विविध फळे, भाज्यांची फुलली परसबाग

घराशेजारी सुमारे ११०० चौरस फुटाची परसबाग आणि या परसबागेत ६३ प्रकारची फळे आणि भाज्यांची लागवड सुभाष भगत यांनी केली आहे.
kitchen garden
kitchen garden

सोलापूर ः घराशेजारी सुमारे ११०० चौरस फुटाची परसबाग आणि या परसबागेत ६३ प्रकारची फळे आणि भाज्यांची लागवड सुभाष भगत यांनी केली आहे. सोलापुरातील वसंत विहारनजीकच्या राधाकृष्ण कॉलनीतील सुभाष भगत यांनी ही परसबाग वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने तयार केली आहे. मियावाकी पद्धतीने सर्व पिकांची सघन पद्धतीने लागवड केली आहे. 

भगत यांच्या परसबागेत कांचन, शमी, निलगिरी, साग, आवळा, बेहडा, उंबर, अंजीर, चिंच, नारळ, पेरु, आंबा, चिक्कू, मोसंबी, लिंबू, डाळिंब, बोर, केळी, पपई, सीताफळ, रामफळ, जांभूळ या फळासह जास्वंद, गुलाब, सोनचाफा, चाफा, पारिजात, जाई-जुई, मोगरा ही फुलेही पाहायला मिळतात.  त्याशिवाय काजू, सुपारी, हापूस, आंबा, करवंद लागवड त्यांनी केली आहे.

या परसबागेतून रोजच्या स्वयंपाकासाठी लागणारी कोथिंबीर, हिरवी मिरची, मेथी, वांगी आदी भाज्याही मिळतात. सर्व झाडांना पाणी देण्यासाठी ठिबक, स्प्रिंकलरचा उपयोग केला आहे. शिवाय, या झाडांना कोणत्याही प्रकारचे रासायनिक खत दिले जात नाही. घरातील कचरा, तसेच बागेत पडलेल्या पानांपासून कंपोस्ट खत तयार केले जाते. हे खत फळझाडे, भाजीपाल्यासाठी वापरले जाते.

प्रतिक्रिया स्वतःच्या परसबागेतून आपल्या गरजा भागवल्या पाहिजेत. प्रत्येकांनी असा उपक्रम केला पाहिजे. विविध संस्थांनी त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.   - सुभाष भगत, सोलापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com