agriculture news in Marathi, Vayu cyclone will not inter in Gujrat, Maharashtra | Agrowon

गुजरातवरील ‘वायू' संकट तूर्त टळले
वृत्तसेवा
शुक्रवार, 14 जून 2019

अहमदाबाद/ नवी दिल्ली : गुजरात किनाऱ्याच्या दिशेने सुसाट वेगाने निघालेल्या ‘वायू' या चक्रीवादळाने दिशा बदलली असून, ते आता गुजरातला धडकण्याची शक्‍यता कमीच असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. तूर्तास जरी हे वायू संकट टळले असले, तरीसुद्धा राज्य सरकारने मात्र त्याचा धोका कायम असल्याचे म्हटले आहे.

अहमदाबाद/ नवी दिल्ली : गुजरात किनाऱ्याच्या दिशेने सुसाट वेगाने निघालेल्या ‘वायू' या चक्रीवादळाने दिशा बदलली असून, ते आता गुजरातला धडकण्याची शक्‍यता कमीच असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. तूर्तास जरी हे वायू संकट टळले असले, तरीसुद्धा राज्य सरकारने मात्र त्याचा धोका कायम असल्याचे म्हटले आहे.

राज्य सरकारने किनारी भागातील तीन लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलविले असून, किनारी भागातील विमानतळेही बंद करण्यात आली असून, रेल्वे गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. राज्यात हायऍलर्ट जारी करण्यात आला असून, तो शुक्रवारपर्यंत कायम राहणार असल्याचे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले. मध्यंतरी या चक्रीवादळाने खूप उग्र रूप धारण केले होते, यामुळे गुरुवारी दुपारी गुजरात किनाऱ्यावर सोसाट्याच्या वाऱ्यासह तीव्र अतिवृष्टी होण्याची शक्‍यता वर्तविली जात होती.

किनाऱ्याला स्पर्श
हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार हे वादळ वेरावेलपासून दीडशे किलोमीटर अंतरावर असून, ते आता उत्तर आणि वायव्य दिशेकडे वळेल, ते सौराष्ट्राच्या किनाऱ्याला घासून जाईल. या वादळाची दिशा हळूहळू बदलत असल्याचे अहमदाबादेतील हवामान केंद्राचे अतिरिक्त संचालिका मनोरमा मोहंती यांनी सांगितले. हे वादळ आता सौराष्ट्राच्या किनाऱ्याला धडकणार नसून गीर सोमनाथ, जुनागढ, पोरबंदर, देवभूमी द्वारका हे जिल्हे आणि दिवू या केंद्रशासित प्रदेशाला याचा फटका बसणार आहे.

समांतर वाटचाल
हे सगळे वादळ गुजरातमध्ये शिरणार नाही, पण अर्ध्या भागाचा किनारी भागाला फटका बसेल, अतिवृष्टीचा धोका लक्षात घेऊन मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असेही हवामान खात्याने म्हटले आहे. किनारी भागांत या वादळाचा वेग दुपारपर्यंत हा १५५-१४६ कि.मी प्रतितास ते १८० किलोमीटर प्रतितास एवढा राहण्याची शक्‍यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. हे वादळ समुद्रामध्ये राहणार असून, त्याची वाटचाल गुजरात किनाऱ्याला समांतर अशी होईल.

तीव्रता कमी नाहीच
वादळाचा मुख्य केंद्रबिंदू हा किनाऱ्याला धडकण्याची शक्‍यता कमीच असली, तरीसुद्धा त्याची तीव्रता मात्र काही कमी झालेली नाही, त्यामुळे राज्य सरकारने संपूर्ण तयारी केली असल्याचे राज्याचे महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव पंकजकुमार यांनी सांगितले. पुढील ४८ तास हे राज्यासाठी महत्त्वाचे असतील, असेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, वादळामुळे अद्याप कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही. 

इतर अॅग्रो विशेष
दुष्काळामुळे द्यावा लागणार पाणी...पुणे ः सततच्या दुष्काळामुळे आता पाणी...
पीक पोषणात महत्त्वाची अन्नद्रव्ये पिकांच्या सुदृढ वाढीसाठी १८ अन्नद्रव्यांची...
मिल्क केक बनविण्याची प्रक्रियामिल्क केक हा दिसायला कलाकंदप्रमाणे असला तरी...
मराठवाड्यात ठिकठिकाणी हलक्या ते जोरदार...पुणे ः राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार...
सोयाबीनवरील कीडीची ओळख सोयाबीन हे राज्यातील महत्त्वाचे पीक असून, त्यावर...
नांदेड जिल्ह्यात अन्नधान्य पिकांच्या...नांदेड : जिल्ह्यात गुरुवारपर्यंत (ता. १८) ६ लाख...
एकाच गावातील ७५० एकरांत ७५०० कामगंध...जालना : गतवर्षी नियंत्रण मिळविलं म्हणून कपाशीवरील...
जलसंधारणाचा खामगाव पॅटर्न देशभरात जाणारअकोला ः राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना त्यासाठी...
कृत्रीम शीतपेयांना शोधला कोकणी नैसर्गिक...कोकणातील निसर्गरम्य कोळथर (ता. दापोली, जि....
फुलांनी आणला आयुष्यात बहर, अॅग्रोवनची...पुणे जिल्ह्यात रुई येथील सुहास लावंड यांनी...
जलव्यवस्थापनातील हुशारीतून फुलतेय ...दुष्काळाशी लढताना औरंगाबाद जिल्ह्यातील गाढेजळगाव...
दुष्काळातही कडवंची गावच्या अर्थकारणाची...भूगर्भीय सर्वेक्षण आधारित पाणलोटाची कामे, मृद...
मातीची सुपीकता टिकविणे आव्हानात्मक: डॉ...कोल्हापूर : कोल्हापूर विभागात मातीची सुपीकता...
साखर कारखान्यांना कर्ज न देणाऱ्या...मुंबई: आगामी हंगामासाठी साखर कारखान्यांना...
कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्याचा करारअकोला ः  केंद्र शासनाची पंतप्रधान कौशल्य...
जीवनावश्‍यक वस्तू कायद्यावर प्रश्‍नचिन्हनवी दिल्ली: जीवनावश्‍यक वस्तू कायद्याची आवश्यकता...
जनतेचा पैसा जनतेच्याच भल्यासाठीतत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९ जुलै...
कृत्रिम पाऊस : गप्पा अन् गांभीर्यमागील पावसाळ्यातील कमी पावसामुळे राज्यात भीषण...
पेरणीने ओलांडली पन्नाशीः डाॅ. अनिल बोंडेमुंबई: राज्यात खरिपाची ८०.६१ लाख हेक्टर...
दोषी आढळल्यास विमा कंपन्यांवर गुन्हेः...कोल्हापूर: विमा कंपन्या शेतकऱ्यांना लाभ देण्यास...