ok
ok

पुण्यात भाजीपाल्याची आवक, दर स्थिर 

पुण्याची गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता २२) भाजीपाल्याची सुमारे ७० ट्रक आवक झाली होती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत भाजीपाल्याची आवक आणि दर स्थिर होते. तर पालेभाज्यांची मोठी आवक झाली होती.

पुणे  : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता २२) भाजीपाल्याची सुमारे ७० ट्रक आवक झाली होती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत भाजीपाल्याची आवक आणि दर स्थिर होते. तर पालेभाज्यांची मोठी आवक झाली होती. परराज्यांतून आलेल्या आवकेमध्ये मध्यप्रदेशातून १० ट्रक मटार, कर्नाटक आणि मध्यप्रदेशातून सुमारे १० टेम्पो हिरवी मिरची, गुजरात आणि कर्नाटक येथून कोबी ५ ट्रक, तमिळनाडू येथून २ टेम्पो शेवगा, राजस्थानहून ८ टेम्पो गाजर आणि मध्यप्रदेशातून लसणाची ५ ट्रक आवक झाली होती.  स्थानिक आवकेमध्ये सातारी आले सुमारे ८०० पोती, कोबी ५ ट्रक, फ्लॉवर १० टेम्पो, सिमला मिरची १० टेम्पो, भेंडी ८ टेम्पो, तांबडा भोपळा १० टेम्पो, टॉमेटो ८ हजार पेटी, कांदा सुमारे १०० ट्रक आवक झाली होती. तर आग्रा, इंदूर व स्थानिक भागांतून ३० ट्रक बटाटा आवक झाली होती. 

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव -  कांदा : ३००-५००, बटाटा : ३५०-३८०, लसूण : ५००-११००, आले : सातारी १००-२५०, भेंडी : १५०-२००, गवार : १००-१५०, टोमॅटो : १००-१५०, दोडका : १५०-२५०, हिरवी मिरची : २००-२५०, दुधी भोपळा : २०-५०, चवळी : १००-१५०, काकडी : ६०-८०, कारली : हिरवी १५०-२००, पांढरी १००-११०, पापडी : २००-२५०, पडवळ : १५०-२००, फ्लॉवर : ३०-६०, कोबी : १४०-१६०, वांगी : २००-२५०, डिंगरी : १००-१५०, नवलकोल : १००-१२०, ढोबळी मिरची : १५०-२००, तोंडली : कळी १५०-२००, जाड : ९०-१००, शेवगा : ६००-८००, गाजर : २००-३००, वालवर : २००-२५०, बीट : २५०-३५०, घेवडा : ३००-४००, कोहळा : १००-१५०, आर्वी : १००-१२०, घोसावळे : १००-१५०, ढेमसे : १५०-१६०, पावटा : ३००-४००, भुईमूग शेंग : ४००-५००, मटार : ४००-५००, तांबडा भोपळा : ६०-१००, सुरण : १८०-२००, मका कणीस : ६०-१२०, नारळ (शेकडा) : १०००-१६००. 

कोथिंबीर, मेथीची मोठी आवक  पालेभाज्यांमध्ये कोथिंबीर आणि मेथीच्या प्रत्येकी दीड लाख जुडींची आवक झाली होती. पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : ३००-७००, मेथी : ३००-५००, शेपू : १००-३००, कांदापात : १००-१३००, चाकवत : ५००-६००, करडई : ४००-५००, पुदिना : २००-३००, अंबाडी : ३००-४००, मुळे : ८००-१०००, राजगिरा : ३००-५००, चुका : ३००-५००, चवळई : ५००-६००, पालक : ४००-५००. 

