agriculture news in marathi, Vegetable arrivals in Pune market stable | Agrowon

पुणे बाजारात भाजीपाल्याची आवक स्थिर
टीम अॅग्रोवन
सोमवार, 17 सप्टेंबर 2018

पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १६) भाजीपाल्याची सुमारे १५० ट्रक आवक झाली हाेती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवक आणि दरदेखील स्थिर हाेते. आले आणि हिरवी मिरचीच्या आवकेत घट झाल्याने दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली हाेती.

पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १६) भाजीपाल्याची सुमारे १५० ट्रक आवक झाली हाेती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवक आणि दरदेखील स्थिर हाेते. आले आणि हिरवी मिरचीच्या आवकेत घट झाल्याने दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली हाेती.

आवकेमध्ये परराज्यातून कर्नाटक आणि गुजरात येथून सुमारे ७ ट्रक कोबी, गुजरात, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश येथून सुमारे १५ टेम्पो हिरवी मिरची, बंगळूर येथून २ टेम्पो आले, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून ३ टेम्पो शेवगा, कर्नाटक मधून भुईमूग शेंग ३ टेम्पो, मध्य प्रदेश आणि गुजरात मधून लसूणाची साडे चार ते पाच हजार गोणी इतकी आवक झाली हाेती. तर स्थानिक आवकेमध्ये सातारी आले सुमारे १ हजार ८०० पोती, टॉमेटोे पाच हजार क्रेट, फ्लॉवर १० तर काेबी सुमारे १५ टेम्पो, गवार ६ टेम्पो, भेंडी १० टेम्पो, शेवगा ३ टेम्पो, ढोबळी मिरची १२ टेम्पो, हिरवी मिरची ४ टेम्पो, मटार २०० गोणी, पावटा ३ टेम्पो, भुईमूग १०० पोती, कांदा सुमारे ८० ट्रक, आग्रा, इंदौर आणि तळेगाव येथून बटाटा सुमारे ६० ट्रक आवक झाली हाेती.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव
कांदा : ८०-११०, बटाटा : १४०-१९०, लसूण : १५०-३००, आले : सातारी : ५००-५५०, बंगलाेर ४५०-५००, भेंडी : १००-२०० गवार : ३००-४००, टोमॅटो : ४०-८०, दोडका : २००-२५० हिरवी मिरची : २५०-३००, दुधी भोपळा : ५०-१००, चवळी : १५०-२००, काकडी : १००-१५०, कारली : हिरवी १८०-२२०, पांढरी : १५०-१६०, पापडी : १८०-२००, पडवळ : १६०-१८०, फ्लॉवर : १००-१२०, कोबी : ४०-८०, वांगी : १००-२०० डिंगरी : १६०-१८०, नवलकोल : ८०-१००, ढोबळी मिरची : १५०-२००, तोंडली : कळी २५०-३००, जाड : १००-१२०, शेवगा : २५०-३००, गाजर : १००-१२०, वालवर : २४०-२६०, बीट : ६०-८०, घेवडा : २००-२५०, कोहळा : १५०-२००, आर्वी : २५०-३००, घोसावळे : १६०-१८०, ढेमसे : २५०-३००, भुईमूग : ३००-३५०, पावटा : २५०-३००, मटार : ६५०-७००, तांबडा भोपळा : ५०-१००, सुरण : २२०-२४०, मका कणीस : ६०-१२०, नारळ (शेकडा) : १०००-१६००.

पालेभाज्यांमध्ये कोथिंबीर सुमारे दाेन लाख तर मेथी सुमारे ५० हजार जुड्या आवक हाेती. 

पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी)
कोथिंबीर : ३००-८००, मेथी : ३००-८००, शेपू : ४००-६००, कांदापात : ५००-८०० चाकवत : ५००-६००, करडई : ४००-५००, पुदिना : २००-३००, अंबाडी : ४००-५००, मुळे : ५००-८००, राजगिरा : ३००-५००, चुका : २००-५००, चवळई : ५००-६००, पालक : ३००-५००.

