वारणा, गोकुळ दूध संघांकडून दरात वाढ

वारणा, गोकुळ दूध संघांकडून दरात वाढ
वारणा, गोकुळ दूध संघांकडून दरात वाढ

कोल्हापूर : जिल्हा दूध संघ (गोकुळ) आणि वारणानगर येथील वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघाने गायीच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ जाहीर केली. दरवाढ ११ डिसेंबरपासून लागू होणार असल्याचे ‘गोकुळ''चे अध्यक्ष रवींद्र आपटे व वारणा संघाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे, कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी सांगितले. या निर्णयाने महापूर व अतिवृष्टीमुळे अडचणीत आलेल्या दूध उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. म्हैस दुधाचा दर यापूर्वीच शासनाच्या दरापेक्षा जास्त असल्याने या दरात वाढ झालेली नाही. गोकुळ चे अध्यक्ष श्री. आपटे म्हणाले, ‘‘पूर्वी गायीच्या साडेतीन फॅट दुधाला प्रतिलिटर २६.४० रुपये खरेदी दर होता. तो ११ डिसेंबरपासून २८.४० रुपये होणार आहे. यात संस्था कमिशनपोटी दिल्या जाणाऱ्या प्रतिलिटर १.४० रुपयांचा समावेश आहे.’’ महापूर, अवकाळी पावसाने दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. प्रचंड पावसामुळे वैरणीचाही प्रश्‍न गंभीर बनला. वैरणीच्या टंचाईमुळे वैरणीचे दर वाढले आहेत. त्यामुळे गायीच्या दूध दरात वाढ करण्याचा निर्णय वारणेच्या संचालक मंडळाने घेतला. गायीच्या दुधास ३.५ फॅट व ८.५ एसएनएफला प्रतिलिटरला २५ रुपये दर होता. ११ डिसेंबरपासून तो २७ रुपये दिला जाणार आहे, अशी माहिती उपाध्यक्ष डॉ. भाऊसाहेब गुळवणी यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com