पुणे बाजारात भाजीपाल्याची आवक स्थिर

पुणे बाजारात भाजीपाल्याची आवक स्थिर

पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. २४) सुमारे १५० ट्रक भाजीपाल्याची आवक झाली होती. दुष्काळी परिस्थितीमुळे भाजीपाल्याची घटलेली आवक स्थिर असून, लसणाची नवीन आवक सुरू झाली आहे. या लसणाच्या दराबरोबरच आले, हिरवी मिरची, सिमला मिरचीच्या दरांत वाढ झाली होती. तर पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची सुमारे दीड तर मेथीची सुमारे ७५ हजार जुड्या आवक झाली होती. कोथिंबिरीच्या दरात घट झाल्याने दर वाढले होते.

विविध भाजीपाल्याच्या आवकेमध्ये परराज्यांतून कर्नाटक, आंध्रप्रदेश, तमिळनाडू आणि गुजरात येथून सुमारे १० टेम्पो हिरवी मिरची, आंध्रप्रदेश आणि तमिळनाडू येथून ३ टेम्पो शेवगा, राजस्थान येथून सुमारे १० ट्रक मटार आणि १० ट्रक गाजर, कर्नाटक आणि गुजरात येथून ४ ट्रक कोबी आणि मध्यप्रदेश आणि गुजरातमधून लसणाची सुमारे ५ हजार गोणी आवक झाली होती.

महाराष्ट्र्च्या विविध भागातील झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे १ हजार २०० गोणी, टॉमेटोे सुमारे ६ हजार क्रेट, कोबी १० तर फ्लॉवर सुमारे १२ टेम्पो, ढोबळी मिरची ८ टेम्पो, हिरवी मिरची ४ टेम्पो, भुईमूग शेंग ५० पोती आणि शेवगा ४ टेम्पो, तांबडा भोपळा १० टेम्पो, तर कांदा नवीन सुमारे १५० ट्रक आवक झाली होती. तसेच स्थानिकसह आग्रा, इंदौर येथून बटाट्याची ४० ट्रक आवक झाली होती.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव  कांदा - ४५-५५, बटाटा : ८०-१३०, लसूण : २००-६०० आले : सातारी ६००-६५०, भेंडी : ३००-४००, गवार : गावरान -५००-७००, सुरती ६००-८००, टोमॅटो : १४०-१६०, दोडका : ३००-४५०, हिरवी मिरची : ४००-६००, दुधी भोपळा : १००-२००, चवळी : २००-२५०, काकडी : २००-२५०, कारली : हिरवी- ३५०-४०० पांढरी २५०- ३००, पापडी : १५०-२००, पडवळ : १६०-१८०, फ्लॉवर :८०-१००, कोबी : १००-१२०, वांगी : १००-२००, डिंगरी : २००- २५०, नवलकोल : १००-१२०, ढोबळी मिरची : ४००-४५०, तोंडली : कळी ३५०- ४००, जाड : १४०-१५०, शेवगा : ३००-४००, गाजर : १३०-१५०, वालवर : २००-२५०, बीट : १००-१५०, घेवडा : ४५०-५००, कोहळा : २००-२५०, आर्वी : ३००- ३५०, घोसावळे : २००-२५०, ढेमसे : ३००-३५०, भुईमूग : ५५०-६५०, पावटा : ४००-४५०, मटार : १६०- १८०, तांबडा भोपळा : ८०-१२०, चिंच अखंड - ३५०-४००, तोतापुरी कैरी -४००-५००, सुरण : २००-२२०, मका कणीस : ६०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००.

पालेभाज्या पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची सुमारे दीड लाख तर मेथीची सुमारे ७५ हजार जुड्या आवक झाली होती. पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : ३००-६००, मेथी : २००-५००, शेपू : २००-४००, कांदापात : ६००-७००, चाकवत : ४००-५००, करडई : ४००-५००, पुदिना : १५०-२००, अंबाडी : ५००-६००, मुळे : ८००-१०००, राजगिरा : ५००-६००, चुका : ५००-८००, चवळई : ४००-६००, पालक : ४००-५००, हरभरा गड्डी : ६००-८००.

फळबाजार फळबाजारात रविवारी (ता. २४) मोसंबीच्या जुन्या बहारातची सुमारे १५ आणि नवीव बहाराची सुमारे ५० टन, संत्री ४० टन डाळिंब सुमारे २५० टन, पपई १० टेम्पो, लिंबे सुमारे ३ हजार गोणी, चिक्कू २ हजार ५०० बॉक्स आणि गोणी, पेरू १५० क्रेट, कलिंगड ३० टेम्पो, खरबूज २० टेम्पो, विविध जातींची बोरे सुमारे १०० गोणी, विविध द्राक्षांची सुमारे ६० टन, स्ट्रॉबेरीची सुमारे १० टन आवक झाली होती.

फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रती गोणी) : १००-४००, मोसंबी : (३ डझन) : जुना - १८०-४००, नवीन १००-२००, (४ डझन ) : जुना १२०-२००, नवीन २०-८०, संत्रा : (३ डझन) १२०-३५०, (४ डझन) : ५०-१४०, डाळिंब (प्रती किलोस) : भगवा : २०-९०, आरक्ता १०-५० गणेश -५-२५, कलिंगड : ५-१०, खरबूज : १०-२०, पपई : ५-१५, चिकू : १००-६००, पेरू (२० किलो) : ४००-५००, बोरे : उमराण (१० किलो) -८०-१००, चमेली (१० किलो) १८०-२२०, चण्यामण्या ४५०- ४७०. द्राक्षे : जंम्बो (१० किलो) ३५०-७००. सुपर सोनाका - ६००-९००, शरद सिडलेस (१५)- ५००-८००, माणिकचमण - ३५०-४५०, ताश ए गणेश - ४५०-६००, स्ट्रॉबेरी-८०-१४०(२ किलोचे पनेट)

फूलबाजार फुलांचे प्रती किलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : ३०-५०, गुलछडी : ६०-१००, बिजली : ५-२०, कापरी : १५-५०, सुट्टा कागडा : १२०-२००, मोगरा : २००-३००, ऑस्टर : १०-१६, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : १५-३०, गुलछडी काडी : २०-५०, डच गुलाब (२० नग) : ५०-८०, लिलिबंडल : ५-७, जर्बेरा - २०-४०, कार्नेशियन : ८०-१२०

मटण - मासळी गणेश पेठ येथील मासळीच्या घाऊक बाजारात खोलसमुद्रातील मासळीची सुमारे १० टन, खाडीची सुमारे ३०० किलो तर नदीची सुमारे ८०० किलो आवक झाली होती. तसेच आंध्रप्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे १० टन आवक झाली होती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत मागणी कमी असली तरी दर टिकून असल्याचे मासळीचे व्यापारी ठाकूर परदेशी यांनी सांगितले. तर मटण आणि चिकनचे दर मागच्या आठवड्याच्या तुलनते स्थिर असल्याचे अनुक्रमे प्रभाकर कांबळे आणि रुपेश परदेशी यांनी सांगितले.

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे भाव) : पापलेट : कापरी : १५००, मोठे १४००-१५००, मध्यम : १०००-११००, लहान ८००-८५० भिला : ६५०-७००, हलवा : ६००-६५०, सुरमई : ६५०-७००, रावस-लहान : ६००-६५०, मोठे ७५०-८००, घोळ : ६५०, करली : ३२०, करंदी  (सोललेली) : ३६०, भिंग ४००, पाला : लहान ७०० , मोठे :१०००-१२००, वाम : लहान ४८०, पिवळी मोठे  ७५०-८५०, काळी ३६०- ४००, ओले बोंबील : १२०-१६०. 

कोळंबी ः लहान : २८०, मोठी : ४८०, जंबोप्रॉन्स :१४००, किंगप्रॉन्स : ८५०, लॉबस्टर : १२००-१४००, मोरी : लहान  २४०, मोठे २८०, मांदेली : १२०, राणीमासा : २००, खेकडे: २००, चिंबोऱ्या : ५५०-६००. खाडीची मासळी : सौंदाळे : २८०, खापी १८०-२४०, नगली : लहान २८०-३२० मोठी ५५०, तांबोशी ४८०, पालू : २००, लेपा : लहान १६०, मोठे २४०-२८०, शेवटे : २०० बांगडा : लहान १६०-१८०, मोठा २४०-३२०, पेडवी : ६०, बेळुंजी : १४०-१८०, तिसऱ्या : १८०-२००, खुबे १४०-१६०, तारली : १८ १४०-१६०. 

नदीची मासळी : रहू: १६०, कतला : १८०, मरळ : लहान २८०, मोठी ४८०, शिवडा : २००,  चिलापी : ८०, मागुर : १४०, खवली : २४०, आम्ळी : ८० खेकडे : २४०, वाम : ५२०. 

मटण : बोकडाचे : ४८०, बोल्हाईचे : ४८०, खिमा : ४८०, कलेजी : ५२०.  चिकन : १५०, लेगपीस : १८०, जिवंत कोंबडी : १२०, बोनलेस : २५०.  अंडी : गावरान : शेकडा : ७००, डझन : ९६ प्रती नग : ८ इंग्लिश : शेकडा : ४७०  डझन : ६० प्रती नग: ५.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com