उभ्या पिकात घातल्या मेंढ्या; औरंगाबादला भाजीपाला उत्पादक हैराण

भाजीपाल्याचे दर जमिनीवर आले. उठावच नसल्याने उभ्या पिकाची माती झाली. काही शेतकऱ्यांनी तोडलेली वांगी, टोमॅटो रस्त्यावर फेकले, तर काहींनी उभ्या पिकात शेळ्या- मेंढ्या घातल्याचे विदारक चित्र शिवना (ता. सिल्लोड) परिसरात बघायला मिळत आहे.
उभ्या पिकात घातल्या मेंढ्या; औरंगाबादला भाजीपाला उत्पादक हैराण
उभ्या पिकात घातल्या मेंढ्या; औरंगाबादला भाजीपाला उत्पादक हैराण

शिवना, जि. औरंगाबाद : भाजीपाल्याचे दर जमिनीवर आले. उठावच नसल्याने उभ्या पिकाची माती झाली. काही शेतकऱ्यांनी तोडलेली वांगी, टोमॅटो रस्त्यावर फेकले, तर काहींनी उभ्या पिकात शेळ्या- मेंढ्या घातल्याचे विदारक चित्र शिवना (ता. सिल्लोड) परिसरात बघायला मिळत आहे. कोरोना संकटामुळे शेतकऱ्यांच्या पोटात पुन्हा एकदा गोळा उभा राहिला आहे. पूर्वहंगामी मिरचीच्या लागवडीवरही याचा परिणाम होणार आहे. उन्हाळी मिरचीच्या लागवडीत अग्रेसर असलेला सिल्लोड तालुका, गेल्या वर्षीच्या लॉकडाउनमधील कटू अनुभव विसरलेला नाही. सरकारने या नुकसानीचे सर्व्हेक्षण करून मदत द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. ...२५ पैसेही नफा नाही एक एकर क्षेत्रात घेतलेल्या कोबीच्या (पत्तागोबी) पिकासाठी नांगरणीपासून आतापर्यंत पंचवीस हजार रुपये खर्च आला. आणि ऐन तोडणीच्या वेळी भाव गडगडल्याने कोबी खरेदी करायला कुणीही तयार नाही, त्यामुळे नाइलाजाने उभ्या पिकात मेंढ्या घातल्याची शोकांतिका येथील शेतकरी शेख मोहम्मद अब्दुल गफूर चाऊस यांनी कथन केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com