Agriculture news in Marathi, Vegetable arrivals increased in Pune market; Rate constant | Agrowon

गुलटेकडीत भाजीपाल्याची आवक वाढली; दर स्थिर

टीम अॅग्रोवन
सोमवार, 29 जुलै 2019

पुणे ः खरिपातील भाजीपाल्याच्या उत्पादनाला सुरवात झाल्याने बाजारातील भाजीपाल्याच्या आवकेत वाढ होऊ लागली आहे. गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. २८) भाजीपाल्याची सुमारे १५० ट्रक आवक झाली होती. तर पालेभाज्यांमध्ये कोथिंबीर सुमारे दोन लाख तर मेथीची ६० हजार जुड्या आवक झाली होती. भुईमुगाच्या शेंगांच्या दरात १० ते २० टक्के वाढ झाली होती. तर इतर भाजीपाल्याचे दर स्थिर होते.

पुणे ः खरिपातील भाजीपाल्याच्या उत्पादनाला सुरवात झाल्याने बाजारातील भाजीपाल्याच्या आवकेत वाढ होऊ लागली आहे. गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. २८) भाजीपाल्याची सुमारे १५० ट्रक आवक झाली होती. तर पालेभाज्यांमध्ये कोथिंबीर सुमारे दोन लाख तर मेथीची ६० हजार जुड्या आवक झाली होती. भुईमुगाच्या शेंगांच्या दरात १० ते २० टक्के वाढ झाली होती. तर इतर भाजीपाल्याचे दर स्थिर होते.

विविध भाजीपाल्याच्या आवकेमध्ये परराज्यांतून आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि कर्नाटक येथून सुमारे १२ टेंपो हिरवी मिरची, कर्नाटकमधून २ ट्रक मटार, कर्नाटक आणि गुजरात येथून ४ ट्रक कोबी, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून शेवगा सुमारे ५ टेंपो, इंदूर येथून गाजर सुमारे ८ टेंपो, कर्नाटकमधून घेवडा आणि पावटा प्रत्येकी सुमारे २ टेंपो, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून लसणाची सुमारे ६ हजार गोणी तर आग्रा आणि इंदूर येथून बटाटा सुमारे ५० ट्रक आवक झाली होती. 

महाराष्ट्राच्या विविध भागांतून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे १ हजार २०० गोणी, टॉमेटो सुमारे ५ हजार क्रेट, फ्लॉवर १५ टेंपो, कोबी ८ टेंपो, काकडी, भेंडी, वांगी, सिमला मिरची आणि तांबडा भोपळा प्रत्येकी सुमारे १० ते १२ टेंपो, तर गवार सुमारे ८ टेंपो, भुईमूग शेंग सुमारे ५० गोणी, तसेच कांदा सुमारे ७० ट्रक आवक झाली होती. 

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव 
कांदा - १००-१४५, बटाटा- ८०-१५०, लसूण - ५००-९००, आले : सातारी ५००-८००, भेंडी : १००-२००, गवार : १५०-३००, टोमॅटो - २२०-२६०, दोडका : २२०-२६०, हिरवी मिरची : २५०-३००, दुधी भोपळा : ६०-१००, चवळी : १४०-१५०, काकडी : १५०-१८०, कारली : हिरवी १५०-१६०, पांढरी ९०-१००, पापडी : १८०- २००, पडवळ : २५०-२६०, फ्लॉवर : १००-१४०, कोबी : २००-२४०, वांगी : १०० -१५०, डिंगरी : १४० -१५०, नवलकोल : १५० -१६०, ढोबळी मिरची : २००-२५०, तोंडली : कळी १८०-२००, जाड : ९०-१००, शेवगा : ३००- ५००, गाजर : २००-२२० वालवर : २४०-२५०, बीट : १६०-१८०, घेवडा : ३००-५००, कोहळा : २०० -२२०, आर्वी : ३००- ३५०, घोसावळे : १८० -२००, ढेमसे : १८०-२००, भुईमूग : ५०० -५५०, पावटा : २५०-३००, मटार : परराज्य- ८००- १०००, तांबडा भोपळा ६०-१२०, सुरण : २८०-३००, मका कणीस : ६०-१२०, नारळ (शेकडा) : १०००-१६००. 

