सकाळी गारठा, तर दुपारी चटका

weather
weather

पुणे : राज्यात कमाल तापमानातील वाढीबरोबरच किमान तापमानात घट होत असल्याने दिवस-रात्रीच्या तापमानातील तफावत वाढली आहे. हवामानात होत असलेल्या वेगवान बदलामुळे सकाळी गारठा, तर दुपारी चटका अशीच स्थिती आहे. मालेगाव येथे उच्चांकी ३७ अंश तर निफाड येथे नीचांकी ९.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.  मंगळवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्याच्या अनेक भागात कमान तापमानात मोठी वाढ झाली आहे. तर काही ठिकाणी किमान तापमान मात्र सरासरीच्या खाली घसल्याचे दिसून आले. नगर, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, परभणी, अकोला, वर्धा येथे उन्हाचा चटका चांगलाच वाढला आहे. धुळे, निफाड येथे तापमानात घट झाल्याने गारठा वाढला आहे. इतरही भागात किमान तापमानात २ ते तीन अंशांची घट झाली आहे. महिनाअखेरीस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात हलक्या पावसाला पोषक हवामान असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.   मंगळवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे किमाल व किमान (कंसात) तापमान, (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३४.९(१४.७), नगर ३६.४(१६.५), धुळे ३२.६ (१०.२), जळगाव -(१३.६), कोल्हापूर ३५.१(२०.०), महाबळेश्‍वर ३०.१(१६.४), मालेगाव ३७.० (१४.६), नाशिक ३३.९(१३.०), निफाड २९.५(९.४), सांगली ३५.७(१९.२), सातारा ३५.५(१७.५), सोलापूर ३६.२(२१.३), अलिबाग २८.९ (१९.६), डहाणू ३३.३ (२०.५), सांताक्रूझ ३२.५(१८.०), रत्नागिरी ३५.७(२०.१), औरंगाबाद ३३.८(१७.४), परभणी ३६.० (१६.२), नांदेड ३४.०(१७.०), अकोला ३५.७(१५.५), अमरावती ३४.६(१५.८), बुलडाणा ३१.०(१६.६), चंद्रपूर ३४.५(१९.०), गोंदिया २८.६(१७.८), नागपूर ३२.६(१६.६), वर्धा ३५.०(१७.५), यवतमाळ ३३.०(१७.०).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com