agriculture news in marathi, Vegetable fluctuation in Pune market; Rates increase | Agrowon

पुणे बाजारात भाजीपाला आवक कमी; दरांमध्ये वाढ

टीम अॅग्रोवन
सोमवार, 29 ऑक्टोबर 2018

पुणे ः परतीच्या मॉन्सूनने दगा दिल्यामुळे रब्बी पिकांना झळ बसली असून, भाजीपाल्याचे उत्पादन घटण्यास सुरवात झाली आहे. परिणामी बाजारातील भाजीपाल्याची आवक मंदावली असून, बहुतांश भाजीपाल्यांच्या दरात वाढ झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने बटाटा, भेंडी, काकडी, पापडी, वांगी, पावटा, फ्लाॅवर, श्रावणी घेवडा आदींचा समावेश आहे.

पुणे ः परतीच्या मॉन्सूनने दगा दिल्यामुळे रब्बी पिकांना झळ बसली असून, भाजीपाल्याचे उत्पादन घटण्यास सुरवात झाली आहे. परिणामी बाजारातील भाजीपाल्याची आवक मंदावली असून, बहुतांश भाजीपाल्यांच्या दरात वाढ झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने बटाटा, भेंडी, काकडी, पापडी, वांगी, पावटा, फ्लाॅवर, श्रावणी घेवडा आदींचा समावेश आहे.

गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. २८) भाजीपाल्याची सुमारे अवघी १३० ट्रक आवक झाली हाेती. ही आवक सरासरी आवकेच्या ५० ट्रकने कमी झाली आहे. परराज्यांतून हाेणाऱ्या आवकेमध्ये राजस्थानातून गाजर सुमारे १३  टन, हिमाचल प्रदेशातून २ ट्रक मटार, कर्नाटक आणि गुजरात येथून सुमारे ४ ट्रक कोबी, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून सुमारे १५ टेंपो हिरवी मिरची, बंगळूर येथून आले २ टेंपो, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून ३ टेंपो शेवगा, मध्य प्रदेश आणि गुजरात मधून लसणाची सुमारे ४ हजार गोणी आवक झाली हाेती.

तर स्थानिक आवकेमध्ये सातारी आले सुमारे १ हजार २०० पोती, टॉमेटोे सुमारे ५ हजार क्रेट, काेबी आणि फ्लॉवर १० तर कोबी १५ टेंपाे, गवार १० तर भेंडी ७ ते ८ टेंपो, गवार ५ टेंपो. ढोबळी मिरची १० टेंपो, हिरवी मिरची ५ टेंपो, भुईमूग शेंग १०० गोणी, नवीन कांदा सुमारे ५० तर जुना कांदा सुमारे १०० ट्रक आणि आग्रा, इंदूर आणि तळेगाव येथून बटाटा सुमारे ५० ट्रक आवक झाली हाेती.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव
कांदा : नवीन १००-१५०, जुना १३०-१८०, बटाटा : १५०-२५०, लसूण : १५०-२५०, आले : सातारी : ६००-६५०, भेंडी : ३००-४०० गवार : सुरती- ४००-५००, टोमॅटो : ६०-८०, दोडका : २००-२५० हिरवी मिरची : १५०-२५०, दुधी भोपळा : ८०-१४०, चवळी : १६०-२००, काकडी : १४०-१८०, कारली : हिरवी १८०-२००, पांढरी : १४०-१५०, पापडी : ४००-४५०, पडवळ : १८०-२००, फ्लॉवर : १००-१२०, कोबी : ४०-८०, वांगी : २००-४०० डिंगरी : १५०-२००, नवलकोल : ८०-१००, ढोबळी मिरची : १००-१५०, तोंडली : कळी २२०-२४०, जाड : ९०-१००, शेवगा : ३००-४००, गाजर : स्थानिक १००-१४०, राजस्थान ३२०-३५०, वालवर : २५०-३००, बीट : ८०-१२०, घेवडा : ४५०-५००, कोहळा : १५०-२००, आर्वी : ३००-३५०, घोसावळे : १६०-१८०, ढेमसे : ३००-३५०, भुईमूग : ३५०-४००, पावटा : ४००, मटार : ८५०- ९००, तांबडा भोपळा : ४०-८०, सुरण : २२०-२४०, मका कणीस : ६०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००.

