Agriculture news in Marathi Vegetable arrivals and rates in Pune remain stable | Agrowon

पुण्यात भाजीपाल्याची आवक आणि दर स्थिर

टीम अॅग्रोवन
सोमवार, 9 मार्च 2020

पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. ८) भाजीपाल्याची सुमारे १६० ट्रक आवक झाली होती. सर्वच भाजीपाल्याची आवक आणि मागणी स्थिर असल्याने दरदेखील स्थिर होते.

पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. ८) भाजीपाल्याची सुमारे १६० ट्रक आवक झाली होती. सर्वच भाजीपाल्याची आवक आणि मागणी स्थिर असल्याने दरदेखील स्थिर होते.

परराज्यातून झालेल्या आवकेमध्ये आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटक येथून हिरवी मिरची सुमारे १२ टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून शेवगा सुमारे ५ टेम्पो, कर्नाटक येथून घेवडा ५ टेम्पो, राजस्थानातून ८ ट्रक गाजर, कर्नाटक आणि गुजरात येथून कोबी सुमारे ४ ट्रक, मध्य प्रदेशातून मटार सुमारे १० ट्रक, कर्नाटकातून तोतापुरी कैरी ५० गोणी, गुजरातमधून भुईमूग शेंगा सुमारे ७० गोणी, मध्य प्रदेशातून लसणाची सुमारे ६ हजार गोणी, गुजरात, इंदौर आणि स्थानिक बटाट्याची सुमारे ३० ट्रक आवक झाली होती. तर स्थानिक आवकेमध्ये सातारी आले सुमारे ८०० पोती, टॉमेटो सुमारे ६ हजार क्रेट, भेंडी, काकडी, फ्लॉवर, सिमली मिरची आणि तांबडा भोपळा प्रत्येकी सुमारे ८ ते १० टेम्पो, गवार ७ टेम्पो, कोबी १० टेम्पो, हिरवी मिरची ५ टेम्पो, पावटा ५ टेम्पो, मटार १०० गोणी, कांदा सुमारे १५० ट्रक आवक झाली होती. 

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव : कांदा : १६०-२२०, बटाटा : १३०-१९०, लसूण : ४००-७००, आले : सातारी ३५०-४००, भेंडी : २००-३००, गवार : गावरान - सुरती ३००-५००, टोमॅटो : ४०-६०, दोडका : १५०-२५०, हिरवी मिरची : २००-४००, दुधी भोपळा : ६०-१२०, चवळी : १५०-२००, काकडी : ८०-१००, कारली : हिरवी १५०-२००, पांढरी: १००-१२०, पापडी : १००-१२०, पडवळ : १८०-१६०, फ्लॉवर : ०५-८०, कोबी : २०-४०, वांगी : १००-२००, डिंगरी : १४०-१५०, नवलकोल : ७०-८०, ढोबळी मिरची : २००-२५०, तोंडली : कळी १८०-२००, जाड : ९०-१००, शेवगा : २००-२५०, गाजर : १२०-१६०, वालवर : १००-१४०, बीट : ५०-६०, घेवडा : १३०-१५०, कोहळा : १५०-२००, आर्वी : ३००-३५०, घोसावळे : १५०-१६०, ढेमसे : २००-२२०, पावटा : २५०-३००, भुईमूग शेंग : ५००-७००, मटार : परराज्य २२०-२६०, स्थानिक - ३२०-३५०, तांबडा भोपळा : १००-१५०, सुरण : २००-२२०, मका कणीस : ६०-१२०, नारळ (शेकडा) : १०००-२०००. 

पालेभाज्या 
पालेभाज्यांमध्ये रविवारी (ता. ८) कोथिंबिरीची सुमारे पावणेदोन लाख, मेथीची सुमारे एक लाख जुड्यांची आवक झाली होती. 
पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : ५००-१२००, मेथी : २००-५००, शेपू : ५००-८००, कांदापात : ५०० -८००, चाकवत : ५००-८००, करडई : ४००-५००, पुदिना : १००-२००, अंबाडी : ५००-८००, मुळे : ५००- ८००, राजगिरा : ४००-५००, चुका : ५००-८००, चवळई : ४००-६००, पालक : ३००-५००. हरभरा गड्डी -५००-८००

फळबाजार 
रविवारी (ता. ८) येथील बाजारात मोसंबी ६० टन, संत्री सुमारे ४० टन, डाळिंब ४० टन, पपई १५ टेम्पो, लिंबे सुमारे २ हजार गोणी, कलिंगड ३० टेम्पो, खरबुज १५ टेम्पो, द्राक्षे सुमारे ४० टन, पेरु १ हजार क्रेट, चिक्कू ३ हजार डाग, स्ट्रॉबेरी सुमारे ६ टन आवक झाली होती. 
फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रति गोणी) : २००-३००, मोसंबी : (३ डझन) : ८०-२००, (४ डझन ) : २०-७०, संत्रा : (३ डझन) : ९०-२५०, (४ डझन) : ३०-१२०, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : ४०-२००, गणेश : १०-४०, आरक्ता २५-७०. कलिंगड : ५-१२, खरबुज : १०-२५, पपई : ५-२०, सफरचंद : काश्मीर डेलिशिअस (१५ ते १६ किलो) १०००-१४००, किन्नोर -(२५-३०) - २०००-२५००, सिमला (२५) -१६००-२०००, स्‍ट्रॉबेरी (२ किलो) - ६०-१००, द्राक्षे - सोनका (१५ किलो) - ६००-१०००, जम्बो - ८००-१३००, ताश ए गणेश - ५००-७००, माणिक चमण - ४५०-६००

फूलबाजार
फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : १०-३०, गुलछडी : ५०-१००, कापरी : १०-३०, शेवंती : ५०-८०, अ‍ॅस्टर : ८-१२, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : १०-२०, गुलछडी काडी : २०-५०, डच गुलाब (२० नग) : ५०-८०, लिलि बंडल : ३-५, जर्बेरा : १०-३०, कार्नेशियन : ५०-१००. मोगरा ३००-६००

मटण-मासळी
गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (ता. ८) खोल समुद्रातील मासळीची सुमारे ७ टन, खाडीची सुमारे २५० किलो तर नदीच्या मासळीची दीड टन आवक झाली होती. तर आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे १२ टन आवक झाली असल्याची माहिती व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली.