बोरांची आवक वाढली  फळबाजारात लिंबांची सुमारे ३ हजार गोणी, मोसंबी ५० टन, संत्री ३० टन, डाळिंब ३० टन, पपई १० टेम्पो, चिक्कू सुमारे १ हजार गोणी, कलिंगड आणि खरबुज प्रत्येकी सुमारे ८ टेम्पो, पेरू १ हजार क्रेटस, विविध जातींच्या बोरांची १ हजार गोणी आवक झाली होती. फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : ७०-१३०, मोसंबी : (३ डझन) : २२०-४८०, (४ डझन ) : ८०-१८०, संत्रा : (१० किलो) : १००-४००, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : ५०-२००, गणेश : १०-३०, आरक्ता २०-६०. कलिंगड : ४-१२, खरबूज : १५-२५, पपई : ५-१२, चिक्कू (१० किलो): १००-५००, पेरू (२० किलो) : १००-३००, बोर (१० किलो)- चमेली ५०-९०, उमराण ३०-३५, चण्यामण्या ४००-४५०, चेकनेट ३००-३५०. 

फुलबाजार  फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : १०-१५, गुलछडी : ६०-१००, ऑस्टर : जुडी १०-१५, सुट्टा ८०-१२०, कापरी : १०-३०, शेवंती ४०-६०, गुलाबगड्डी : १५-३०, गुलछडी काडी : ५०-१२०, डच गुलाब (२० नग) : ८०-२००, लिलिबंडल : १०-१५, जर्बेरा : ६०-१०. कार्नेशियन : १००- १२०. 

थंडीमुळे मासळीची आवक घटली  गणेश पेठेतील मासळीबाजारात रविवारी (ता.२२ ) खोल समुद्रातील मासळीची सुमारे १५ टन, खाडीची सुमारे ४०० किलो तर नदीच्या मासळीची २ टन आवक झाली होती. तर, आंध्रप्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे २० टन आवक झाल्याची माहिती व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली. दरम्यान, देशभरात थंडीला सुरुवात झाल्याने त्याचा परिणाम मासळीच्या आवकेवर झाला आहे. तर दिवाळीनंतर मासळीला मागणी वाढल्याने गेल्या आठवड्याच्या तुलनेत सर्व मासळीच्या दरात १० ते २० टक्के दरवाढ झाली आहे. तर आवक वाढल्याने इंग्लिश अंड्याच्या दरात शेकड्याला २५ रुपयांपर्यंत घट झाली असून, गावरान अंडी आणि चिकनचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापारी रुपेश परदेशी यांनी दिली 

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे भाव) :  पापलेट : कापरी : १४००, मोठे १२००, मध्यम : ८००, लहान ५००-६००, भिला : ४५०-५००, हलवा : ४००, सुरमई : ४००, रावस : लहान ४८० मोठा : ६५०, घोळ : ५५०, भिंग : २८०, करली : २४०, करंदी : सोललेली ४००, पाला : लहान ७००, मोठे १२००, वाम : ६००, ओले बोंबील : १६०-२००. 

कोळंबी : लहान २००, मध्यम ४००, मोठे ५२०, जंबोप्रॉन्स : १२००, किंगप्रॉन्स : ७००, लॉबस्टर : १२००, मोरी : २८०, मांदेली : १४०-१६०, राणीमासा : २००, खेकडे : २८०, चिंबोऱ्या : ४००-४८०. 

खाडीची मासळी : सौंदाळे : २४०, खापी :२४०, नगली : लहान ३६०, मोठी ६००, तांबोशी : लहान २४० ,मोठे ४००-४८०, पालू : २००, लेपा : १६०, शेवटे : २००, बांगडा : लहान २८० , मोठे २८०-३२०, पेडवी : १२०, बेळुंजी : १६०-२००, तिसऱ्या : २८०, खुबे : १६०, तारली : १६०-२००, 

नदीची मासळी : रहू : १६०, कतला : १६०, मरळ : ४८० शिवडा : २००, खवली : २४०, आम्ळी : १४०, खेकडे : २०० वाम : ५५० 

चिकन : चिकन : २००, लेगपीस : २४० जिवंत कोंबडी : १६०, बोनलेस : ३००.  अंडी : गावरान : शेकडा : ८३० डझन : १०८ प्रति नग : ९, इंग्लिश : शेकडा : ५०० डझन : ७२ प्रतिनग : ६. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com