Agriculture news in marathi Vasant Chavan as the Chairman of Nanded District Bank | Agrowon

नांदेड जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी वसंत चव्हाण 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 17 एप्रिल 2021

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी नायगावचे माजी आमदार वसंत चव्हाण यांची, तर उपाध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष हरिहर भोसीकर यांची निवड झाली. 

नांदेड : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठीची शुक्रवारी (ता. १६) निवड प्रक्रिया पार पडली. यामध्ये नायगावचे माजी आमदार वसंत चव्हाण यांची अध्यक्षपदासाठी, तर उपाध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष हरिहर भोसीकर यांची निवड झाली. 

पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडून दोघांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याने उमेदवार अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यांच्या विरोधात एकही अर्ज आला नसल्याने दोघांचीही निवड बिनविरोध करण्यात आली. राजकीय प्रवासात आमदार चव्हाण यांनी गावच्या सरपंच पदापासून जिल्हा परिषद सदस्य, विधान परिषद सदस्य, विधानसभा सदस्य, नायगाव मार्केट कमिटी अध्यक्ष आणि आता नांदेड जिल्हा बँकेचे अध्यक्ष अशी नामी पदे भूषवीत आपल्या राजकीय, सामाजिक व सहकार क्षेत्रातील विविध पदांचा कार्यभार सांभाळत सातत्यपूर्ण कार्याची चमक दाखवून दिली आहे. 

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या या निवडीमुळे माजी आमदार चव्हाण यांचे पूनर्वसन झाले. शिवाय राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हरीहर भोसीकर यांना देखील जिल्हा बँकेच्या रूपाने चांगले पद मिळाल्याने जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या गोटात आनंदाचे वातावरण दिसून येते. 

दुसरीकडे नायगावकर पुन्हा राजकीय क्षेत्रात जोमाने पुढे येतील याची देखील चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दुसरीकडे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपाचे चार विजयी उमेदवार अर्ज दाखल करण्यात कुठेही सक्रिय सहभाग दिसून आला नाही. दोन्ही विजयी उमेदवारांच्या या निवडीबद्दल सर्वत्र आनंदोत्सव साजरा केला जात आहे. सर्वच क्षेत्रांतून त्यांचे या निवडीबद्दल अभिनंदन ही करण्यात येत आहे.


इतर बातम्या
वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा पुणे : अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या ‘तौत्के’...
पावसासाठी पोषक वातावरण पुणे : चक्रीवादळामुळे पश्‍चिम महाराष्ट्रात वेगाने...
पश्‍चिम महाराष्ट्रातही पाऊस पुणे ः ‘तौत्के’ चक्रीवादळाचा फटका पुणे, कोल्हापूर...
विदर्भ, मराठवाड्यात पाऊसअमरावती/औरंगाबाद : ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे विदर्भ...
कापूस बियाणे विक्री २० मेपासून करा : ‘...नागपूर : विदर्भ, खानदेश विभागांत शेजारच्या...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे ...येवला, जि. नाशिक : कृषी बियाणे रासायनिक खते,...
कोकण किनारपट्टीला चक्रीवादळाचा दणका रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी ः ‘तौत्के’ चक्रीवादळाचा...
तूर, मूग, उडदाची आयात खुली नागपूर : केंद्र सरकारने हंगामापूर्वी तूर, उडीद...
धूळवाफ पेरणीत लॉकडाउनचा खोडा सांगली ः शिराळा तालुक्यात वारंवार झालेल्या...
आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन करा ः...नागपूर : गेल्या वर्षीचा महापूर लक्षात घेऊन...
कुकडीच्या पाण्यासाठी  पारनेरकर एकवटले निघोज, ता. पारनेर : कुकडीच्या पाण्याबाबत पुणे...
पेट्रोल, खतांच्या दरवाढीविरोधात ...मुंबई : पेट्रोल शंभरी पार केल्यानंतर केंद्राने...
गडहिंग्लजमध्ये शेतकऱ्यांकडे नऊ टन...गडहिंग्लज, जि. कोल्हापूर : यंदाच्या खरीप हंगामात...
कीटकनाशके विक्रीबाबत तरतुदींचे पालन करा अकोला ः या खरीप हंगामात बियाणे, खते, कीटकनाशके...
परभणीत पीककर्जाच्या उद्दिष्टात ४८६...परभणी ः जिल्ह्यात चालू आर्थिक वर्षात (२०२१-२२)...
कोरोना रुग्णालयांचा वीज,  ऑक्सिजन...मुंबई : अरबी समुद्रातील तौक्ते चक्रीवादळामुळे...
मॉन्सूनपूर्व कामांना प्राधान्य द्यावे ः...भंडारा : मॉन्सून कालावधीत अचानक उद्‌भवणाऱ्या...
कोरोनाचे नियम पाळून  बाजार समित्या सुरू...नाशिक : जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव...
नगर जिल्ह्यात खरीपपूर्व मशागतीच्या...नगर : एकीकडे कोरोनाचे सावट असताना ग्रामीण भागातील...
लोहा, माहूर तालुक्यांना विम्याची रक्कम...नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत खरीप...