‘कोरोना’चा चिकन दरावर परिणाम
दरम्यान, कोरोना विषाणूबाबत समाजमाध्यमांवर गैरसमज पसरवले जात असल्याने चिकनची मागणी अद्याप घटलेलीच आहे. घटलेल्या मागणीचे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत असून, दर ४० रुपयांनी तर गावरान आणि इंग्लिश अंड्यांचे दर शेकड्यामागे ४० ते ५० रुपयांनी घटले आहेत. मटणाला मागणी कायम आहे, तरीही भाव स्थिर राहिले आहेत.

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे भाव) : 
पापलेट : कापरी : १५००, मोठे १५००, मध्यम : ९००-१०००, लहान ७५०-८००, भिला :  ७००, हलवा : ६००-६५०, सुरमई : ६००-७००, रावस : लहान ६५०,  मोठा : ८००, घोळ : ८००, भिंग : ४००, करली : ३२०, करंदी : ४००, पाला : लहान ७५० मोठे : १२००, वाम :  पिवळी लहान ७५०, मोठी ९००, काळी : ४००, ओले बोंबील : २००/२४०, 

कोळंबी ः लहान २८०, मोठे : ४८०, जंबोप्रॉन्स : १४००, किंगप्रॉन्स : ७५०, लॉबस्टर : १४००, मोरी : ३२०, मांदेली : १००-१४०, राणीमासा : १६०+२०० खेकडे : २४०, चिंबोऱ्या : ५५०. 

खाडीची मासळी : सौंदाळे : २८०-३२०, खापी : २८०+३२०, नगली : ४४०+४८०, तांबोशी : ४४०+४८०, पालू : २८०, लेपा : २४०, शेवटे : २८०, बांगडा : लहान २२०, मोठा २८०, पेडवी : ५०, बेळुंजी : १६०, तिसऱ्या : १६०+१८०, खुबे :१५०+ १६०, तारली : १८०-२००. 

नदीची मासळी : रहू : १४०-१६०, कतला : १६०-१८०, मरळ : ४४०, शिवडा : २८०, खवली : २८०, आम्ळी : १६०, खेकडे : २०० वाम : ५५०

चिकन 
चिकन : १००, लेगपीस : १२०, जिवंत कोंबडी : ८०, बोनलेस : २००. 
अंडी : गावरान : शेकडा : ६५० डझन : ९० प्रति नग : ७.५, इंग्लिश : शेकडा : ३३० डझन : ४८ प्रतिनग : ४. 
मटण : बोकडाचे : ५८०, बोल्हाईचे : ५८० खिमा : ५८०, कलेजी : ६४०.

ताज्या बाजार भावासाठी येथे क्लिक करा


इतर बाजारभाव बातम्या
लासलगाव बाजार समितीचे कामकाज पुन्हा बंद नाशिक : ‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे लासलगाव...
पुण्यात पोलिस बंदोबस्तात बाजार समिती...पुणे : कोरोनामुळे शहरात लॉकडाऊन असतानाही...
खानदेशातील बाजार समित्यांत आवक सुरळीतजळगाव : खानदेशातील धुळे, जळगाव, नंदुरबार येथील...
सोलापुरात बाजार समितीत भाजीपाला...सोलापूर ः कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यभर...
कोल्हापूरमध्ये ‘कोरोना’चा...कोल्हापूर : कोरोनाच्या धसक्‍याने या सप्ताहात...
नागपुरात संत्रादरातील सुधारणा कायमनागपूर ः कोरोनामुळे ‘व्हिटॅमिन सी’ असलेल्या...
पुण्यात भाजीपाल्याच्या दरात २५ ते ३०...पुणे : ‘‘कोरोना विषाणूचा फैलाव आणि प्रादुर्भाव...
औरंगाबादमध्ये संत्रा ५०० ते १००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत फ्लॉवर ४०० ते ८०० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्‍यात संत्रा ५०० ते ४००० रुपये...औरंगाबादमध्ये प्रतिक्विंटल ६०० ते १६०० रुपये...
सोलापुरात मेथी, कोथिंबिरीच्या दरात...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
हरभरा दर दबावातजळगाव ः खानदेशात यंदा हरभऱ्याचे विक्रमी उत्पादन...
जळगावात गवार १८०० ते ४२०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.१७...
नाशिकमध्ये मिरची १००० ते ३००० रुपयेनाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
कळमणा बाजारात संत्रा दरात सुधारणानागपूर ः उन्हाची तीव्रता वाढल्याच्या परिणामी...
नगरला चिंच, ज्वारीची आवक अजूनही कमीचनगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदा अजूनही...
गाजर, मटार, पावट्याच्या दरात वाढपुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादमध्ये लालबाग आंबा ८००० ते १००००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत शेवगा १५०० ते २००० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्‍यात घेवडा ५०० ते ३५०० रूपये...परभणीत ५०० ते १००० रुपये दर परभणी : येथील...