पालेभाज्या 
पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : ५०० -१५००, मेथी : ८००-१२००, शेपू : ५००-७००, कांदापात : १००० -१५००, चाकवत : १००० -१२००, करडई : ५०० -८००, पुदिना : ५०० -६००, अंबाडी : ८००-१०००, मुळे : १२००-१५००, राजगिरा : ५०० -८००, चुका : ५००-८००, चवळई : ५०० -८००, पालक : ६०० -८००.

फळबाजार 
रविवारी (ता. २८) मोसंबी सुमारे ३० टन, संत्री २ टन, डाळिंब १५० टन, पपई ७ टेंपो, लिंबे सुमारे २ हजार गोणी, चिकू २०० डाग, कलिंगड ४ टेंपो, खरबूज ४ टेंपो, पेरूची सुमारे ६० क्रेट आवक झाली होती. 

फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : ३००-६००, मोसंबी : (३ डझन) : १३०-३२०, (४ डझन) : ४०-१२०, संत्रा : (३ डझन) : २००-४००, (डझन ४) : ६०-१८०, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : २५-१२५ गणेश १०-४०, आरक्ता २०-५०. कलिंगड : ८-१२, खरबूज : १८-२२, पपई : १५-३५, चिक्कू : १००-५००, पेरू (२० किलो) ७००-८००.

फुलबाजार 
फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : 
झेंडू : १०-४०, गुलछडी : २०-४०, बिजली - ६०-१२०, कापरी : ३०-६०, मोगरा : १५०-२००, शेवंती - ८०-१००, ऑस्टर : १५-२५, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : ५-१०, गुलछडी काडी : १०-३०, डच गुलाब (२० नग) : १०-४०, लिली बंडल : ५-७ जरबेरा : १०-३०, कार्नेशियन : ५०-१००.

मटण मासळी 
गणेश पेठेतील मासळीच्या घाऊक बाजारात रविवारी (ता. २८) खोल समुद्रातील मासळीची सुमारे ७ टन, खाडीची ४०० किलो, तर नदीच्या मासळीची दीड टन आवक झाली होती. तर आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे १२ टन आवक असल्याची माहिती ठाकूर परदेशी यांनी दिली.

पावसामुळे पश्चिम किनारपट्टीवरून मासळीची आवक बंद असून,  हावडा, ओडिशा, उत्तर प्रदेश आणि तमिळनाडूच्या किनारपट्टीवरून आवक होत आहे. आषाढ महिन्याच्या शेवटच्या रविवारी मासळीला मोठी मागणी असते. मात्र, यंदा शेवटच्या रविवारी आज (ता. २८) एकादशी असल्याने मागणी घटली होती. दरम्यान आषाढ महिन्याचा बुधवारी (ता. ३१) शेवट असल्याने मागणी वाढेल असेही परदेशी म्हणाले. 

खोल समुद्रातील मासळी 
(प्रतिकिलोचे भाव) : पापलेट : कापरी : १४००- १५००, मोठे १६०० मध्यम : ८००- ९००, लहान ६००-७००, भिला : ५५०, हलवा : ६५०-७००, सुरमई : ५००-७००, रावस : लहान ६००-७००, मोठा : ८५०, घोळ : ०००-०००, भिंग : ०००, करली ३२०-३६० करंदी-००, पाला : लहान ०००, मोठा ०००-०००, वाम : पिवळी लहान ३६०, मोठी ५००-८००, काळी : ३६०, ओले बोंबील : २४०-४००, कोळंबी ः लहान २८०, मोठी : ४८० जंबो प्रॉन्स : १५००, किंग प्रॉन्स : ९००, लॉबस्टर : १४००, मोरी : लहान : २००, मोठी  : ४००, मांदेली : १४०-१६०, राणीमासा : २८०, खेकडे : २००, चिंबोऱ्या : ५५०-६००

खाडीची मासळी 
सौंदाळे : ४००, खापी ०००, नगली : लहान : ३२० मोठी ८००, तांबोशी : ५५०, पालू : ०००, लेपा : लहान २००, मोठे ०००, शेवटे : २४०. बांगडा :  २००-२८०, बेळुंजी : १६०, तिसऱ्या : २००, खुबे : १४०, तारली : १६०.

नदीची मासळी 
रहू : १६०, कतला : १६०, मरळ : लहान २८०,  मोठे- ५००, शिवडा : २००, चिलापी : ६०-८०,  खवली : २४०, आम्ळी : १४० खेकडे : २४०, वाम : ५५०.

मटण
बोकडाचे : ५००, बोल्हाईचे : ५००, खिमा : ५००, कलेजी : ५८०.

चिकन 
चिकन : १४०, लेगपीस : १७०, जिवंत कोंबडी : ११०, बोनलेस : २४०. 

अंडी 
गावरान : शेकडा : ६१०, डझन : ८४ प्रति नग : ७ इंग्लिश : शेकडा : ३५५ डझन : ४८ प्रतिनग : ४


इतर ताज्या घडामोडी
विनाअनुदान गॅस ६२ रुपयांनी स्वस्तनवी दिल्ली : लॉकडाउनच्या काळात जीवनावश्यक...
रेशनकार्डवर तीन महिन्यांचे धान्याचे...पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
वऱ्हाडात पावसाने पिकांसह घरांचे नुकसान अकोला : वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा जिल्ह्यात काही...
पुणे जिल्ह्यात नागरिकांना रेशनकार्डवर...पुणे  ः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
नागलवाडी येथे भाजीपाला झाला जनावरांचे...गिरणारे, नाशिक : साडेचार एकर शेतातील काढणीस आलेले...
राज्यात शेतीपंपासाठीच्या वीज दरात एक...मुंबई : नेहमीच वीज दरवाढीचा बोजा सहन करणाऱ्या...
कोल्हापुरात मजूराला प्रवासास परवानगी...कोल्हापूर  ः कोरोनो विषाणूचा प्रादुर्भाव...
द्राक्षबागेतील वेगवेगळ्या अवस्थांनुसार...सध्याच्या परिस्थितीमध्ये द्राक्ष बागेत वेगवेगळ्या...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात सलग...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील २६...
अवकाळी पावसानंतर लिंबूवर्गीय फळबागेचे...स ध्या अनेक जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह...
व्यवस्थापन फळे,भाजीपाला पिकांचेकाही भागांमध्ये गारपीट किंवा जोराचा पाऊस येण्याची...
कोकणातील आंबा उत्पादकांना दिलासा...मुंबई : सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा...
 ‘कोरोना’च्या लढ्यासाठी अशोक चव्हाण...नांदेड ः आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत...
परतूर परिसरात लॉकडाऊनमुळे टरबूज...परतूर, जि. जालना : परतूरसह परिसरातील टरबूज...
नागपूरात शेतकरी २४ ठिकाणी करणार थेट...नागपूर ः महात्मा फुले भाजी बाजार (कॉटन मार्केट)...
पुण्यात अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांना...पुणे  ः ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
जळगाव तालुक्‍यात पीक विम्याच्या...जळगाव : तालुक्‍यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
नंदुरबार जिल्ह्यात केळीची वाहतूक,...नंदुरबार  : कोरोनामुळे संचारबंदी व वाहनांना...
‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर श्री बिरोबा...ढालगाव, जि. सांगली ः  लाखो भाविकांचे...
खानदेशात ३३५ गावांमधील शेतकऱ्यांना...जळगाव : धुळे आणि जळगाव जिल्ह्यात मंगळवारी (...