फळबाजार
रविवारी (ता. १६) येथील फळबाजारात लिंबांची सुमारे ४ हजार गाेणी, मोसंबी सुमारे १०० टन, संत्री २० टन, डाळिंब ४०० टन, पपई २० टेम्पोे, चिक्कू १ हजार गाेणी आणि बॉक्स, पेरु ३०० क्रेटस्, कलिंगड २० टेम्पो, खरबूज ३ टेम्पो, तर सीताफळ ८ टन आवक झाली हाेती. तर बाेरांचा हंगाम सुरू झाला असून, विविध जातींची सुमारे १५० गाेणी आवक झाली हाेती. 

फळांचे दर पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रति गोणी) : २००-६००, मोसंबी : (३ डझन) : ९०-१२०, (४ डझन) : ३०-८०, संत्रा : (३ डझन) १००-२५०, (४ डझन) : ३०-१००, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : ३०-१३०, गणेश १०-४०, आरक्ता २०-५०. कलिंगड : ५-२०, खरबूज : १५-३०, पपई : ५-२०, चिकू : ३००-८००, पेरू (२० किलो) : ५००-६००, सीताफळ : २०-१८०, सफरचंद - सिमला (२५ ते ३० किलो) १५००-२६००. बाेरे - चेकनेट (१ किलाे) - ६०-६५, उमराण (१० किलाे) ८०-९०, चमेली (१० किलाे) १६०-२००, चण्यामण्या - (१० किलाे) ६००-६५०. 

फूलबाजार
फुलांचे प्रति किलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : १०-३०, गुलछडी : २००-३००, बिजली : ५०-७०, कापरी : १०-३०, शेवंती ८०-१५०, ऑस्टर : १०-२०, गुलछडी काडी : १०-२०, डच गुलाब (२० नग) : ८०-१२०, लिलिबंडल : २०-४०, जर्बेरा : ४०-६०, कार्नेशियन : ८०-१५०,

मटण मासळी
गणेशोत्सव सुरू असल्याने मासळीला मागणी घटली आहे, त्यामुळे सर्व मासळीच्या दरात १० ते २० टक्के दर घट झाली आहे. उत्सवानंतर मासळीच्या भावात वाढ होण्याची शक्यता व्यापारी ठाकूर परदेशी यांनी वर्तवली आहे. रविवारी (ता. १६ ) खोल समुद्रातील मासळीची सुमारे ८ ते १० टन, खाडीच्या मासळीची सुमारे १०० ते २०० किलो आणि नदीतील मासळीची ५०० ते 8०० किलो इतकी आवक झाली. आंध्र प्रदेशातील रहू, कतला, सीलन आदी मासळीची सुमारे ७ ते ८ टन इतकी आवक झाली. मागणीत वाढ झाल्याने गावरान आणि इंग्लिश अंड्याच्या भावांत प्रति शेकड्यामागे १० ते ४० रुपयांनी वाढ झाली. चिकन आणि मटणाचे दर स्थिर आहेत.  
भाव (प्रतिकिलो) : 
पापलेट : 
कापरी : १३००-१४००, मोठे : १४००, मध्यम : ८००, लहान : ५५०-६००, भिला : ४००, हलवा : ४००-४४०, सुरमई : लहान : ३००-३६०, मोठी : ४८०, रावस : लहान : ४४०, मोठा : ५२०-५५०, घोळ : ४८०, करली : २८०, भिंग : २८०, पाला : लहान  ४००,  मोठे ८००, वाम : पिवळी : ३६०-४४०, काळी : २८०, ओले बोंबील : लहान : ६०, मोठे : १०० 

कोळंबी 
लहान : २००, मोठी : ४००, जंबोप्रॉन्स : १२००, किंगप्रॉन्स : ७००, लॉबस्टर : १२००, मोरी : लहान  १६०, मोठे २४०, मांदेली : १००, राणीमासा : १६०, खेकडे : १६०-२००, चिंबोऱ्या : ३६०-४००. 

