agriculture news in marathi, vasantdada sugar factory agreement issue | Page 2 ||| Agrowon

वसंतदादा कारखाना भाडेकरार दुरुस्तीकडे लक्ष

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

सांगली : वसंतदादा कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्याच्या कराराच्या दुरुस्तीकडे जिल्हा बँक वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सोमवारपर्यंत करारातील काही त्रुटी दुरुस्त केल्या जाणार असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, श्री दत्त इंडियाने जमा केलेले ६० कोटी रुपये हे अनामत रक्कम म्हणून न ठेवता कारखान्याच्या कर्ज खात्याला वर्ग करण्यास दत्त इंडियाने संमती द्यावी, अशी दुरुस्ती व्हावी यासाठी जिल्हा बँकेचे संचालक मंडळ विशेष आग्रही आहे.

सांगली : वसंतदादा कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्याच्या कराराच्या दुरुस्तीकडे जिल्हा बँक वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सोमवारपर्यंत करारातील काही त्रुटी दुरुस्त केल्या जाणार असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, श्री दत्त इंडियाने जमा केलेले ६० कोटी रुपये हे अनामत रक्कम म्हणून न ठेवता कारखान्याच्या कर्ज खात्याला वर्ग करण्यास दत्त इंडियाने संमती द्यावी, अशी दुरुस्ती व्हावी यासाठी जिल्हा बँकेचे संचालक मंडळ विशेष आग्रही आहे.

भाडेकरारातील प्रमुख त्रुटींकडे काही संचालकांनी लक्ष वेधले आहे. दत्त इंडियाने कारखान्याच्या वतीने केलेल्या खर्चाची तसेच दिलेल्या देण्याची भरपाई करण्याची जबाबदारी बँक व कारखाना या दोघांवरही टाकलेली आहे. ते चुकीचे आहे. बँकेचा संबंध फक्‍त कर्ज वसुल करण्यापुरता आहे. दत्त इंडियाने केलेल्या इतर खर्चाला तसेच कारखान्याची इतर देणी फेडली असल्यास त्याची भरपाई दत्त इंडियाला द्यायला फक्‍त कारखानाच जबाबदार असला पाहिजे, असा पवित्रा बँकेच्या संचालकांनी घेतला आहे.

.. तर बँकेची येणे वसुली अवघड?
भाडे करारानुसार जिल्हा बँकेची वसुली भाड्याच्या रकमेतून करायची आहे. मात्र, या भाड्यातून इतर रकमाही वसूल करण्याचा अधिकार दत्त इंडियाला दिला आहे. अशा परिस्थितीत बँकेचे येणे वसूल होणे कठीण आहे. दत्त इंडियाने कारखान्याच्या वतीने ४० कोटींपेक्षा जास्त रक्कम खर्च केलेली आहे. या रकमेतून २०१७-१८ चे भाडे वसूल केल्यावरही २७.९६ कोटी रुपये बँक व कारखाना दत्त इंडियाला देणे लागतात, हा सारा प्रकार बँकेला अडचणीत आणणारा आहे. त्यामुळे करारातील त्रुटींची दुरुस्ती होणे अत्यंत आवश्यक आहे, असेही एका संचालकांनी सांगितले.

वकिलांचा सल्ला दुर्लक्षिला !
भाडेकराराच्या मसुद्यात दुरुस्ती करण्यासंदर्भात बँकेच्या वकिलांनी सुचविले होते. मात्र त्या दुरुस्त्या केलेल्या नाहीत. दत्त इंडिया यांनी बँकेकडे बिनव्याजी ६० कोटी रुपये ठेव ठेवायची होती. मात्र ही ठेव कर्जदार कारखान्याने परत देण्याबाबत चर्चा झाली होती. बँकेच्या वकिलांनी तसे स्पष्ट केले होते. वकिलांचा सल्ला का दुर्लक्षिला, असा सवालही बँकेच्या एका संचालकांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, भाडेकरारातील त्रुटी दुरुस्त करण्याचे ठरले आहे. त्रुटी दुरुस्त होणे बँकेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे, असेही संचालकांनी सांगितले.


इतर ताज्या घडामोडी
शाश्‍वत कापूस उत्पादन तंत्रज्ञान अवगत...अकोला ः कापूस हे विदर्भातील प्रमुख पीक आहे. या...
अकोल्यात ५५ हजार हेक्टरला तडाखाअकोला ः गेल्या आठवड्यात जिल्ह्यात ५२ पैकी ३५...
रत्नागिरीत हजार हेक्टर भातक्षेत्र...रत्नागिरी : अतिवृष्टीमुळे मोठ्या नद्यांना आलेल्या...
सांगलीत ३३ हजार हेक्टर पिकांचे नुकसानसांगली : जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून...
खानदेशात पंधरा हजार हेक्टर बाजरीची...जळगाव : खानदेशात यंदा पाऊस लांबल्याने आणि...
नाशिक बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचे...नाशिक : नाशिक बाजार समितीसंदर्भात शासनाकडे...
खानदेशात हलक्या सरी; जोरदार पावसाचा अभावजळगाव : खानदेशात यंदा पाऊसमान अद्याप कमी आहे....
नांदेड जिल्ह्यात पीकविमा योजनेत नऊ लाख...नांदेड : पंतप्रधान पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी...
मराठवाड्यातील पशुविज्ञान केंद्राचे घोडे...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदेने महाराष्ट्र...
परभणी जिल्ह्यात भाजीपाला पिकांची नासाडीपरभणी ः अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेकडो एकरवरील...
पैसे थकवणाऱ्या व्यापाऱ्यांचे लिलाव बंद...सोलापूर ः शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या पट्ट्या...
पुण्यात लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या पुणे : जिल्ह्यात जुलै महिन्याच्या तिसऱ्या...
पीकविम्यासाठी स्वाभिमानीचा कृषी...पुणे : पीकविमा योजनेतील गेल्या खरिपाची नुकसान...
नगरमध्ये खरीप पेरण्यांनी सरासरी ओलांडली नगर : नगर जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्यांनी सरासरी...
`लातूरला शेतकऱ्यांनी भरला २३ कोटीचा...लातूर : ‘‘पंतप्रधान खरीप पीक विमा २०२१...
नियमित कर्जदार शेतकऱ्यांना  मिळणार...गोंदिया : राज्य सरकारने नियमित कर्ज परतफेड...
सातारा : पाच हजार हेक्टर क्षेत्र ...सातारा : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या...
सांगलीतील पूर ओसरू लागला  सांगली : कृष्णा नदीला आलेल्या महापुराचा सांगली...
सिंधुदुर्गमध्ये नुकसानीचे पंचनामे सुरू सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या...
पुराचा वारंवार फटका बसणाऱ्या घरांच्या...सांगली : ज्या भागातील घरांना आणि रहिवाशांना...