थंडीत चढ-उतार शक्य

हिंदी महासागर आणि अरबी समुद्राच्या नैर्ऋत्य भागात चक्रीवादळासाठी पोषक असलेले वातावरण आणि उत्तरेकडील कमी झालेल्या थंड वाऱ्याच्या प्रवाहामुळे राज्यातील थंडी कमी झाली आहे.
प्रातिनिधी छायाचित्र
प्रातिनिधी छायाचित्र

पुणे : हिंदी महासागर आणि अरबी समुद्राच्या नैर्ऋत्य भागात चक्रीवादळासाठी पोषक असलेले वातावरण आणि उत्तरेकडील कमी झालेल्या थंड वाऱ्याच्या प्रवाहामुळे राज्यातील थंडी कमी झाली आहे. पुढील दोन ते तीन दिवस ही थंडी कमीअधिक स्वरूपात राहणार आहे. तर सोमवार (ता. २८) नंतर पुन्हा काही प्रमाणात थंडी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे.   उत्तर भारतातील हिमालय व परिसरात असलेल्या थंडीच्या लाटेचा प्रभाव कमी झाला आहे. त्याचा परिणाम राज्यातील वातावरणावर झाला आहे. यामुळे राज्यातील थंडी काही प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे किमान तापमानाचा पारा किंचित वाढला असला, तरी तो दहा अंश सेल्सिअसच्या खाली आहे. मागील चार ते पाच दिवसांपासून परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आवारामध्ये नीचांकी तापमानाची नोंद होत आहे. शुक्रवारी (ता. २५) सकाळी आठ वाजेपर्यंत येथे ९.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले.   राज्यात गेल्या दोन दिवसांपासून थंडीचा कडाका कमी होऊ लागला आहे. विदर्भातील व मराठवाड्यातील काही भागांत थंडी  असल्याने किमान तापमानात घट असल्याचे आढळून येते. मात्र काही भागांत थंडी कमी झाली आहे. त्यामुळे गोंदिया वगळता इतर सर्वच भागांत किमान तापमानाचा पारा दहा अंश सेल्सिअसच्यावर गेला आहे. मराठवाड्यातही किमान तापमानात काहीशी वाढ झाली आहे. या भागात ९ ते १६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान किमान तापमान नोंदविले गेले. मध्य महाराष्ट्रातही थंडीचा प्रभाव कमी झाल्याने थंडी कमीअधिक स्वरूपात आहे. पुणे, नगर, नाशिक, जळगाव भागांत किंचित थंडी आहे. तर कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली या भागांत बोचरी थंडी आहे. कोकणातही काहीशी थंडी असल्याने किमान तापमान अजूनही १६ ते १९ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे.

शुक्रवारी (ता. २५) सकाळपर्यंत विविध शहरांतील किमान तापमान, कंसात वाढ, घट झालेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) ः मुंबई (सांताक्रूझ) १८.८ (१), ठाणे १९, अलिबाग १६.८ (-२), रत्नागिरी १९.९, डहाणू १८.६, पुणे ११.९ (१), जळगाव १३ (१), कोल्हापूर १७.५ (३), महाबळेश्‍वर १४.९ (२), मालेगाव १२.४ (१), नाशिक १३ (३), निफाड ११, सांगली १५.९ (२), सातारा १४.१ (१), सोलापूर १५.६, औरंगाबाद १२.५ (१), बीड १६.८ (३), परभणी ११.९ (-१), परभणी कृषी विद्यापीठ ९.३, नांदेड १४ (१), उस्मानाबाद १२.३ (-१), अकोला ११.४ (-२), अमरावती १४.७, बुलडाणा १२.६ (-२), चंद्रपूर ११.६ (-२), गोंदिया ९.४ (-३), नागपूर ११.२ (-२), वर्धा १० (-५).  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com