारी (ता. ९) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत धुळे येथील कृषी महाविद्यालयात ९.५ अंश सेल्सिअस अशी सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे धुळे येथील कृषी महाविद्यालयाच्या सूत्रांनी सांगितले. कमी दाबाच्या क्षेत्रामुळे सोमवारी (ता. ९) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागांत सकाळी हवामान अंशतः ढगाळ होते. खानदेश व विदर्भात हवामान कोरडे होते. त्यामुळे या भागात किंचित थंडी असली तरी कोकण व मध्य महाराष्ट्रात वाढत असलेली थंडी पुन्हा कमी झाली आहे. किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत पाच ते सहा अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे. दरम्यान बंगालच्या उपसागर पूर्व भागात व श्रीलंकेच्या जवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. हे क्षेत्र समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर आहे, त्याचाही काही प्रमाणात परिणाम विदर्भाच्या काही भागात होणार असून, शुक्रवारी (ता. १३) हवामान ढगाळ राहण्याची शक्यता आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यात थंडीने जम बसविण्यास सुरुवात केली होती. विदर्भातील अमरावती, गोंदिया, नागपूर, यवतमाळ या भागात किंचित थंडी आहे, त्यामुळे नागपूरमध्ये ११.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. उर्वरित भागातही किमान तापमान कमी- अधिक होते. मराठवाड्यातही थंडी कमी झाल्याने १५ ते १८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान किमान तापमान होते . मध्य महाराष्ट्रातही थंडी किंचित कमी झाली आहे. कोकणातही ढगाळ हवामानामुळे किमान तापमान २१ ते २२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते.   सोमवारी (ता. ८) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांतील विविध ठिकाणचे किमान तापमान, अंश सेल्सिअसमध्ये, कंसात वाढ- घट ः नगर १३.६ (३), अकोला १३.५, अलिबाग २२.० (३), अमरावती १४.२ (-१), औरंगाबाद १५.७ (३), बीड १८.३ (५), बुलडाणा १५.४ (१), चंद्रपूर १५.६ (२), डहाणू २१.४ (३), गोंदिया १२.२ (-१), जळगाव १४.० (२), धुळे ९.५, कोल्हापूर १९.४ (४), महाबळेश्वर १५.५ (४), मालेगाव १५.२ (४), मुंबई २१.६ (३), नागपूर ११.८ (-१), नांदेड १५.० (२), नाशिक १४.९ (४), निफाड १२.१, परभणी १५.९ (२), लोहगाव १८.० (६), पुणे १७.६ (३), रत्नागिरी २२.५ (२), सांगली १९.५ (३), सातारा १८.४ (५), सोलापूर १९.७ (४), ठाणे २३.२, वर्धा १३.४ (४), यवतमाळ १३.० (-२)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com