agriculture news in Marathi, vayu cyclone will Intense, Maharashtra | Agrowon

‘वायू’ चक्रीवादळ होणार तीव्र
टीम अॅग्रोवन
बुधवार, 12 जून 2019

पुणे : अरबी सुमद्रात केरळ आणि कर्नाटकच्या किनाऱ्यालगतच्या समुद्रात ‘वायू’ चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. हे चक्रीवादळी आणखी तीव्र होत असून, तर महाराष्ट्राच्या किनाऱ्याजवळून उत्तरेकडे गुजरातकडे सरकून जाणार आहे. उद्या (ता.१३) पहाटे गुजरातच्या पोरबंदर, माहुआ, वेरावळजवळ किनाऱ्याला धडकण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 

महाराष्ट्राच्या किनाऱ्याजवळून प्रवास करत असताना, समुद्र खवळून जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने कोकण किनारपट्टी, मुंबईत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.  

पुणे : अरबी सुमद्रात केरळ आणि कर्नाटकच्या किनाऱ्यालगतच्या समुद्रात ‘वायू’ चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. हे चक्रीवादळी आणखी तीव्र होत असून, तर महाराष्ट्राच्या किनाऱ्याजवळून उत्तरेकडे गुजरातकडे सरकून जाणार आहे. उद्या (ता.१३) पहाटे गुजरातच्या पोरबंदर, माहुआ, वेरावळजवळ किनाऱ्याला धडकण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 

महाराष्ट्राच्या किनाऱ्याजवळून प्रवास करत असताना, समुद्र खवळून जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने कोकण किनारपट्टी, मुंबईत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.  

मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता वायू चक्रीवादळ गोव्यापासून नैर्ऋत्येला ३५० किलोमीटर, मुंबर्इपासून नैर्ऋत्येकडे ५१०, तर  गुजरातच्या वेरावळपासून ६५० किलोमीटर दक्षिणेकडे हे वादळ घोंगावत होते. मंगळवारी रात्री उशिरा या वादळाचे तीव्र वादळात रूपांतर होईल, ताशी ११५ ते १३५ किलोमीटर वेगाने चक्राकार वारे वाहत असलेल्या वादळामुळे गुरुवारपर्यंत (ता. १३) महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत ताशी ५० ते ७० किलोमीटर वेगाने जोरदार वारे, उंच लाटा, मुसळधार पाऊस पडणार असल्याने सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. 

गुरुवारी (ता. १३) गुजरातच्या सौराष्ट्र आणि कच्छ भागात ‘रेड ॲलर्ट’ देण्यात आला आहे. वादळामुळे घरांची पडझड होणे, वीज आणि संदेशवहन यंत्रणा बंद पडणे, पूर येणे, झाडे, झाडाच्या फांद्या पडणे, केळी, पपई या पिकांसह किनारपट्टीय भागात असलेल्या उन्हाळी पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मासेमारी पूर्णपणे थांबवणे, किनाऱ्यालगतच्या नागरिकांचे स्थलांतर करणे, घराबाहेर न पडणे यांसह सर्तक राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मॉन्सूनला चाल मिळणार?
नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) सोमवारी (ता. १०) केरळमध्ये प्रगती करीत जवळपास संपूर्ण राज्य व्यापले आहे. बंगालच्या उपसागरात मोठा टप्पा गाठत ईशान्य भारतातील मिझोराम आणि मणिपूर राज्यापर्यंत मजल मारली आहे. मंगळवारी मॉन्सूनने आणखी प्रगती केली नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, ‘वायू’ चक्रीवादळाच्या प्रभावमुळे मॉन्सूनला किनारपट्टी भागात चाल मिळण्याची शक्यता आहे. गुरुवारपर्यंत (ता.१३) कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात पोचण्यास पोषक स्थिती असल्याचे हवामान शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. 

इतर अॅग्रो विशेष
पापड उद्योगातून मिळाले शेतीला आर्थिक बळकहाटूळ (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील आशा व...
बाजारपेठेनुसारच पीक लागवडीचे नियोजनआष्टा (ता. वाळवा, जि. सांगली) येथील सौ. मृदुला...
अमेरिकन लष्करी अळीची कपाशीवरही चाल ! (...नगर : अमेरिकन लष्करी अळीने (स्पोडोप्टेरा...
महाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला मतदान, २४ ला...नवी दिल्ली : महाराष्ट्रासह हरियाना राज्य...
नावीन्यपूर्ण संकल्पना रुजवीत यशस्वी...लासलगाव (जि. नाशिक) येथील शंतनू नानासाहेब पाटील...
औरंगाबाद रेशीम उपसंचालक कार्यालयाला...औरंगाबाद : मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद येथे...
कोकण कृषी विद्याठाकडून बांबूच्या २६...दाभोळ, जि. रत्नागिरी  : कोकणात व्यावसायिक...
नगर जिल्ह्यात तागावर स्पोडोप्टेरा अळीचा...नगर ः मक्यावर अमेरिकन लष्करी अळीने (स्पोडोप्टेरा...
पावसामुळे खानदेशात उडदाचे नुकसानजळगाव  ः सततच्या पावसामुळे खानदेशात उडदाचे...
नागपूर विभागात तीन गावे लष्करी अळीच्या...नागपूर ः राज्यभरात मक्‍यावरील अमेरिकन लष्करी...
राज्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरीपुणे ः  कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील...
श्रमशक्तीच्या जागरातून घडवूया समृद्ध...कितीही प्रगती झाली तरी मानवी जीवन, निसर्ग आणि...
शेतकऱ्यांच्या ‘महारोषा’चे काय?मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील...
खानदेशात लष्करी अळीकडून ४० टक्के मका...जळगाव  ः खानदेशात मका पिकावर अमेरिकन लष्करी...
नाशिक जिल्ह्यात मका लष्करी अळीच्या...नाशिक  : जिल्ह्यात यंदा अमेरिकन लष्करी अळीचा...
शेतकऱ्यांसाठी 'इर्मा' लागू करण्याचा...पुणे : राज्यात शेतकऱ्यांसाठी इर्मा अर्थात ‘‘इनकम...
दसरा-दिवाळीपर्यंत अभूतपूर्व 'कांदाटंचाई'पुणे : राज्यातील बाजार समित्यांत दोन दिवसांत...
कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची...पुणे : कर्नाटक, गोवा, अरबी समुद्र, कोकण आणि...
ठिकठिकाणी पावसाची हजेरीपुणे ः कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाल्याने...
पाच कीटकनाशकांवर अमरावती विभागात दोन...मुंबई : कीटकनाशकांच्या वापरामुळे शेतकरी व...