Agriculture news in marathi Vegetable Festival in Aurangabad today | Agrowon

औरंगाबादमध्ये आज रानभाज्या महोत्सव

टीम अॅग्रोवन
रविवार, 9 ऑगस्ट 2020

औरंगाबाद  ः ‘‘वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत कृषी विज्ञान केंद्रात आज (ता.९ ) रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

औरंगाबाद  ः ‘‘वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत कृषी विज्ञान केंद्रात आज (ता.९ ) रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कृषी विभाग आत्मा व कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव होत आहे. ऑनलाइन वेबिनारही होत आहे’’, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे यांनी दिली.

या रानभाज्या महोत्सवांमध्ये वैयक्तिक महिला बचत गट शेतकरी गट यांचा सहभाग असेल. उत्कृष्ट रानभाज्यांचे नमुने आणणाऱ्या व रानभाज्यांची चांगल्या प्रकारे भाजी तयार करण्याची पाककृती करणाऱ्या महिलांना बक्षीसही दिले जाणार आहे. पावसाळ्यात शेतात रानावनात शेकडोंनी रानभाज्या उगवतात. करटोली, घोळ, अंबुशी, कुर्डू, केना, सुरण, दिंडा कुडा, टाकळा, पाथ्री, भुई आवळी, कपाळफोडी, तरोटा, आगडा, उंबर, चिगूर, सराटे, मयाळू आदींचा समावेश आहे. 

पूर्वजांना रानभाज्यांची भाजी कशी करायची, याविषयी माहिती होती. आताच्या पिढीला या भाज्यांची ओळख नाही.  त्यामुळे पूर्वजांचा ठेवा लुप्त होतो की काय ? अशी शंका निर्माण होते. आरोग्यदायी व अनेक औषधी गुणधर्म असलेल्या या रानभाज्यांविषयी सर्वांना ओळख व्हावी, विक्रीस चालना मिळावी, आर्थिक उत्पन्नाचे साधन निर्माण व्हावे, या उद्देशाने हा महोत्सव होत आहे. 

वेगवेगळ्या रानभाज्या पाहण्याची व खरेदी करण्याची संधी या महोत्सवातून मिळेल. फेसबुक व युट्युबवर हा महोत्सव वेबिनारच्या माध्यमातून दाखविण्यात येईल. नागरिकांनी ही माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन डॉ. मोटे यांनी केले. यावेळी कृषी विज्ञान केंद्र औरंगाबाद व गांधलीचे कार्यक्रम समन्वयक डॉ. किशोर झाडे, डॉ. वसंत देशमुख उपस्थित होते.


इतर बातम्या
कृषी, पणन कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत...पुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर केलेल्या कृषी...
मोदी सरकारकडून शेतकऱ्यांच्या ह्रदयावर...नवी दिल्ली : कृषी सुधारणा कायद्यांविरोधात...
कृषी कायद्यांविरोधात सर्व आघाड्यांवर...चंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना...
काळा पैसा बंद झाल्याने त्यांचा विरोध; ...नवी दिल्ली : ‘‘कृषी सुधारणा कायद्यांमुळे...
कृषी कायदे झुगारून लावा; काँग्रेसशासित...नवी दिल्ली   ः काँग्रेसशासित राज्यांनी...
नगर जिल्ह्यात पीक नुकसानीचे पंचनामे...नगर  ः महिनाभर सतत पाऊस पडल्याने जिल्ह्यातील...
पुणे विभागात एक लाख ३८ हजार हेक्टरवर...पुणे  ः यंदा वेळेवर पाऊस झाल्याने चारा...
पावसाचा नगरमधील १७ हजार कांदा...नगर  ः गेल्या महिनाभरात झालेल्या सततच्या...
नुकसानीबाबत परभणीतील सहा हजारांवर ...परभणी : अतिवृष्टी तसेच नाले, ओढे, नद्यांच्या...
 पावसाची विश्रांती; सिंधुदुर्गात भात...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात पावसाने विश्रांती...
पानपिंपरी, विड्याच्या पानाला...बुलडाणा  ः पानपिंपरी व विड्याचे पानमळे हे...
जत तालुक्यातील सात गावांमधील ...सांगली  ः जत तालुक्यातील सात गावांमधील...
अकोला जिल्ह्यात ८७ हजार हेक्टरवर हरभरा...अकोला  ः यंदा समाधानकारक पावसामुळे सर्वच...
सोयाबीनची उद्यापासून ऑनलाइन नोंदणीमुंबई : खरीप हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत...
हमीभावाने उडीद खरेदीही उद्यापासूनमुंबई : हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत किंमत...
ऊस वाहतूक दरात ५० टक्के वाढ द्या : ...कोल्हापूर : ऊस वाहतुकीच्या दरात ५० टक्के वाढ...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची...पुणे : गेल्या काही दिवसापासून पावसाने...
शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा :...मुंबई : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी...
कृषी विधेयकाआधीही शेतकरी स्वतः माल विकू...सोलापूर  ः केंद्र सरकारने आणलेल्या कृषी...
राहुरी विद्यापीठाच्या बदली सत्रात...पुणे : महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठात...