किमान तापमानात चढ-उतार सुरूच

राज्यातील काही भागांत थंडी कमी अधिक होत आहे. त्यामुळे किमान तापमानात चढ-उतार सुरू आहे. मात्र मराठवाडा व विदर्भात थंडी असल्याने किमान तापमानात घट होत आहे.
किमान तापमानात चढ-उतार सुरूच
किमान तापमानात चढ-उतार सुरूच

पुणे ः राज्यातील काही भागांत थंडी कमी अधिक होत आहे. त्यामुळे किमान तापमानात चढ-उतार सुरू आहे. मात्र मराठवाडा व विदर्भात थंडी असल्याने किमान तापमानात घट होत आहे. शनिवारी (ता. ७) सकाळी आठ वाजेपर्यंत मराठवाड्यातील परभणी कृषी विद्यापीठ येथे ११ अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली आहे. लक्षद्वीप-मालदीव परिसर ते कर्नाटक या दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. हा पट्टा समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर आहे. त्याचा परिणाम मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांतील काही भागांवर झाला असून, काही प्रमाणात ढगाळ हवामानाची स्थिती आहे. त्यामुळे भागातील किमान तापमान काही अंशी वाढ होऊन सरासरीएवढे झाले आहे. तर थंडीही काही प्रमाणात कमी झाली आहे. तर नगर, पुणे, नाशिक, जळगाव या भागांत किमान तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत दोन अंश सेल्सिअसने कमी होऊन किमान तापमान ११ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. कोकणातही जवळपास सर्वच भागांत थंडी वाढत असल्याने किमान तापमानाचा पारा १९ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे. मराठवाडा व विदर्भात थंडीने चांगलाच जम बसविला आहे. या भागात बऱ्यापैकी थंडी वाढली आहे. त्यामुळे ऊब मिळवण्यासाठी नागरिक आता हळूहळू शेकोट्या पेटवू लागले आहेत. मराठवाड्यात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत चार अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली आहे. विदर्भाच्या सर्वच भागांत थंडीने हुडहुडी भरवली आहे. यवतमाळ, चंद्रपूर येथे किमान तापमान सरासरीच्या तुलनेत सहा अंश सेल्सिअसने घट झाली असून, किमान तापमान ११.५ अंश सेल्सिअस एवढे नोंदविले गेले. अकोला, अमरावती, बुलडाणा, गोंदिया, नागपूर, वर्धा या भागांतही चांगलीच थंडी आहे.     शनिवारी (ता. ७) सकाळपर्यंत विविध शहरांतील किमान तापमान कंसात बदल (अंश सेल्सिअसमध्ये) :  मुंबई (सांताक्रूझ)ः १९.७ (-२), अलिबाग २०.२ (-२), ठाणे २४, रत्नागिरी २१.२ (-१), डहाणू २०.७ (-१), पुणे १३.३ (-२), जळगाव १४ (-२), कोल्हापूर १९.२, महाबळेश्‍वर १४, मालेगाव १४.४ (-१), नाशिक १३ (-१), निफाड ११.५, सांगली १८, सातारा १६ (-१), सोलापूर १९.४, औरंगाबाद १४ (-२), परभणी १४ (-३), परभणी कृषी विद्यापीठ ११, नांदेड १६ (-४), उस्मानाबाद १५.१ (-१) अकोला १४.१ (-४), अमरावती १३.४ (-५), बुलडाणा १४.८ (-३), चंद्रपूर ११.५ (-६), गोंदिया १२ (-५), नागपूर १३.७ (-३), वर्धा १४ (-४), यवतमाळ ११.५ (-६).  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com