पालेभाज्यांमध्ये कोथिंबीर सुमारे सव्वा लाख, तर मेथी अवघी सुमारे २५ हजार जुड्या आवक झाली हाेती.
पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी)
कोथिंबीर : ५००-९००, मेथी : ७००-१४००, शेपू : ८००-१२००, कांदापात : ८००-१००० चाकवत : ५००-८००, करडई : ४००-५००, पुदिना : २००-३००, अंबाडी : ६००-८००, मुळा : ८००-१२००, राजगिरा : ४००-५००, चुका : ८००-१०००, चवळई : ५००-८००, पालक : ५००-८००.

फळबाजार
फळबाजारात रविवारी (ता. २८) मोसंबीची सुमारे १०० टन, संत्री ३० टन, डाळिंब २०० ते २५० टन, पपई २० ते २५ टेंपोे, लिंबे सुमारे ४ हजार गोणी, चिकू ६०० डाग, पेरू ६०० ते ७०० क्रेटस्, कलिंगड १५ ते २० टेम्पो, खरबूज ८ ते १० टेंपो, सफरचंद २० हजार पेटी, विविध जातींची बोरे  सुमारे ८०० गोणी, सीताफळाची १० टन आवक झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

फळांचे दर पुढीलप्रमाणे :
लिंबे (प्रतिगोणी) : २००-६००, मोसंबी : (३ डझन) : १००-२२०, (४ डझन) : ३०-८०, संत्रा : (३ डझन) १००-२००, (४ डझन) : ४०-१००, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : ३०-१३०, गणेश ५-२५, आरक्ता १५-५०. कलिंगड : ५-१८, खरबूज : १०-२५, पपई  : ५-२०, चिकू : १००-६००, पेरू (२० किलो) : ४००-५००, सीताफळ : २०-१५०,  सफरचंद ः सिमला (२५ किलो) १४००-१८००, किन्नोर : (२५ ते २६ किलो) २३००-३०००, काश्मीर डेलिशिअस : (१५ ते १६ किलो) ८००-१८००, बटरनाक : (१५ ते १६ किलो) १९००-२०००, बोरे : चेकनट (१० किलो) ५००-५५०, उमराण (१० किलो) ८०-९०, चमेली (१० किलो)  १७०-२१०, चण्यामण्या ४३०-४५०.

फुलबाजार
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी विविध फुलांचे नियोजन केल्याने फुलांची आवक घटली असून, दरदेखील स्थिर असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : १०-४०, गुलछडी : १५-३०, बिजली : २०-४०, कापरी : १०-३०, शेवंती २०-५०, ऑस्टर : ६-१२, गुलाबगड्डी (गड्डीचे भाव) : ५-१५, गुलछडी काडी : १०-४०, डच गुलाब (२० नग) : ३०-५०, लिलिबंडल : ३-६, जरबेरा : १०-३०, कार्नेशियन : ५०-१००, चमेली : ४००-५००

मटण मासळी
गणेश पेठ येथील मासळीच्या घाऊक बाजारात खोल समुद्रातील मासळी सुमारे १२ टन, खाडीची ५०० किलो, नदीची दीड टन आवक झाली होती. आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची मिळून सुमारे १४ टन आवक झाल्याचे व्यापारी ठाकूर परदेशी यांनी सांगितले. तर मागणी वाढल्याने खोल समुद्रातील मासळीच्या दरात १५ टक्क्यांर्पंत वाढ झाली होती. तर इंग्लिश अंड्याच्या दरात शेकड्याला १५ रुपयांनी वाढ झाली होती.
खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे भाव) : पापलेट : कापरी : १४००-१५००, मोठे : १४००-१५००, मध्यम : ७५०-८००, लहान : ५५०-६००, भिला : ४८०, हलवा : ४८०-५२०, सुरमई : ४८०-५५०, रावस-लहान : ४८०-५२०, मोठे ६५०, घोळ : ४८०, करली : २८०, करंदी (सोललेली) : ३२०, भिंग : २५०, पाला : लहान ७५० , मोठे :११००-१२००, वाम : पिवळी ४८०, काळी : २४०, ओले बोंबील : लहान ६०, मध्यम १००- १२०,
कोळंबी ः लहान : ३२०, मोठी : ४८०-५२०, जंबो प्रॉन्स :१४००, किंग प्रॉन्स : ७५०, लॉबस्टर : १४००, मोरी : २००-२४०, मांदेली : १०० राणीमासा : १६०-२००, खेकडे : २००, चिंबोऱ्या : ४००-४८०,
खाडीची मासळी : सौंदाळे : २००, खापी : १६०-२००, नगली : लहान २८० मोठी ४८०-५५०, तांबोशी : ३२०-४०० , पालू : २८०, लेपा : लहान १२०, मोठे २००, शेवटे : २४० बांगडा : लहान १४० मोठा २००-२४०, पेडवी : ५०-६०, बेळुंजी : १००, तिसऱ्या : १६०-२००, तारली : १००-१२०.
नदीची मासळी : रहू : १६०, कतला : १६०, मरळ : लहान २८०, मोठी ४००, शिवडा : १६० चिलापी : ५०-६०, मागुर : १००, खवली : १६०, आम्ळी : ६० खेकडे : १६०, वाम : ४८०.
मटण : बोकडाचे : ४८०, बोल्हाईचे : ४८०, खिमा : ४८०, कलेजी : ५२०.
चिकन : चिकन : १६०, लेगपीस : १९०, जिवंत कोंबडी : १३०, बोनलेस : २५०.
अंडी : गावरान : शेकडा : ७२०, डझन : ९६ प्रति नग : ८. इंग्लिश : शेकडा : ४३४ डझन : ६० प्रतिनग : ५.


इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यात कापसाच्या दरात किंचित...औरंगाबाद : खासगीत कापूस खरेदीचे दर किंचित...
परभणीत भाजपकडून वीजबिलांची होळी परभणी :  वाढीव वीज देयकांच्या निषेधार्थ...
खानदेशात ऊस लागवड वाढण्याची शक्यताजळगाव ः वाढती खासगी कारखानदारी व इतर...
जळगाव जिल्ह्यात कांदा बिजोत्पादन...जळगाव : जिल्ह्यात यंदा कांदा बिजोत्पादनाचे...
कलदगाव, नायगाव येथे कापूस खरेदी सुरु नांदेड  : भारतीय कपास निगमच्या (सीसीआय)...
अकोले बुद्रूकमध्ये वीज तारांच्या...सोलापूर ः विजेच्या खांबावरील विद्युत तारांचे...
सोलापूर जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक...सोलापूर ः जून ते डिसेंबर २०२० या कालावधीत...
कार्तिकी वारी कालावधीत गर्दी टाळा :...सोलापूर : ‘‘कार्तिकी वारी ही कोरोनाच्या...
नगरमधील ३२ मंडळात सरासरीच्या दुप्पट पाऊसनगर (प्रतिनिधी) : दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या...
पुणे जिल्हा परिषदेचे १७ शिक्षक...पुणे  - राज्यात शाळा सुरू करण्याच्या राज्य...
वीज जोडणी तोडण्यास आल्यास घेराव :...कऱ्हाड, जि. सातारा  : नागरिकांना शासनाने...
`वाढीव वीज बिले माफ न केल्यास तीव्र...मुंबई : वाढीव वीज बिलांच्या विरोधात भारतीय जनता...
शेतकरी आंदोलकांनी दिली सवलत; पंजाबमध्ये...नवी दिल्ली,  : केंद्र सरकारने तीन कृषी कायदे...
सांगलीत चार लाख जनावरांना लाळ खुरकूतचे...सांगली  : जनावरांच्या संभाव्य लाळ खुरकूत...
कृषी विद्यापीठातर्फे उन्हाळी सोयाबीनचे...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
अतिवृष्टीने फुले झडून गेल्याने तुरीच्या...सांगली  : जिल्ह्यात गेल्यावर्षीपेक्षा यंदा...
चारा पिकांकरिता पाणी आरक्षित करा :...वर्धा  : बोर प्रकल्पातील पाण्याचे नियोजन...
वान प्रकल्पाचे ‘पाणी’ तापू लागलेअकोला  : जिल्‍‍ह्यात तेल्हारा तालुक्यात...
कृषी सल्ला (कापूस, तूर, रब्बी ज्वारी,...मराठवाड्यात पुढील पाच दिवसांत आकाश स्वच्छ ते ढगाळ...
संत्राचे व्यवहार ११०० ते १४०० रुपये...नागपूर :  मागणीअभावी संत्रा दरातील तेजीची...