agriculture news in marathi varneshwar agro producer company sales 175 kg vegetable on first day | Agrowon

परभणीत पहिल्या दिवशी १७५ किलो भाजीपाल्याची विक्री; वर्णेश्वर ॲग्रो प्रोड्युर्स कंपनीचा पुढाकार

टीम अॅग्रोवन
रविवार, 5 एप्रिल 2020

परभणी : कृषी विभागाच्या महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी प्रकल्पांतर्गत स्थापन वर्णा (ता.जिंतूर) येथील वर्णेश्वर ॲग्रो प्रोड्युर्स कंपनी तर्फे सभासद शेतक-यांचा भाजीपाला विक्रीसाठी परभणी शहरातील विविध नागरी वस्त्यांमध्ये शेतकरी ते ग्राहक भाजीपाला विक्री हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

परभणी : कृषी विभागाच्या महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी प्रकल्पांतर्गत स्थापन वर्णा (ता.जिंतूर) येथील वर्णेश्वर ॲग्रो प्रोड्युर्स कंपनी तर्फे सभासद शेतक-यांचा भाजीपाला विक्रीसाठी परभणी शहरातील विविध नागरी वस्त्यांमध्ये शेतकरी ते ग्राहक भाजीपाला विक्री हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

शनिवारी(ता.४) शिवाजीनगर येथे या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. पहिल्या दिवशी ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून १७५ किलो भाजीपाल्याची विक्री झाली, त्यातून तीन हजार ३०० रुपये मिळाले. उद्घाटनास जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) मंगेश सुरवसे, जिल्हा पणन व्यवस्थापक पंकज चाटे, शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष दिलीप अंभुरे, माणिक अंभुरे, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयातील डॅा.गोपाळ शिंदे, जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष गजानन लोंढे आदींसह ग्राहक उपस्थित होते.

संचारबंदी काळात शहरातील ग्राहकांना भाजीपाला उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे, जिल्हा निबंधक (सहकारी संस्था) श्री. सुरवसे, आत्माचे उपसंचालक के.आर.सराफ यांच्या, पणन मंडळाचे जिल्हा व्यवस्थापक श्री. चाटे यांच्या संकल्पनेतून परभणी शहरातील विविध नागरी वसाहतीमध्ये शेतकरी ते ग्राहक भाजीपाला विक्री हा उपक्रम वर्णेश्वर ॲग्रो प्रोड्युर्स कंपनीच्या माध्यमातून राबविला जात आहे.

वर्णेश्वर शेतकरी उत्पादक कंपनी चे सभासद असलेल्या वर्णा, कडसावंगी, चांदज, बोरी, कौसडी, नागठाणा, गोंधळा आदी गावातील ५० भाजीपाला उत्पादक शेतक-यांच्या शेतातील भाजीपाला संकलित करून वाहनाव्दारे परभणी शहरात आणला जात आहे. दररोज सकाळी ७ ते ११ या वेळेत परभणी शहरातील एका नागरी वसाहतीमध्ये या भाजीपाल्याची विक्री केली जात आहे. तत्पूर्वी त्या-त्या वसाहतीमधील नागरिकांच्या व्हॅाट्सअप ग्रुपव्दारे भाजीपाला विक्रीसाठी आणत असल्याची सूचना दिली जात आहे. 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे महावितरणचे...सोलापूर ः महावितरणच्या अकलूज, पंढरपूर व...
वळण योजना प्रकल्प पूर्ण करा : भुजबळनाशिक : ‘‘जिल्ह्यातील पाणी पश्चिमेकडे वाहून...
कृषीकन्येकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनबदलापूर (जि.ठाणे) ः कृषी कार्यानुभव...
मालेगावात कांदा निर्यातबंदीच्या...मालेगाव, जि. नाशिक : गेल्या महिन्यात कांद्याला...
सोलापुरातील शेतकऱ्यांनो कृषी...सोलापूर : यंदाच्या वर्षासाठीची कृषी यांत्रिकीकरण...
जीवामृत निर्मितीचे प्रात्यक्षिकनशिराबाद, जि. बुलडाणाः येथील कृषीकन्या भाग्यश्री...
हिंगोलीतील सहा मंडळात अतिवृष्टीहिंगोली :जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) सकाळी...
द्राक्ष उत्पादकांची व्यापारी,...नाशिक : सुमारे ९५ टक्के द्राक्ष व्यापारी हे...
जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादकांना विमा...जळगाव : शेतकरी प्रश्‍नी शरद जोशी प्रणित शेतकरी...
दुधना नदीला पूर, पिकांत पाणीच पाणीपरभणी : सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्न...
उदगीरमधील ‘देवर्जन’ सात वर्षांनंतर भरलाउदगीर : देवर्जन (ता. उदगीर) येथील मध्यम...
बीड, लातूरमधील मंडळांत दमदार पाऊसऔरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद,...
गिरणा पट्ट्यात पूर ओसरताच वाळूचा उपसा...जळगाव : गिरणा परीसरातील शेतकऱ्यांना पूर,...
सेस रद्द करा, अन्यथा बंद पुकारूपुणे ः केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन विषयक तीन...
जळगावात बाजार समित्या बरखास्तीचे राजकारणजळगाव ः जिल्ह्यात दोन्ही काँग्रेस, शिवसेनेची...
शेतकऱ्यांसाठी सुखावणारा कायदा ः...कोल्हापूर ः शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य...
बुलडाण्यात दहा हजार हेक्टरवर क्षेत्र...बुलडाणा ः जिल्ह्यात शनिवार (ता. १९) व रविवारी (ता...
सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने...सिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागाला सोमवारी (ता...
अखेर ६६५ शेतकऱ्यांना विम्याचा लाभअकोला ः  सन २०१९ च्या खरीप हंगामात पंतप्रधान...
संत्रा वाहतुकीसाठी रेल्वेकडून वरूड...अमरावती : किसान रेल्वेच्या माध्यमातून येत्या...