agriculture news in marathi, vasantdada sugar factory agreement issue | Page 3 ||| Agrowon

वसंतदादा कारखाना भाडेकरार दुरुस्तीकडे लक्ष

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

सांगली : वसंतदादा कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्याच्या कराराच्या दुरुस्तीकडे जिल्हा बँक वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सोमवारपर्यंत करारातील काही त्रुटी दुरुस्त केल्या जाणार असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, श्री दत्त इंडियाने जमा केलेले ६० कोटी रुपये हे अनामत रक्कम म्हणून न ठेवता कारखान्याच्या कर्ज खात्याला वर्ग करण्यास दत्त इंडियाने संमती द्यावी, अशी दुरुस्ती व्हावी यासाठी जिल्हा बँकेचे संचालक मंडळ विशेष आग्रही आहे.

सांगली : वसंतदादा कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्याच्या कराराच्या दुरुस्तीकडे जिल्हा बँक वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सोमवारपर्यंत करारातील काही त्रुटी दुरुस्त केल्या जाणार असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, श्री दत्त इंडियाने जमा केलेले ६० कोटी रुपये हे अनामत रक्कम म्हणून न ठेवता कारखान्याच्या कर्ज खात्याला वर्ग करण्यास दत्त इंडियाने संमती द्यावी, अशी दुरुस्ती व्हावी यासाठी जिल्हा बँकेचे संचालक मंडळ विशेष आग्रही आहे.

भाडेकरारातील प्रमुख त्रुटींकडे काही संचालकांनी लक्ष वेधले आहे. दत्त इंडियाने कारखान्याच्या वतीने केलेल्या खर्चाची तसेच दिलेल्या देण्याची भरपाई करण्याची जबाबदारी बँक व कारखाना या दोघांवरही टाकलेली आहे. ते चुकीचे आहे. बँकेचा संबंध फक्‍त कर्ज वसुल करण्यापुरता आहे. दत्त इंडियाने केलेल्या इतर खर्चाला तसेच कारखान्याची इतर देणी फेडली असल्यास त्याची भरपाई दत्त इंडियाला द्यायला फक्‍त कारखानाच जबाबदार असला पाहिजे, असा पवित्रा बँकेच्या संचालकांनी घेतला आहे.

.. तर बँकेची येणे वसुली अवघड?
भाडे करारानुसार जिल्हा बँकेची वसुली भाड्याच्या रकमेतून करायची आहे. मात्र, या भाड्यातून इतर रकमाही वसूल करण्याचा अधिकार दत्त इंडियाला दिला आहे. अशा परिस्थितीत बँकेचे येणे वसूल होणे कठीण आहे. दत्त इंडियाने कारखान्याच्या वतीने ४० कोटींपेक्षा जास्त रक्कम खर्च केलेली आहे. या रकमेतून २०१७-१८ चे भाडे वसूल केल्यावरही २७.९६ कोटी रुपये बँक व कारखाना दत्त इंडियाला देणे लागतात, हा सारा प्रकार बँकेला अडचणीत आणणारा आहे. त्यामुळे करारातील त्रुटींची दुरुस्ती होणे अत्यंत आवश्यक आहे, असेही एका संचालकांनी सांगितले.

वकिलांचा सल्ला दुर्लक्षिला !
भाडेकराराच्या मसुद्यात दुरुस्ती करण्यासंदर्भात बँकेच्या वकिलांनी सुचविले होते. मात्र त्या दुरुस्त्या केलेल्या नाहीत. दत्त इंडिया यांनी बँकेकडे बिनव्याजी ६० कोटी रुपये ठेव ठेवायची होती. मात्र ही ठेव कर्जदार कारखान्याने परत देण्याबाबत चर्चा झाली होती. बँकेच्या वकिलांनी तसे स्पष्ट केले होते. वकिलांचा सल्ला का दुर्लक्षिला, असा सवालही बँकेच्या एका संचालकांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, भाडेकरारातील त्रुटी दुरुस्त करण्याचे ठरले आहे. त्रुटी दुरुस्त होणे बँकेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे, असेही संचालकांनी सांगितले.


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात चौतीस हजार लशी आल्यासोलापूर: ‘‘ जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोविड...
तिथवलीत स्ट्रॉबेरी उत्पादनसिंधुदुर्ग ः मल्चिंग, ठिबंक सिंचनाचा वापर करीत...
सांगली जिल्ह्यात नोंदणीसाठी सातबारा...सांगली : तुरीचा हंगाम संपत आला तरी सांगली बाजार...
कृषी, ग्रामविकासावर आधारित प्रमाणपत्र...नाशिक : ‘‘कृषी व पूरक व्यवसाय, ग्रामविकास, रोजगार...
बारदान्याअभावी धानाची खरेदी रामटेक...नागपूर ः रामटेक तालुक्‍यात फेडरेशनच्या माध्यमातून...
जळगाव जिल्ह्यात ‘बर्ड फ्लू’ नाही जळगाव : परभणी जिल्ह्यात आढळून आलेल्या ‘बर्ड फ्लू...
वर्धा जिल्ह्यात सावकारांचे शेतकऱ्यांवर...वर्धा ः हंगामात बॅंकाकडून पीककर्जाच्या बाबतीत...
मराठवाड्यात आज ग्रामपंचायतींसाठी मतदानऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४१३३ ग्रामपंचायतीसाठी आज...
औरंगाबाद जिल्ह्यात ‘बर्ड फ्लु’चा नाही...औरंगाबाद: ‘‘जिल्ह्यात अद्याप ‘बर्ड फ्लू’या रोगाचा...
नगर जिल्ह्यात तूर विक्रीसाठी दहा...नगर ः हमी दराने तुरीची विक्री करण्यासाठी...
नेर तलावातून गळतीविसापूर, जि. सातारा : खटाव तालुक्‍याला वरदान...
‘बर्ड फ्लू’बाबत जागरूक राहापक्ष्यांमध्ये अनेकदा बर्ड फ्लूचा संसर्ग...
कृषी सल्ला (आंबा, काजू, नारळ, सुपारी,...प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून...
राज्यात बटाटा १००० ते २६०० रुपयेऔरंगाबादमध्ये क्विंटलला १००० ते १२५० रुपये...
विकासकामाच्या जोरावर ब्रम्हपुरीला `...  ब्रम्हपुरी ग्रामपंचायतीला आयएसओ...
शेती विकासासाठी स्मार्ट प्रकल्प, शेतकरी...राज्यात जागतिक बँक अर्थसाह्याने “मा. बाळासाहेब...
उत्तर भारतातील सखल भागात थंडीची लाट नवी दिल्ली : उत्तर भारतातील सखल भागात येत्या चार...
जळगाव ‘जि.प.’त विहीर, सूक्ष्मसिंचन...जळगाव ः जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे विहीर...
शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करू ः भुसेनाशिक : जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे द्राक्ष...
मुरुंब्यात कुक्कुटपालकांवर संकट परभणी ः सतत दुष्काळी स्थितीला सामोरे जात असलेल्या...