agriculture news in marathi Varna, Gokul milk union rise milk purchase rate | Agrowon

वारणा, गोकुळ दूध संघांकडून दरात वाढ

टीम अॅग्रोवन
सोमवार, 9 डिसेंबर 2019

कोल्हापूर : जिल्हा दूध संघ (गोकुळ) आणि वारणानगर येथील वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघाने गायीच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ जाहीर केली.

दरवाढ ११ डिसेंबरपासून लागू होणार असल्याचे ‘गोकुळ''चे अध्यक्ष रवींद्र आपटे व वारणा संघाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे, कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी सांगितले. या निर्णयाने महापूर व अतिवृष्टीमुळे अडचणीत आलेल्या दूध उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. म्हैस दुधाचा दर यापूर्वीच शासनाच्या दरापेक्षा जास्त असल्याने या दरात वाढ झालेली नाही.

कोल्हापूर : जिल्हा दूध संघ (गोकुळ) आणि वारणानगर येथील वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघाने गायीच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ जाहीर केली.

दरवाढ ११ डिसेंबरपासून लागू होणार असल्याचे ‘गोकुळ''चे अध्यक्ष रवींद्र आपटे व वारणा संघाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे, कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी सांगितले. या निर्णयाने महापूर व अतिवृष्टीमुळे अडचणीत आलेल्या दूध उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. म्हैस दुधाचा दर यापूर्वीच शासनाच्या दरापेक्षा जास्त असल्याने या दरात वाढ झालेली नाही.

गोकुळ चे अध्यक्ष श्री. आपटे म्हणाले, ‘‘पूर्वी गायीच्या साडेतीन फॅट दुधाला प्रतिलिटर २६.४० रुपये खरेदी दर होता. तो ११ डिसेंबरपासून २८.४० रुपये होणार आहे. यात संस्था कमिशनपोटी दिल्या जाणाऱ्या प्रतिलिटर १.४० रुपयांचा समावेश आहे.’’

महापूर, अवकाळी पावसाने दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. प्रचंड पावसामुळे वैरणीचाही प्रश्‍न गंभीर बनला. वैरणीच्या टंचाईमुळे वैरणीचे दर वाढले आहेत. त्यामुळे गायीच्या दूध दरात वाढ करण्याचा निर्णय वारणेच्या संचालक मंडळाने घेतला. गायीच्या दुधास ३.५ फॅट व ८.५ एसएनएफला प्रतिलिटरला २५ रुपये दर होता. ११ डिसेंबरपासून तो २७ रुपये दिला जाणार आहे, अशी माहिती उपाध्यक्ष डॉ. भाऊसाहेब गुळवणी यांनी दिली.


इतर ताज्या घडामोडी
माणसाचे प्राचीन पूर्वज खात झाडांचे कठीण...माणसांच्या प्राचीन पूर्वजांच्या आहारामध्ये...
प्लॅस्टिकच्या सूक्ष्मकणांचे खेकड्यांवर...सागरी किनाऱ्यावरील वाळूतील प्रौढ खेकड्यांच्या...
वस्तू खरेदीची बिले पंचायत समित्यांना...पुणे  : जिल्हा परिषदेकडून वैयक्तिक लाभ...
जैवविविधता नोंदणीसाठी धावपळपुणे: राज्यातील खेडोपाड्यांसह शहरांमध्ये असलेल्या...
नगर जिल्ह्यात कांदा दरात चढउतार; शेतकरी...नगर  ः जिल्ह्यात मागील महिन्यात कांद्याला...
नांदेड, परभणी, हिंगोलीत साडेबारा लाख...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...
सातारा जिल्ह्यातील शेतकरी सौर...सातारा  : महावितरण कंपनीकडून कृषी पंपाच्या...
मूर्तिजापूरमध्ये कृषी अधिकारी पोचले...अकोला  ः शेतकरी विविध प्रकारची पिके घेऊन...
औरंगाबाद जिल्ह्यात शेती आधारित उद्योग,...औरंगाबाद  : जिल्ह्याचा पालकमंत्री व...
नाशिक जिल्ह्यात रब्बीची एक लाख १५ हजार...नाशिक  : जिल्ह्यात रब्बी हंगामात एकूण १ लाख...
यवतमाळमध्ये ‘आधार’अभावी थकले कापूस...यवतमाळ  ः कापूस चुकाऱ्यासाठी बॅंक खाते आधार...
जळगाव जिल्ह्यात युरियाचा साठा संपला !जळगाव  ः खतांच्या वापरात आघाडीवर असलेल्या...
राजापुरात पावणेदोनशे क्विंटल भात खरेदीराजापूर, जि. रत्नागिरी  ः राजापूर तालुका...
पोल्ट्री सुरू करायचीय, नक्की वाचा......विमलताई या गावातील समाजकार्यास वाहून घेतलेल्या...
या आठवड्यात ढगाळ, थंड, कोरडे हवामान...महाराष्ट्राच्या मध्य भागावर पूर्व व पश्‍चिम...
सकस चाऱ्या‍साठी बीएचएन - १० संकरित...महाग खुराकातील काही भाग स्वस्त चाऱ्या‍मधून देणे...
माथाडी कामगारांच्या प्रश्‍नांसाठी लवकरच...पुणे  ः माथाडी आणि कामगार कायदा गुंतागुंतीचा...
नगर, नाशिकला पुढील वर्षी ऊसदरात फटका ?नगर ः नगर, नाशिकसह राज्याच्या अनेक भागांत उशिरा...
धरण कालवा सल्लागार समितीची आज नगरला बैठकनगर  : मुळा, भंडारदरा व निळवंडे धरणांच्या...
परभणीत मूग, उडदाचा पीकविमा परतावा मंजूरपरभणी  ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत खरीप...