सांगलीत भाजीपाला लावगडीकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ

सांगली : ‘कोरोना’च्या वाढत्या धोक्यामुळे आणि बाजारपेठेत भाजीपाला विक्रीस अडचणी निर्माण होत असल्याने शेतकऱ्यांनी भाजीपाला लागवडीकडे पाठ फिरवली आहे. जिल्ह्यातील रोपवाटिकेत सुमारे ७० टक्केहून अधिक भाजीपाल्यासह अन्य पिकांची रोपे शिल्लक असल्याचे रोपवाटिका उद्योगातील सूत्रांनी सांगितले. सुमारे ५० ते ६० कोटीचा आर्थिक फटका रोपवाटिकांना बसला आहे.
Sangli vegetable wrap
Sangli vegetable wrap

सांगली : ‘कोरोना’च्या वाढत्या धोक्यामुळे आणि बाजारपेठेत भाजीपाला विक्रीस अडचणी निर्माण होत असल्याने शेतकऱ्यांनी भाजीपाला लागवडीकडे पाठ फिरवली आहे. जिल्ह्यातील रोपवाटिकेत सुमारे ७० टक्केहून अधिक भाजीपाल्यासह अन्य पिकांची रोपे शिल्लक असल्याचे रोपवाटिका उद्योगातील सूत्रांनी सांगितले. सुमारे ५० ते ६० कोटीचा आर्थिक फटका रोपवाटिकांना बसला आहे.

जिल्ह्यात अंदाजे सुमारे १०० ते १५० रोपवाटिका आहेत. सांगली जिल्ह्यातील वाळवा, मिरज, पलूस, तालुक्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची लागवड केली जाते. त्याचप्रमाणे फुलांची देखील क्षेत्र अधिक आहे. सांगली जिल्ह्यातील रोपवाटिकेतून कोल्हापूर, सातारा जिल्ह्यासह अन्य भागात रोपांची विक्री केली जाते. त्यानुसार रोपवाटिकांमध्ये विविध प्रकारच्या रोपांची निर्मिती केली जाते.

जगात ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर अनेक बाजार समित्या बंद होत्या, ग्रामीण भागातील आठवडा बाजार बंद करण्यात आला आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून शहरातसह अन्य भागात भाजी विक्री जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सुरू झाली आहे. परंतू आजही वाहतूक अडवण्याचा प्रकार होत आहे. त्यामुळे त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. शेतकऱ्यांनी यापूर्वी केलेली भाजी पाल्याची लागवड संपू लागली आहे. नव्याने लागवड करण्यास कोणीही पुढे येत नसल्याने जिल्ह्यातील रोपवाटिकेत सुमारे ७० टक्के रोपे शिल्लक आहेत. त्यामुळे रोपवाटिकेला सुमारे ५० ते ६० कोटींचे नुकसान झाले आहे.

रोपांची मागणी रद्द झाली अनेक भागातून शेतकऱ्यांनी भाजीपाला रोपांची मागणी रोपवाटिकांमध्ये नोंदवली होती. परंतू ‘कोरोना’च्या भितीने शेतात काम करण्यास मजूर येत नाहीत. तसेच बाजारात भाजी विक्री करता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी रोपांची मागणी रद्द केली आहे, असे रोपवाटिकाच्या मालकांनी सांगितले

  • आरटीओकडून दिला जातोय परवाना
  • रोपवाटिकेत कोरोनोच्या भितीमुळे मजूर येत नाही
  • मागणी असून गाड्या पाठवता आल्या नाही
  • ५० ते ६० कोटी नुकसान
  • येणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाण्यास तयार पाहिजे. लोकांना सहकार्य केले पाहिजे. लोकांनी एकत्र येवू नये. व्यवसायत चढ-उतार येतात. कर्ज होईल. पुन्हा उभारण्याची जिद्द बाळगावी लागेल. - विकास मारुती नलवडे मालक, विकास हायटेक नर्सरी, तुंग

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com