agriculture news in Marathi variation in temperature Maharashtra | Page 3 ||| Agrowon

तापमानात चढ-उतार

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

पुणे ः अरबी समुद्राच्या आग्नेय भागात असलेले कमी दाबाचे क्षेत्र वायव्येच्या दिशेने सरकत आहे. त्याचा परिणाम पुन्हा राज्यातील वातावरणावर होत आहे. यामुळे राज्यातील तापमानात चढ-उतार सुरू आहे. सोमवारी (ता. ९) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत धुळे येथील कृषी महाविद्यालयात ९.५ अंश सेल्सिअस अशी सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे धुळे येथील कृषी महाविद्यालयाच्या सूत्रांनी सांगितले.

पुणे ः अरबी समुद्राच्या आग्नेय भागात असलेले कमी दाबाचे क्षेत्र वायव्येच्या दिशेने सरकत आहे. त्याचा परिणाम पुन्हा राज्यातील वातावरणावर होत आहे. यामुळे राज्यातील तापमानात चढ-उतार सुरू आहे. सोमवारी (ता. ९) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत धुळे येथील कृषी महाविद्यालयात ९.५ अंश सेल्सिअस अशी सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे धुळे येथील कृषी महाविद्यालयाच्या सूत्रांनी सांगितले.

कमी दाबाच्या क्षेत्रामुळे सोमवारी (ता. ९) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागांत सकाळी हवामान अंशतः ढगाळ होते. खानदेश व विदर्भात हवामान कोरडे होते. त्यामुळे या भागात किंचित थंडी असली तरी कोकण व मध्य महाराष्ट्रात वाढत असलेली थंडी पुन्हा कमी झाली आहे.

किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत पाच ते सहा अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे. दरम्यान बंगालच्या उपसागर पूर्व भागात व श्रीलंकेच्या जवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. हे क्षेत्र समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर आहे, त्याचाही काही प्रमाणात परिणाम विदर्भाच्या काही भागात होणार असून, शुक्रवारी (ता. १३) हवामान ढगाळ राहण्याची शक्यता आहे.

गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यात थंडीने जम बसविण्यास सुरुवात केली होती. विदर्भातील अमरावती, गोंदिया, नागपूर, यवतमाळ या भागात किंचित थंडी आहे, त्यामुळे नागपूरमध्ये ११.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. उर्वरित भागातही किमान तापमान कमी- अधिक होते. मराठवाड्यातही थंडी कमी झाल्याने १५ ते १८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान किमान तापमान होते

. मध्य महाराष्ट्रातही थंडी किंचित कमी झाली आहे. कोकणातही ढगाळ हवामानामुळे किमान तापमान २१ ते २२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते.  

सोमवारी (ता. ८) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांतील विविध ठिकाणचे किमान तापमान, अंश सेल्सिअसमध्ये, कंसात वाढ- घट ः
नगर १३.६ (३), अकोला १३.५, अलिबाग २२.० (३), अमरावती १४.२ (-१), औरंगाबाद १५.७ (३), बीड १८.३ (५), बुलडाणा १५.४ (१), चंद्रपूर १५.६ (२), डहाणू २१.४ (३), गोंदिया १२.२ (-१), जळगाव १४.० (२), धुळे ९.५, कोल्हापूर १९.४ (४), महाबळेश्वर १५.५ (४), मालेगाव १५.२ (४), मुंबई २१.६ (३), नागपूर ११.८ (-१), नांदेड १५.० (२), नाशिक १४.९ (४), निफाड १२.१, परभणी १५.९ (२), लोहगाव १८.० (६), पुणे १७.६ (३), रत्नागिरी २२.५ (२), सांगली १९.५ (३), सातारा १८.४ (५), सोलापूर १९.७ (४), ठाणे २३.२, वर्धा १३.४ (४), यवतमाळ १३.० (-२)


इतर अॅग्रो विशेष
हरितक्रांती घडविताना सुपीकता हरवली:...अकोला : अन्नधान्य निर्मितीचे उद्दिष्ट पूर्ण...
वाइन उद्योगाला अडचणीतून मुक्त करणार ः...नाशिक : वाइन उद्योगाला मागील काही दिवसांपासून...
सत्तावीस लाख शेतकऱ्यांचे ‘आधार’ रखडलेपुणे: शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बॅंक खात्यात...
वायफाय मोफत हवाय? घरपट्टी, पाणीपट्टी भराकोल्हापूर : ‘‘वायफाय मोफत हवाय? घरपट्टी व...
कर्जमाफीचा शब्द पाळू ः मुख्यमंत्रीइस्लामपूर, जि. सांगली ः कर्जमाफीचा आम्ही दिलेला...
अकोला जिल्ह्यात मजूरटंचाईमुळे कापूस...अकोला ः शेतीकामांसाठी दिवसेंदिवस मजूर समस्या भीषण...
सावित्रीच्या लेकींचा जागर करीत घराच्या...नाशिक : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीचे...
पूरकउद्योग अन् शेती विकासात श्री भावेश्...बेलवळे खुर्द (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील श्री...
उत्तर महाराष्ट्रात अधिक गारठापुणे : राज्यात गारठा वाढला असला तरी, किमान...
शाश्वत ग्राम, शेतीविकासाची 'जनजागृती'औरंगाबाद येथील जनजागृती प्रतिष्ठान या स्वयंसेवी...
बदल ठरावेत लाभदायकयवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील हजारो...
हवामान बदल हेच सर्वांत मोठे आव्हानआ ज जगभरात हवामान बदल आणि त्याचे होणारे परिणाम हा...
महिनाभरात पडणार नाशिक विभागातील साखर...नगर ः नगर, नाशिक जिल्ह्यामध्ये यंदा ३२ पैकी केवळ...
महिलांनी मालक बनले पाहिजे ः राज्यपालमुंबई ः महालक्ष्मी सरस प्रदर्शनातून महिलांचे...
कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांसाठी...मुंबई ः दोन लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी...
ग्रामीण कुटुंबांचे उत्पन्न का वाढत नाही...पुणे: देशात ५० टक्के रोजगार हा शेतीशी निगडित व...
नागपूर : थंडीची तीव्रता वाढली; अंडी...नागपूर ः थंडीच्या दिवसांत मागणी वाढत अंड्यांचे...
निफाडला २.४ अंश तापमान; राज्य थंडीने...पुणे : उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांच्या...
शेतात नवे प्रयोग करणारे शेतकरी आमचे...मुंबई ः प्रत्यक्ष शेतात राबून नवनवीन प्रयोग...
चिखलदऱ्याच्या स्ट्राॅबेरीला हवाय...अमरावती ः लागवड खर्चाच्या दुप्पट उत्पन्न मिळवून...