Agriculture news in Marathi, Vegetable arrivals and demand are general | Agrowon

गुलटेकडीत भाजीपाल्याची आवक आणि मागणी सर्वसाधारण
टीम अॅग्रोवन
सोमवार, 14 ऑक्टोबर 2019

पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १३) भाजीपाल्याची सुमारे १६० ट्रक आवक झाली होती. पालेभाज्यामध्ये कोथिंबिरीची सुमारे दीड लाख, तर मेथीची सुमारे २५ हजार जुड्यांची आवक झाली होती. सर्वच भाजीपाल्याची आवक, मागणी आणि दर सर्वसाधारण होती. 

पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १३) भाजीपाल्याची सुमारे १६० ट्रक आवक झाली होती. पालेभाज्यामध्ये कोथिंबिरीची सुमारे दीड लाख, तर मेथीची सुमारे २५ हजार जुड्यांची आवक झाली होती. सर्वच भाजीपाल्याची आवक, मागणी आणि दर सर्वसाधारण होती. 

विविध भाजीपाल्याच्या आवकेमध्ये परराज्यांतून आंध्र प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक आणि गुजरात येथून सुमारे १५ टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक आणि गुजरात येथुन ५ ट्रक कोबी, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून शेवगा सुमारे ३ टेम्पो, कर्नाटकातून श्रावणी घेवडा सुमारे २ टेम्पो, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून लसणाची सुमारे ५ हजार गोणी तर आग्रा आणि इंदूर येथून बटाटा सुमारे ५० ट्रक आवक झाली होती. 

महाराष्ट्राच्या विविध भागांतून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे १ हजार ५०० गोणी, टॉमेटो सुमारे ५ हजार क्रेट, कोबी, फ्लॉवर, सिमला मिरची, भेंडी, तांबडा भोपळा (डांगर) प्रत्येकी सुमारे १० ते १२ टेम्पो, गवार सुमारे ५ टेम्पो, काकडी १५ टेम्पो, भुईमूग शेंग सुमारे २०० गोणी, हिरवी मिरची ३ टेम्पो, मटार १०० गोणी तसेच कांदा सुमारे ११० ट्रक आवक झाली होती. 

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव 
: कांदा : २५०-३२०, बटाटा : १२०-१७०, लसूण : १२००-१९००, आले : सातारी ४००-६५०, भेंडी : २००-३००, गवार : ३००-५००, टोमॅटो : २००-३००, दोडका : २००-२५०, हिरवी मिरची : १५०-२५०, दुधी भोपळा : १८०-२००, चवळी : २००-२५०, काकडी : ६०-१००, कारली : हिरवी १८०-२००, पांढरी १४०-१५०, पापडी : २५०-३००, पडवळ : २००-२५०, फ्लॉवर : १००-१४०, कोबी : १००-१४०, वांगी : २००-३५०, डिंगरी : २००-२५०, नवलकोल : १००-१२०, ढोबळी मिरची : २५०-३००, तोंडली : कळी ३००-३५०, जाड : १००-१२०, शेवगा : ३००-५००, गाजर : २००-३००, वालवर : ३००-३५०, बीट : १४०-१६०, घेवडा : ५००-५५०, कोहळा : १००-१५०, आर्वी : ३००- ३५०, घोसावळे : २००-२२०, ढेमसे : २००-२५०, पावटा : २५०-३००, भुईमूग शेंग : ४००- ४५०, मटार : ७००-११००, तांबडा भोपळा : १००-१५०, सुरण : २४०-,२५० मका कणीस : ६०-१२०, नारळ (शेकडा) : १०००-१६००. 

पालेभाज्या 
पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : ८०० -१७००, मेथी : १५००-१८००, शेपू : २००-४००, कांदापात : १००० -१५००, चाकवत : ८०० -१०००, करडई : ७०० -८००, पुदिना : २०० -३००, अंबाडी : ८००-१०००, मुळे : १०००-१८००, राजगिरा : ५०० -६००, चुका : १०००-१२००, चवळई : ५०० -७००, पालक : १००० -१४००. 

फुलबाजार
फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : ५-१०, बिजली : २०-४०, कापरी : १०-२०, शेवंती : २०-४०, अ‍ॅस्टर : ५-१०, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : ५-१५, गुलछडी काडी : १०-३०, डच गुलाब (२० नग) : ४०-६०, लिली बंडल : २-३, जरबेरा : ३०-५०, कार्नेशियन : ६०-१२०. 

फळबाजार 
रविवारी (ता. १३) येथील फळ विभागात मोसंबी सुमारे ७० टन, संत्री ८ टन, डाळिंब २०० टन, कलिंगड २५ टेम्पो, खरबूज ५ टेम्पो, पपई २५ टेम्पो, लिंबे सुमारे तीन हजार गोणी, पेरू ३० क्रेटस, चिकू एक हजार डाग, तर सीताफळाची १५ टन आवक झाली होती. तर विविध बोरांचा हंगाम सुरू झाला असून, विविध बोरांची सुमारे १०० गोणी आवक झाली होती.  

फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : २००-५००, मोसंबी : (३ डझन) : २२०-४२०, (४ डझन ) : ८०-२००, संत्रा : (३ डझन) : १५०-३००, (४ डझन ) : ५०-१३०, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : ३०-१६५, गणेश : १०-३५, आरक्ता १५-५५. कलिंगड : ५-१०, खरबूज : १०-३०, पपई : १०-३०, चिकू : १००-६००, पेरू (२० किलो) : १२००-१५००, सीताफळ : ३०-१५०, सफरचंद : सिमला (२५ ते ३० किलो) १७००-२२००, किन्नोर : २०००-३०००, काश्मीर डेलिशिअस (१५ ते १६ किलो) ८००-१५००, अमेरिकन (१५ किलो) ११००-१५००, पिअर (१५ किलो) ९००-१२००. बोरे - चेकनट -(१ किलो) ८०-९० चमेली (१० किलो) २५०-३५०, उमराण - २२०-२५०, चण्यामण्या - ४५०.

मासळी बाजार 
नवरात्रोत्सव संपल्याने मासळीला मागणी वाढली असून, आवकही चांगली असल्याने मासळीचे दर गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर होते. गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (ता. १३) खोल समुद्रातील मासळीची सुमारे ७ टन, खाडीची ३०० किलो तर नदीच्या मासळीची सुमारे ४०० किलो आवक झाली होती. तर आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे ८ टन आवक झाली होती.

खोल समुद्रातील मासळी
(प्रतिकिलोचे भाव)  पापलेट : कापरी : १६००, मोठे १४००, मध्यम : ८००-९००, लहान ६००-६५०, भिला : ४००-५००, हलवा : ५५०, सुरमई : ५००-५५०, रावस : ५००-५५०, घोळ : ४८०, भिंग : २८०, करली : ३२०, करंदी : २८०, पाला :  लहान -७००,  मोठे - ११००, वाम : लहान  पिवळी ४००-४८० , मोठे  ६००,  काळी : ३२०-४००, ओले बोंबील : ८०-१६०, 

कोळंबी 
लहान  १६०-२०० मोठे  ४००-४८०, जंबो प्रॉन्स : १४००, किंग प्रॉन्स : ८००, लॉबस्टर : १३००, मोरी : २४०, मांदेली : १२०, राणीमासा : १६०-२००, खेकडे : २००, चिंबोऱ्‍या : ४८०-५५०. 

खाडीची मासळी 
सौंदाळे : २४०, खापी : १६०-२००, नगली : ३२०, तांबोशी : ४००-४४०, पालू : २८०, लेपा :  लहान १२०-१४० मोठे  २००, शेवटे : २४०, बांगडा : लहान  १४०-१६० मोठे  २४०, पेडवी : ८०, बेळुंजी : १००-१४०, तिसऱ्या : १६०, खुबे : १४०, तारली : १२०-१४०. 

नदीची मासळी  
रहू : १४०, कतला : १६०, मरळ : ३२०, शिवडा : २४०, चिलापी : ८०, खवली : २४०, आम्ळी : १२०, खेकडे : २०० वाम : ५२०. 

मटण : 
बोकडाचे : ५००, बोल्हाईचे : ५००, खिमा : ५००, कलेजी : ५८०. 

चिकन : 
चिकन : १४०, लेगपीस : १७०, जिवंत कोंबडी : ११०, बोनलेस : २४०. 

अंडी : 
गावरान : शेकडा : ७२० डझन : ९६ प्रतिनग : ८. इंग्लिश : शेकडा : ४५७ डझन : ६० प्रतिनग : ५.

इतर बाजारभाव बातम्या
नगरमध्ये टोमॅटो ५०० ते २००० रुपये...नगर : नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता...
सोयाबीन, मका, गव्हाचे दर स्थिर; बाजरीत...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीला १३०० ते २५००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
कळमणा बाजारात सोयाबीन दरात घसरणनागपूर : गेल्या आठवड्यात सुधारलेल्या सोयाबीनच्या...
पुण्यात हिरवी मिरची, गाजराच्या दरात वाढपुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादमध्ये कोबी १००० ते १८०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे बाजार समितीत स्थानिक नव्या...पुणे  ः पावसामुळे बटाट्याचे आगार असलेल्या...
परभणीत भेंडी २००० ते ३५०० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
दक्षिण आफ्रिकेतील हापूस आंबा सांगलीतसांगली : आंब्याचा हंगाम सुरू होण्यास अद्याप...
राज्यात लसूण ४२०० ते २० हजार रूपये...सांगलीत ४२०० ते १५००० रुपये सांगली : येथील...
दौंड बाजार समितीत ज्वारीला ४३०० रुपये दरदौंड, जि. पुणे : दौंड बाजार समितीमध्ये ज्वारीची...
नाशिकमध्ये ढोबळी मिरची ३२५० ते ६२५०...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ढोबळी...
जळगावात कोबी १८०० ते ३००० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...
सोलापुरात टोमॅटो, वांग्याच्या दरात तेजीसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
जळगाव बाजारात केळीची आवक रखडतजळगाव ः जिल्ह्यात केळीची आवक रखडतच सुरू असून,...
कळमणा बाजारात सोयाबीनची आवक आणि दरातही...नागपूर ः येथील कळमणा बाजार समितीत नव्या सोयाबीनची...
गुलटेकडीत फ्लॉवर, वांगी, गाजराच्या दरात...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणी, हिंगोली जिल्ह्यांत ६१४ क्विंटल...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात किंमत...
औरंगाबादेत फ्लॉवर १४०० ते २५०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत भुईमूग शेंग ३५०० ते ५००० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...