खाडीची मासळी 
सौंदाळे : २००, खापी : २००, नगली : लहान : २४०, मोठी : ५५०, तांबोशी : २६०, पालू : २००, लेपा : लहान  १२०  मोठे २००, शेवटे : २००, बांगडा : लहान : १२०,  मोठा : १६०. पेडवी : ४०, बेळुंजी : १२०, तिसऱ्या : १४०-१६०, खुबे : १००, तारली : १०० 

नदीची मासळी 
रहू : १२०-१४०, कतला : १४०-१६०, मरळ : २४०-२८०, शिवडा : १००-१४०, चिलापी : ४०-६०, मांगूर : ८०-१००, खवली : १२०-१६०, आम्ळी : ६०-८०, खेकडे : १००-१६०, वाम : ४००-४८०. 

मटण 
बोकड : ४८०, बोल्हाई : ४८०, खिमा : ४८०, कलेजी : ५२०. चिकन : १३०, लेगपीस : १६०, जिवंत कोंबडी : १००, बोनलेस : २४०, 

अंडी : गावरान 
शेकडा : ६७०, डझन : ९०, प्रति नग : ७.५०, इंग्लिश : शेकडा : ३९५, डझन : ६०, प्रतिनग : ५.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याचा रब्बी हंगाम दीड लाख हेक्टरवर...अकोला  ः खरिपात पिकांचे नुकसान झाल्याने काही...
सोलापूर जिल्ह्यात नुकसानभरपाईसाठी २०४...सोलापूर : यंदा ऑक्‍टोबर महिन्यात झालेल्या...
पुणे : नुकसानग्रस्त भाजीपाला पिकांचे...पुणे ः मॉन्सुनोत्तर पावसामुळे पुणे विभागात नऊ...
अमरावती जिल्ह्यात ज्वारी ठरेल रब्बीत...अमरावती  ः मध्यम जमीन व सिंचनाच्या सोयी...
साहेब, संत्रा उत्पादकांचे प्रश्‍न सोडवा...नागपूर ः ‘‘दुचाकी, कार आणि घर घेण्यासाठी कर्जाचे...
परभणी : दूधातील घट ऑक्टोबरमध्येही कायमपरभणी : शासकीय दूध योजनेतंर्गंत येथील दुग्ध...
सातारा जिल्ह्यात भूजल पातळीत वाढसातारा ः जिल्ह्यात यंदा झालेल्या अतिवृष्टी,...
नगर जिल्ह्यात सव्वाचार लाख हेक्‍टर...नगर ः मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप...
कोल्हापूरच्या पूर्वेकडच्या भागात...कोल्हापूर : एकेकाळी सोयाबीनच्या उत्पादनात अग्रेसर...
ओला दुष्काळ जाहीर करा; बच्चू कडूंचे...मुंबई : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून...
गुलटेकडीत कांद्याच्या आवकेत घटपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
दक्षिण आफ्रिकेतील हापूस आंबा सांगलीतसांगली : आंब्याचा हंगाम सुरू होण्यास अद्याप...
परभणीत शेतकरी संघर्ष समितीचे रास्ता...परभणी ः जिल्ह्यात मॉन्सुनोत्तर पाऊस आणि...
पीकविम्यासाठी शेतकऱ्यांचा कंपनीसमोर...पुणे ः मागील २०१८ या वर्षातील बीड जिल्ह्यातील...
पंतप्रधान मोदी आणि शिवसेनेत दरी निर्माण...मुंबई ः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना...
राज्यात लसूण ४२०० ते २० हजार रूपये...सांगलीत ४२०० ते १५००० रुपये सांगली : येथील...
राजकीय अस्थिरतेमुळे पूरग्रस्तांना मदतीस...कोल्हापूर: महापुरात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना...
नवनवीन प्रपत्र, जिओ टॅगिंगच्या...बुलडाणा  ः अवकाळी पावसामुळे झालेल्या...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नी ‘...अकोला ः राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एकरी...
शरद पवार करणार विदर्भातील पीक नुकसानीची...नागपूर ः राज्यात सत्तास्थापनेचे गुऱ्हाळ सुरू...