पुणे जिल्ह्यात वसुबारस उत्साहात

दिवाळी सणाचा पहिला दिवस म्हणजे वसु बारस आज गुरुवारी (ता. १२) वसुबारसेनिमित्त गाय-वासराची पूजा करण्यात आली.
Vasubaras celebration in Pune district
Vasubaras celebration in Pune district

पारगाव, जि. पुणे : दिवाळी सणाचा पहिला दिवस म्हणजे वसु बारस आज गुरुवारी (ता. १२) वसुबारसेनिमित्त गाय-वासराची पूजा करण्यात आली.

दिवाळीच्या सणाची सुरुवात वसुबारस या दिवसापासून होते. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. भारतीय संस्कृतीत गायीला अनन्य साधारण महत्त्व आहे. ‘ज्याच्या घरी गाय तिथे विठ्ठलाचे पाय’ असे संतवचन प्रसिद्ध आहे. यातूनच गायीचे महत्त्व अधोरेखित होते.

वसुबारस हा गाय आणि वासराप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. ग्रामीण भागात या दिवसाला विशेष महत्त्व असते. वसुबारसेच्या दिवशी महिला जनावरांचा गोठा स्वच्छ धुऊन शेणाने सारवून घेतात. वसुबारसेला गायीला सजविले जाते. गळ्यात फुलांच्या माळा घातल्या जातात. घरातील महिला गायीला ओवाळून पुरणपोळीचा नैवेद्य खायला देतात.

अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील संजय जयसिंगराव हिंगे पाटील यांनी गोठ्यात खास करून देशी गायी व बैल यांचे संगोपन केले आहे. त्यांच्या घरी गाय-वासराची पूजा करून वसुबारस मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com