Agriculture news in Marathi Vegetable arrivals are easy in the sub markets of Pune | Agrowon

पुण्याच्या उपबाजारात भाजीपाला आवक सुरळीत

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 17 एप्रिल 2020

पुणे ः ‘कोरोना’ लॉकडाऊनमध्ये शहरातील रुग्णांची संख्या वाढल्यामुळे बाजार समिती बंदचा परिणाम शेतकऱ्यांच्या नुकसानीसह शहरातील भाजीपाला टंचाईवर झाला होता. या पार्श्वभूमीवर बाजार समितीचे उपबाजार गुरुवार (ता. १६) पासून सुरू झाले आहेत. चार उपबाजारांमध्ये २४६ लहान मोठ्या वाहनांमधून सुमारे साडेपाच हजार क्विंटल भाजीपाल्याची आवक झाल्याची माहिती प्रशासक बी. जे. देशमुख यांनी दिली. तर अक्षय्य तृतीयेला आंबा उपलब्ध होण्यासाठीच्या उपाययोजना सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

पुणे ः ‘कोरोना’ लॉकडाऊनमध्ये शहरातील रुग्णांची संख्या वाढल्यामुळे बाजार समिती बंदचा परिणाम शेतकऱ्यांच्या नुकसानीसह शहरातील भाजीपाला टंचाईवर झाला होता. या पार्श्वभूमीवर बाजार समितीचे उपबाजार गुरुवार (ता. १६) पासून सुरू झाले आहेत. चार उपबाजारांमध्ये २४६ लहान मोठ्या वाहनांमधून सुमारे साडेपाच हजार क्विंटल भाजीपाल्याची आवक झाल्याची माहिती प्रशासक बी. जे. देशमुख यांनी दिली. तर अक्षय्य तृतीयेला आंबा उपलब्ध होण्यासाठीच्या उपाययोजना सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

श्री. देशमुख म्हणाले, ‘‘मुख्य बाजार आवार हॉटस्पॉटमध्ये असल्याने बंद आहे. मात्र, उपबाजार सुरू करण्याची भूमिका प्रशासनाने घेतली. गुरूवारी मोशी, मांजरी खडकी आणि उत्तमनगर उपबाजारात २४८ वाहनांमधून ५ हजार ५०० क्विंटल आवक झाली होती. तर भुसार विभाग बुधवार (ता. १५) पासून सुरळीत सुरू झाला असून, शहरातील अन्नधान्य, कडधान्य, फळे भाजीपाल्याचा पुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे.’’ 

दरम्यान अक्षय्य तृतीयेला शहरातील नागरिकांना आंबा मुबलक उपलब्ध करण्यासाठी देखील प्रयत्न सुरू असून गुलटेकडी हा हॉटस्पॉट पासून आंबा बाजार तात्पूरता स्थलांतर करण्याचे विचाराधीन आहे. यासाठी म्हात्रे पुलाजवळील डिपी रस्त्यालगत असणाऱ्या मंगल कार्यालयांमध्ये व्यापार स्थलांतरासाठी मंगल कार्यालयांचे मालक आणि आंबा व्यापारी यांच्याशी चर्चा सुरू आहे. 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी...सोलापूर  : मराठा समाजाला आरक्षण...
मुक्त विद्यापीठात कृषीविषयक अभ्यासक्रम...नाशिक : ‘‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त...
सोलापूर जिल्ह्यात दहा हजार हेक्‍टरवर...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून...
सोलापूर जिल्हा बॅंक देणार अल्प मुदतीचे...सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
परभणी, हिंगोलीत ओल्या दुष्काळाचे सावटपरभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील अनेक मंडळांत...
जळगाव जिल्ह्यात उडीद, मूग खरेदीची...जळगाव : शासकीय उदीद, मूग खरेदीसंबंधीची प्राथमिक...
परभणीत भरपाईसाठी ‘स्वाभिमानी’ची पिकांसह...परभणी : अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान...
नाशिक जिल्ह्यात खरिपासह भाजीपाला पिके...नाशिक : जिल्ह्याच्या सर्वदूर भागात शनिवारी (...
`औरंगाबाद जिल्ह्यातील नुकासानग्रस्त...औरंगाबाद : सतत सुरू असलेल्या पावसाने कोणत्या...
ऊसतोडणी दर ठरविताना उत्पादकांवरील बोजा...पुणे : दहा लाख ऊसतोडणी कामगारांच्या वतीने विविध...
मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवावीमुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च...
‘मुळा’तून विसर्ग बारा हजार क्युसेकवर...नगर ः नगर जिल्ह्यातील मुळा धरणाच्या पाणलोटात पाऊस...
शेतकऱ्यांना कॉर्पोरेट कंपन्यांच्या...कोल्हापूर : पाशवी बहुमताच्या बळावर भलेही तुम्ही...
मोताळा तालुक्यात वादळी पावसाने नुकसानबुलडाणा ः जिल्ह्यात शनिवारी (ता. १९) वादळी...
नाशिकमध्ये वाटाण्याची आवक कमीच; दरात...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नागपूर जिल्ह्यात पुराचा २९ हजार...नागपूर : पुरामुळे जिल्ह्यात २९ हजार २६२...
सोलापुरात पितृपंधरवड्यामुळे गवार,...सोलापूर ः पितृपंधरवड्यामुळे सोलापूर कृषि उत्पन्न...
डाळिंब फळपिकातील तेलकट डाग व्यवस्थापनसोलापूर, सांगली, नाशिक आणि नगर यासारख्या...
औरंगाबादमध्ये मूग, उडीद, ज्वारी,...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
बार्शी बाजार समितीत उडीद, मूग हमीभाव...सोलापूर : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...