agriculture news in marathi, vegetable crops affected due to flood situation, sindhudurga,maharashtra | Agrowon

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे भाजीपाला पिकांचे नुकसान

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

सिंधुदुर्ग   ः अतिवृष्टीचा भाजीपाला पिकांना मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यातील २५० हेक्टरवरील विविध भाजीपाला पिके अतिवृष्टीने बाधित झाली आहेत. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या भाजीपाला पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. 

सिंधुदुर्ग   ः अतिवृष्टीचा भाजीपाला पिकांना मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यातील २५० हेक्टरवरील विविध भाजीपाला पिके अतिवृष्टीने बाधित झाली आहेत. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या भाजीपाला पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. 

जिल्ह्यातील वेंगुर्ला, कुडाळ, सावंतवाडी, कणकवली, दोडामार्ग या तालुक्यांमध्ये भाजीपाला पिके घेतली जातात. येथील शेतकरी गणेशोत्सव काळात भाजीपाला तयार होईल अशा नियोजनातून भाजीपाला लागवड करतात. गणेश चतुर्थीकरीता मोठ्या प्रमाणात चाकरमानी येत असतात. त्यामुळे भाजीपाला, फळांना मागणी असते. त्यामुळे शेतकरी या शेतीमालाची स्थानिक बाजारपेठांमध्ये विक्री करुन चांगला दर मिळवतात.

या वर्षी सुद्धा येथील शेतकऱ्यांनी पडवळ, वाल, दुधी भोपळा, दोडका, कारली, भेंडी, गवार, काकडी, चिबूड, भोपळा आदी पिकांची लागवड केली होती. या सर्वच वेलवर्गीय भाज्यांना आता फळधारणा झाली होती. गणेश चतुर्थीच्या काळात यातील बहुतांशा भाज्या तयार होऊन त्या बाजारपेठेत विक्रीला येणार होत्या. परंतु सलग पाच दिवस झालेल्या अतिवृष्टीने जिल्हयातील शेकडो शेतकऱ्यांनी अडीचशेहुन अधिक हेक्टरवर लागवड केलेल्या भाजीपाला पिकांची नासाडी झाली आहे. काही ठिकाणी फळे कुजली असून काही ठिकाणी वेल वाहुन गेले आहेत.

चिबूड आणि कणगाला गोव्यात मोठी मागणी असते. या दोन्ही पिकांची लाखो रुपयांची उलाढाल होते. परंतु पावसामुळे ही पिके वाया गेल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे अन्य पिकांसोबतच भाजीपाला पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. 


इतर ताज्या घडामोडी
चार हजार शेतकऱ्यांना र्दृष्टीदोष दूर...गोंडपिपरी, जि. चंद्रपूर : व्यवसाय करताना बेरीज-...
रेशीम उद्योगासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे...औसा, जि. लातूर :  ‘‘रेशीम उद्योगाकडे...
सकाळी सौम्य थंडी तर दुपारी उष्ण हवामानमहाराष्ट्रावर आठवड्याच्या सुरुवातीला १०१४...
औरंगाबाद जिल्ह्यात विजेअभावी सिंचनाची...औरंगाबाद : पंधरवडा रात्री तर पंधरवडा दिवसा...
जीआय टॅगिंगयुक्त हापूसला दीड लाखापर्यंत...रत्नागिरी : ‘‘निर्यातीत हापूसचा टक्के घसरत असून...
कावपिंप्रीत चार वर्षांनंतर बहरली पिकेकावपिंप्री, जि. जळगाव : यंदा कावपिंप्रीसह...
नीरा-देवघरच्या पाणीवाटपावरुन पिलीवमध्ये...सोलापूर : राज्य सरकारने नीरा- देवघर धरणातील...
खानदेशात कांदा दरातील चढउतारामुळे...जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
पूरक अन् प्रक्रिया उद्योगावर जर्मनीचा भरउत्तर जर्मनीतील सपाट भूप्रदेश आणि पूर्व...
जालन्यात कांदा २२०० ते २५०० रुपये...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
गुणकारी डाळिंबडाळिंब हे अत्यंत गुणकारी फळ असून भारतात सर्वत्र...
हुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स...अकोला  ः जिल्ह्यात हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो...
नाशिक येथे तीनदिवसीय पुष्पोत्सवाला...नाशिक  : प्रत्येकाच्या हक्काची तीन झाडं हवी...
न्हावी परिसरात मका पिकावर लष्करी अळीचा...न्हावी, जि. जळगाव ः न्हावीसह परिसरात मक्‍याची...
पोल्ट्री उद्योगाला हवा मदतीचा हातपुणे: बाजारभावातील नरमाईमुळे पोल्ट्री उद्योग...
हापूस निर्यातीसाठी निर्यातीसाठी पणन...रत्नागिरी ः निर्यातीत हापूसचा टक्का घसरत असून तो...
नीरा देवधर, गुंजवणीतून समन्यायी पाणीवाटपमुंबई ः नीरा देवघर व गुंजवणी धरणांचे कालवे...
तापमानवाढीचा धोका वेळीच ओळखावा लागेल:...औरंगाबाद: निसर्गाच्या दोलायमानतेत मानवी...
नगरमधील नऊ तालुक्यांत तेलबियांची पेरणीच...नगर ः तेलबियांची (गळीत धान्य) पेरणी वाढावी यासाठी...
सातारा जिल्ह्यात ५५ लाख क्विंटल...सातारा : जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या गाळपाची...