agriculture news in marathi, 'Vasaka' privatization resolution | Agrowon

‘वसाका`च्या खासगीकरणाचा ठराव
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 31 ऑगस्ट 2018

कळवण, जि. नाशिक  : वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याचे सभासद व कामगारांचे हक्क अबाधित ठेवून कारखाना भाडेतत्त्वावर खासगी व्यापाऱ्यास चालविण्यास देण्यात यावा, असा ठराव मंगळवारी (ता. २८) वसाका कार्यस्थळावर झालेल्या विशेष सभेत मंजूर करण्यात आला.

कळवण, जि. नाशिक  : वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याचे सभासद व कामगारांचे हक्क अबाधित ठेवून कारखाना भाडेतत्त्वावर खासगी व्यापाऱ्यास चालविण्यास देण्यात यावा, असा ठराव मंगळवारी (ता. २८) वसाका कार्यस्थळावर झालेल्या विशेष सभेत मंजूर करण्यात आला.

वसाका भाडेतत्त्वावर देण्यासंदर्भात येथील श्रीराम मंदिरात वसाकाचे ऊस उत्पादक सभासद, कामगार व प्राधिकृत मंडळ यांची संयुक्त विशेष सभा बोलविण्यात आली होती.अध्यक्षस्थानी कारखान्याचे मुख्य प्राधिकृत अधिकारी व आमदार डॉ. राहुल अहेर होते. या वेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदार अहेर, माजी कामगार संचालक विलास सोनवणे, कामगार युनियनचे अध्यक्ष अशोक देवरे, संतोष मोरे, जिल्हा बँकेचे संचालक धनंजय पवार, मविप्रचे संचालक अशोक पवार, देवळा बाजार समितीचे सभापती बापू देवरे, रामकृष्ण जाधव, विलास देवरे, राजेंद्र पवार, गोविंद पगार, प्रभाकर पाटील, कारभारी बिरारी, राजेंद्र देवरे, कुबेर जाधव, शशिकांत निकम, पंडितराव निकम, जेंद्र भामरे, डॉ. पोपटराव पगार उपस्थित होते.  

आमदार डॉ. अहेर म्हणाले, ‘‘राज्य सहकारी बँक व खासगी मालक यांच्यात समन्वय घालून ऊस उत्पादक आणि कामगारांना त्यांची देणी लवकरात लवकर प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न राहील.``

‘‘कारखाना खासगी तत्त्वावर चालविण्यास देत असताना समोरच्या व्यक्तीची क्षमता पाहून सभासदांचे, कामगारांचे हित जोपासले जाईल, असा निर्णय घेण्यात यावा, अशी सूचना केदार अहेर यांनी केली. दरम्यान, उपस्थितांनी मनोगताद्वारे कारखाना खासगी तत्त्वावर चालविण्यास देत असताना ऊस उत्पादकांना व कामगारांना योग्य न्याय मिळावा, अशी मागणी केली. कुबेर जाधव यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी कसमादे परिसरातील ऊस उत्पादक, सभासद, वाहतूकदार, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इतर बातम्या
`चांद्रयान २' चंद्राच्या कक्षेत दाखलनवी दिल्ली ः भारताची महत्त्वाकांक्षी...
अकोल्यातील प्रकल्पात अत्यल्पच साठाअकोला : यंदाच्या पावसाळ्याचे सुमारे अडीच महिने...
अकोला जिल्ह्यात ६० हजार हेक्टर क्षेत्र...अकोला ः यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात असमतोल...
मराठवाड्यात २७ टक्केच पीक कर्जवाटपऔरंगाबाद : यंदाच्या खरिपासाठी शेतकऱ्यांना...
सिंधुदुर्गात कालव, जिताडा मस्त्यबीज...मुंबई : राज्यात सागरी उत्पादनवाढीस...
ठिबकला ८० टक्के अनुदान; आंदोलनाला...भोसे, जि. सोलापूर : राज्य शासनाने कोरडवाहू...
मांडाखळीत संत्रा बागांत फळगळपरभणी : कमी पाण्यामुळे जमिनीमध्ये ओलाव्याची...
रश्‍मी बागल यांचा शिवसेनेत प्रवेशसोलापूर : जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसची...
मांजरपाड्याचे पाणी दरसवाडी धरणात पोचलेनाशिक : येवल्याच्या दुष्काळी भागात पाणी...
माशांच्या पाच नव्या जातींचा घेतला शोध अरुणाचल प्रदेश राज्यातील इटानगर येथील राजीव गांधी...
राज्य बँकेची ३५ हजार कोटींची उलाढालमुंबई : अहवाल वर्षात इतिहासात ३५,४४० कोटी इतकी...
कोल्हापुरात मोहीम स्वरूपात पंचनाम्यास...कोल्हापूर: महापुराच्या प्रलयानंतर आता...
नाशिक जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी...नाशिक  : चालू खरीप हंगामात मका पिकावर मोठ्या...
सांगली जिल्हा बॅंकेच्या १२ शाखांचे...सांगली   ः महापुराचा फटका शेती आणि...
एकात्मिक शेती पद्धत वापरासाठी ‘कृषी’...मुंबई  : पीक उत्पादन वाढून शेतकऱ्यांचे...
`अतिपावसाने होत्याचं नव्हतं झालं`; पुणे...पुणे ः शेतकरी पाणीटंचाईच्या संकटातून सावरण्याचा...
अपघात विमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील...मुंबई: गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा...
राज्यात पूरप्रवण क्षेत्राबाबत संशयकल्लोळपुणे : कृष्णा व गोदावरी नदीच्या खोऱ्यात सतत पूर...
पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत पिके...कोल्हापूर   : पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत...
युतीतील अनेक जण आमच्या संपर्कात ः अजित...यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आणि...