पुणे, मुंबईत भाजीपाल्याची घरपोच सुविधा 

पुणेः शहरातील नागरिकांसाठी भाजीपाला पुरवठा करण्यासाठी शेतकरी कंपन्यांनी पुढाकार घेतला आहे. केंदूर (ता. शिरूर) येथील केंद्राईमाता अॅग्रो प्रोड्यूसर कंपनीनेही यामध्ये आघाडी घेतली आहे. ‘कोरोना’मुळे भाजीपाला केंद्रावर होणारी गर्दी कमी करण्यासाठी कंपनीने फॅमिली पॅक बनविला असून तो गेल्या चार ते पाच दिवसांपासून घरपोच सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे.
Vegetable housing delivery facility in Pune, Mumbai
Vegetable housing delivery facility in Pune, Mumbai

पुणे ः शहरातील नागरिकांसाठी भाजीपाला पुरवठा करण्यासाठी शेतकरी कंपन्यांनी पुढाकार घेतला आहे. केंदूर (ता. शिरूर) येथील केंद्राईमाता अॅग्रो प्रोड्यूसर कंपनीनेही यामध्ये आघाडी घेतली आहे. ‘कोरोना’मुळे भाजीपाला केंद्रावर होणारी गर्दी कमी करण्यासाठी कंपनीने फॅमिली पॅक बनविला असून तो गेल्या चार ते पाच दिवसांपासून घरपोच सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. 

‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लाॅकडाऊन केले आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांची भाजीपाला खरेदी करण्यासाठी गर्दी केली जात होती. ही गर्दी कमी करण्यासाठी शहरातील सोसायट्यांमध्ये थेट भाजीपाला विक्री करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. यामध्ये केंद्राईमाता अॅग्रो प्रोड्यूसर कंपनीमार्फत भाजीपाला, कांदा यासह विविध भाजीपाल्याची पुण्यातील लोहगाव, मोशी, चिखली, वडगाव शेरी या परिसरात असलेल्या सहकारी सोसायट्यांमध्ये थेट विक्री सुरू केली आहे. 

यामध्ये ग्राहकांच्या मागणीनुसार फॅमिली पॅक उपलब्ध करून दिल्याने चांगलीच मागणी वाढत आहे. आत्तापर्यंत सुमारे २५० फॅमिली पॅकची ग्राहकांना विक्री केली आहे. याशिवाय १२६ क्विंटल भाजीपाल्याची विक्री केली आहे. याशिवाय रायगड, अलिबाग, पेण या ठिकाणीही १२० क्विंटल कांद्याची विक्री केली आहे. परराज्यातही कोईमतूर येथेही २५ टन कांद्याची विक्री केली आहे. 

कुटुंबासाठी `फॅमिली पॅक`  फळे भाजीपाला धान्ये कडधान्ये खरेदी, करुन पुणे मुंबई येथील आठवडे बाजार तसेच काही सोसायटीमध्ये शेतकरी ते ग्राहक या तत्वावर काम करीत आहे. शासनाच्या मदतीने फॅमिली पॅक बनवून पुणे, मुंबई येथील लोकांना पोच देण्यास सुरवात केली आहे. कंपनीने फॅमिली पॅक बनविताना एका कुटुंबासाठी किमान एक आठवडा पुरेल एवढा भाजीपाला असावा, या उद्देशाने हा फॅमिली पॅक तयार केला आहे. 

फॅमिली पॅकमध्ये काय काय येतं  सुमारे १५ प्रकारचा सुमारे १२ किलो असा फॅमिली पॅक आहे. यामध्ये दोन किलो कांदे, एक किलो बटाटे, एक किलो टोमॅटो, मिरची, लसूण, लिंबू तसेच वेलवर्गीय दोन फळभाज्या, फळवर्गीय दोन भाज्या, दोन पालेभाज्या व फळे तीन किलो असा ५०० रूपयांचा पॅक उपलब्ध करून दिला आहे. कंपनीमधील सुमारे १२६ हून अधिक शेतकऱ्याकडून हा भाजीपाला उपलब्ध होत आहे. भाजीपाला काढल्यानंतर त्याची स्वच्छ पाण्याने धुवून त्याची प्रतवारी केली जाते. त्यानंतर तो कॅरेटमध्ये भरला जातो. कमीत कमी हाताळणी केल्यामुळे भाजीपाला ताजा राहतो. 

एकत्रित मागणी करण्याचे आवाहन  पुणे, मुंबई शहरातील सोसायटीधारकांनी एकत्रित येऊन मागणी केल्यास कंपनीमार्फत नक्कीच फॅमिली पॅक उपलब्ध करून दिला जाईल. त्यासाठी दिलेल्या व्हाॅट्सअॅप नंबरवर कोणता माल आणि किती प्रमाणात, किती भाव याची माहिती द्यावी, जमेल तेवढी शेतकऱ्यांना व ग्राहकांना मदत करण्याचा प्रयत्न कंपनीचा आहे. 

संपर्क करा येथे  कांदा व भाजीपाला खरेदी करताना किवा त्यापूर्वी आॅनलाईन, चेकद्वारे पेमेंट करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तरी ग्राहकांनी संदीप सुक्रे ९०११९९९७७६ अशिष गाडगे ७०३८७०४८६८ यांना संपर्क करावा किंवा kendraimata.apcl@gmail.com या ईमेलवर संपर्क साधावा, असे आवाहन केंद्राई माता शेतकरी कंपनीचे सचिव संदीप सुक्रे यांनी केले. 

भाजीपाला विक्री करताना घेतली जाणारी काळजी ः 

  • भाजीपाला काढणी करताना हातात हॅन्ड ग्लोज वापरला जातो 
  • तोंडाला मास्क लावला जातो 
  • भाजीपाला भरताना, पॅकिग करताना सॅनिटायझरचा वापर केला जातो 
  • ग्राहकांना रांगेत अंतर ठेऊन विक्री केली जाते 
  • कंपनीला येत असलेल्या अडचणी ः 

  • शेतमालाच्या गाडीकरिता डिझेल वेळेवर उपलब्ध होत नाही 
  • काही वेळेस ग्राहक नाहकच गर्दी करतात 
  • पोलिसांकडून वारंवार विचारणा केली जाते 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com